मार्कनेट (मार्केट नेटवर्क)
या प्रकल्पाअंतर्गत राज्यातील बाजार समित्यांचे संगणकीकरण करुन इंटरनेटद्वारे जोडण्यात आलेल्या आहेत.
उद्देश
सद्यस्थिती
मार्कनेट प्रकल्पाअंतर्गत सद्यस्थितीत 294 मुख्य बाजार व 66 उपबाजार यांचे संगणकीकरण पूर्ण करण्यात आले आहेत.
कार्यपद्धती
शेतमालची आवक व बाजारभाव याबाबत माहिती बाजार समितीमधील संगणकामध्ये भरण्यात येते व इंटरनेटच्या सहाय्याने कृषि पणन मंडळाच्या www.msamb.com या वेबसाईटवर अपलोड करण्यात येते. या वेबसाईटद्वारे सर्व बाजार समित्यांची माहिती एकत्रित करुन सर्वांना उपलब्ध करुन देण्यात येते
फायदे
- शेतमालाची दैनिक आवक व बाजारभाव याबाबत जनजागृती झाली.
- मार्केट नेटवर्कद्वारे इतर बाजारपेठेतील शेतमालाची दैनिक आवक व बाजारभाव याबाबत माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ लागली.
- बाजार समित्यांमध्ये इंटरनेट व ईमेल या सुविधांचा वापर सुरु झाला.
- ईमेलच्या वापरामुळे माहितीची देवाण-घेवाण जलद व कमी खर्चात होऊ लागली.
- बाजार समिती स्तरावर इंटरनेटद्वारे जागतिक स्तरावरील शेतीविषयक माहिती उपलब्ध झाली
माहिती संकलक : अतुल पगार
स्त्रोत : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ
अंतिम सुधारित : 6/6/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.