कृषि क्षेत्रामध्ये असलेली क्षमता पाहता रोजगार निर्मितीतून दारिद्रय निर्मूलन करणे शक्य होऊ शकेल यास्तव या क्षेत्राच्या क्षमतेचा विचार करता संस्थात्मक बांधणी व खाजगी क्षेत्राशी समन्वय साधून व्यापारक्षम शेतीची वृध्दी साधने आवश्यक असल्याने शेतक-यांचे सबळीकरण करण्यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवरच महाराष्ट्र राज्यात देखील शासन निर्णय क्रमांक एस एफ ए सी २००३/सीआर-९१/१४-ए, दिनांक १६ मार्च २००५ अन्वये “महाराष्ट्र राज्य छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघाची” (Maharashtra State Small Farmers Agri-Business Consortium, SFAC) स्थपाना करण्यात आलेली आहे. या कृषि व्यापार संघाची नोंदणी ही संस्था नोंदणी अधिनियम,१८६० (Society’sRegistrationAct,1860) मधील तरतूदी नूसार दिनांक ३१ मार्च,२००५ रोजी करण्यात आलेली आहे.
राज्यात अपेक्षित कृषि औद्योगिक विकास साधण्यासाठी पर्यावरणीय शाश्वत विकास, आर्थिक कार्यक्षमता आणि सामाजिक समानता या तत्वार आधारित महाराष्ट्र राज्य छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघाची स्थापना करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्य छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघाची उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत.
२.१. छोटया शेतक-यांची (अल्प व अत्यल्प भूधारक) शेती व्यापारक्षम करण्यासाठी सर्व बाबींचा विचार करुन शासनास योग्य तो धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शिफारस करणे. तसेच शासनाचे इतर विभाग व संस्था इ.मार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा घेऊन त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणेबाबत शिफारस करणे.केंद्र व राज्य शासनाने व्यापारक्षम शेतीशी निगडित कोणत्याहि योजना राज्य शासनाच्या यंत्रणेमार्फत राबविणे.
२.२ छोटया शेतक-यांच्या शेतीचा व्यापारक्षम दृष्टीने विकास करण्यासाठी आवश्यक असलेली इतर कोणतीही योजना राबविण उदा. व्हेंचर कॅपिटल ची स्थापना करणे, नवीन तंत्रज्ञान (उदा.कोरडवाहू शेती, कृषि प्रक्रिया, पणन व प्रमाणिकरण)विकसित करणे इत्यादी.
२.३ बँकेच्या सहकार्याने कृषि उदयोग स्थापन करण्यास मदत करणे.
२.४ कृषि उदयोग प्रकल्पामध्ये खाजगी गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देऊन उत्पादकास उत्पादन विक्रीची हमी देणे, त्याद्वारे ग्रामीण उत्पन्न व रोजगार वाढविणे.
२.५ कृषि उद्योग प्रकल्पाद्वारे कच्चा मालाचे उत्पादन व त्यावरील प्रक्रिया ही साखळी मजबूत करणे.
२.६ शेतकरी उत्पादक गट, कृषि पदवीधर यांचा या योजनेत सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.
२.७ प्रकल्प स्थापन करण्याच्या हेतूने कृषि उदयोजकांसाठी प्रशिक्षण व भेटी आयोजित करणे.
महाराष्ट्र राज्य छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघाची रचना-
संपर्क :
केंद्रीय कृषी व्यापार संघ :
Managing Director, Small Farmers’ Agri-Business Consortium NCUI, Auditorium Building, 5th Floor, August Kranti Marg, Hauz Khas, New Delhi- 110016. Phone No :91-11-2686 2365 Fax No : 91-011-2686 2367 Email: sfac@nic.in Website: www.sfacindia.com
राज्य कृषी व्यापार संघ :
व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ, कृषिभवन, पहिला मजला, के. बी. जोशी मार्ग, शिवाजीनगर, पुणे - ४११ ००५ दूरध्वनी व फॅक्स क्रमांक - ०२०-२५५५३३४३० Email: mdsfacmh@yahoo.co.इन
स्त्रोत : कृषी विभाग, महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 6/19/2020