औद्योगिक संपत्तीच्या संरक्षणासाठीचा पॅरिस करार (Paris Convention for the Protection of Industrial Property) यातील कलम 1 (2) आणि 10 या कलमांमध्ये नमूद केल्यानुसार भौगोलिक चिन्हांकन (जी. आय.) ही बाब बौद्धिक संपदाहक्काचा भाग आहे. त्याचप्रमाणे उरुग्वे येथे पार पडलेल्या ‘गॅट’ कराराच्या फेरीत बौद्धिक संपदेच्या वाटाघाटीतून तयार झालेल्या Trade-Related Aspects of Intellectual Property Rights (TRIPS) या करारातील कलम 22 ते 24 या कलमांमध्येही जी. आय.ला संरक्षण देण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर भारतात भौगोलिक चिन्हांकन (नोंदणी व संरक्षण) कायदा अस्तित्वात आला असून या कायद्यानुसार जी. आय. नोंदणी प्रक्रिया पुढीलप्रमाणे असेल.
पहिली पायरी- अर्ज दाखल करणे
कलम 2(1)(ई) अंतर्गत असलेल्या जी. आय. व्याख्येच्या कक्षेत तो पदार्थ/ती वस्तू/ते उत्पादन येतेे का ते तपासून पाहणे.
भौगोलिक चिन्हांकनासाठी ज्या व्यक्तिसमूहाकडून, उत्पादक संघटनेकडून वा अधिकृत यंत्रणेकडून अर्ज दाखल करण्यात येणार आहे; ते सर्व जण ज्या मालासाठी भौगोलिक चिन्हांकन मिळवायचे आहे, त्या मालाच्या उत्पादकांचे हित जपण्यासाठी बांधील असावेत. तसेच आपण त्यांचे हित जपणार असल्याचे प्रतिज्ञापत्र त्यांनी सादर करावे.
* अर्ज तीन प्रतींतच केला जावा.
- * अर्जदार किंवा त्याचा दलाल/प्रतिनिधी (एजंट) यांनी अर्जावर सही करावी आणि अर्जाला प्रकरणाच्या माहितीची प्रत जोडावी.
- * जी. आय. नोंदणी करावयाच्या मालाची/उत्पादनाची खास वैशिष्ट्ये कोणती आहेत, त्यांचा दर्जा कसा टिकवून ठेवला आहे यांचे तपशील द्यावेत.
- * जी. आय. ज्या परिसराशी संबंधित असेल, त्या परिसराच्या नकाशाच्या तीन प्रमाणित नकला जोडाव्यात.
- * जी. आय. ज्या परिसराशी संबंधित आहे, त्या परिसरातील जी.आय.च्या वापराचे नियमन करणार्या देखरेख यंत्रणेचे तपशील द्यावेत.
- * सर्व अर्जदारांच्या पत्त्यांसह त्यांचे संपूर्ण तपशील द्यावेत. जर उत्पादकांची संख्या खूप मोठी असेल, तर मालांच्या सर्व उत्पादकांचा, मालांचा सामूहिक संदर्भ आणि जी. आय.चा संदर्भ अर्जात द्यावा. जर नोंदणी झाली असेल, तर नोंदपुस्तकाप्रमाणे (रजिस्टरप्रमाणे) दर्शवावे.
- * अर्जदाराचा सेवेसाठीचा पत्ता भारतातील असावा.
- * अर्ज वकिलाद्वारे किंवा नोंदणीकृत दलालाद्वारे/प्रतिनिधीद्वारे (एजंटद्वारे) दाखल करता येईल.
भारतातील पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा.
जिऑग्राकल इंडिकेशन्स रजिस्ट्री,
इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑफिस बिल्डिंग,
इंडस्ट्रिअल इस्टेट, जी.एस.टी. रोड,
गिंडी, चेन्नई - 600 032
दूरध्वनी- 044-22502091-93 आणि 98
फॅक्स- 044-22502090
ई-मेल:gir-ipo@nic.in, वेबसाइट- ipindia.gov.in
पायरी 2 आणि ३- प्राथमिक छाननी आणि परीक्षण
- * अर्जात काही कमतरता राहिल्या आहेत का याची छाननी परीक्षक करेल.
- * प्राथमिक छाननीत काही कमतरता आढळल्यास परीक्षकांकडून संपर्क साधला जाईल. संपर्कानंतर एक * महिन्याच्या आत या संदर्भात अर्जदाराने सुधारणा घडवून आणाव्यात.
- * अर्जातील माहितीचे मूल्यमापन तज्ज्ञांच्या सल्लागार गटाकडून केले जाईल.
- * दिलेल्या विशिष्ट तप{शलांच्या अचूकतेची खातरी ते करून घेतील.
- त्यानंतर परीक्षण-अहवाल दिला जाईल.
पायरी ४- ‘कारणे दाखवा’ नोटीस
- * अर्जाविषयी जर नोंदणी अधिकार्याची (रजिस्ट्रारची) काही हरकत असेल, तर तो ती कळवेल.
- * अर्जदाराने त्यावर दोन महिन्यांच्या आत प्रतिसाद दिलाच पाहिजे किंवा सुनावणीसाठी अर्ज केला पाहिजे.
- * यावरचा निर्णय अर्जदाराला कळवला जाईल. जर अर्जदाराला यावर अपील करायचे असेल, तर तो एका महिन्याच्या आत तशी विनंती करेल.
- * जर अर्ज चुकून स्वीकारला गेला असेल, तर बाजू ऐकून घेण्याची संधी देऊन तो अर्ज फेटाळण्याचा अधिकार नोंदणी अधिकार्याला (रजिस्ट्रारला) असेल.
पायरी ५- भौगोलिक चिन्हांकन नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध करणे
* प्रत्येक अर्ज स्वीकारला गेल्यानंतरच्या तीन महिन्यांच्या आत भौगोलिक चिन्हांकन नियतकालिकांमध्ये (जिऑग्राफिकल इंडिकेशन्स जर्नल या नियतकालिकामध्ये ) प्रसिद्ध केले जाईल.
पायरी ६- नोंदणीला विरोध
- * भौगोलिक चिन्हांकन नियतकालकामध्ये प्रसिद्ध झालेल्या जी. आय. अर्जाला तीन महिन्यांच्या आत कोणतीही व्यक्ती विरोधदर्शक नोटीस देऊ शकते. (यासाठी विनंतीनुसार आणखी एका महिन्याची मुदत दिली जाते.)
- * नोंदणी अधिकारी (रजिस्ट्रार) नोटिशीची प्रत अर्जदाराला देईल.
- * त्यानंतर दोन महिन्यांत या नोटिशीचा प्रतिवाद करणार्या निवेदनाची प्रत अर्जदार पाठवून देईल.
- * जर त्याने तसे केले नाही, तर त्याच्या अर्जावर बंदी घालणे योग्य असल्याचे मानले जाईल. जर प्रतिवादाचे निवेदन दाखल केले गेले, तर विरोध दर्शवणार्याला त्याची प्रत नोंदणी अधिकारी (रजिस्ट्रार) पाठवून देईल.
- * त्यानंतर दोन्ही बाजू प्रतिज्ञापत्राद्वारे आणि संबंधित पुष्टी देणार्या कागदपत्रांच्या आधारे आपल्याकडचे पुरावे सादर करतील.
- * त्यानंतर सुनावणीची तारीख निश्चित केली जाईल.
पायरी ७- नोंदणी
- * जर जी. आय.साठीचा अर्ज स्वीकारला गेला, तर नोंदणी अधिकारी (रजिस्ट्रार) त्या भौगोलिक चिन्हांकनाची नोंद करेल. जर नोंदणी केली गेली, तर अर्ज दाखल केल्याची तारीख हीच नोंदणीची तारीख धरली जाईल.
- * त्यानंतर रजिस्ट्रार अर्जदाराला भौगोलिक चिन्हांकन नोंदणी कार्यालयाचा ({जऑग्रा{\कल इंडिकेशन्स रजिस्ट्रीचा) शिक्का असलेले प्रमाणपत्र देईल.
पायरी ८- नूतनीकरण
* नोंदणीकृत जी. आय. हा दहा वर्षांसाठी वैध असेल आणि त्यानंतर नूतनीकरण शुल्क भरून त्याचे नूतनीकरण करता येईल.
पायरी ९- अधिसूचित मालाला अतिरिक्त संरक्षण
* कायद्याअंतर्गत अधिसूचित मालाला अतिरिक्त संरक्षण पुरवले गेले आहे.
पायरी १०- अपील
एखादा आदेश किंवा निर्णय मान्य नसलेली कोणतीही व्यक्ती तीन महिन्यांच्या आत बौद्धिक मालमत्ता अपिलीय मंडळाकडे (आय.पी.ए.बी.कडे) अपील करण्यास प्राधान्य देऊ शकेल. आय.पी.ए.बी.चा पत्ता पुढीलप्रमाणे-
इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी अॅपिलेट बोर्ड, अॅनेक्स 1, सेकंड फ्लोअर, गुना कॉम्प्लेक्स, 443, अण्णा सलाई, चेन्नई - 600 018
कोणते भौगोलिक {चन्हांकन (जी. आय.) नोंदणी करण्यायोग्य नसतात?
नोंदणीपात्र ठरण्यासाठी भौगोलिक {चन्हांकन हे जी. आय. कायदा, 1999च्या सेक्शन 2(1)च्या कक्षेत येणारेच असावेत. ते तसे असतील, तरीही सेक्शन 9मधील अटीही त्यांनी पूर्ण केल्या पाहिजेत. याअन्वये पुढील प्रकारच्या भौगोलिक {चन्हांकनाच्या वापरावर बंदी घातली गेली आहे.
- * ज्या भौगोलिक चिन्हांकनाचा वापर फसवा असण्याची शक्यता असेल किंवा त्यांच्यामुळे गोंधळ अगर संभ्रम निर्माण होत असेल.
- * ज्यांचा वापर कोणत्याही लागू असलेल्या तत्कालीन कायद्याच्या विरुद्ध ठरेल, किंवा
- * ज्यामध्ये कलंकित, लज्जास्पद किंवा बीभत्स अगर अश्लील मजकूर असेल, किंवा
- * ज्यांच्यामध्ये भारताच्या नागरिकांच्या कोणत्याही वर्गाच्या किंवा भागाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाण्याजोगा कोणताही भाग किंवा माहिती असेल, किंवा
- * जे न्यायालयात {टकाव धरू शकणारे नसतील, किंवा
- * जो माल जेनेरिक म्हणून किंवा चिन्हांकित म्हणून {नश्चित झाला असेल आणि म्हणून ज्यांना त्यांच्या मूळ देशांमध्ये संरक्षण देणे थांबवले गेले असेल किंवा जे त्या देशात वापर न करण्याच्या यादीत मोडत असतील, किंवा
- * जे मालाचे उगमस्थान असलेल्या ठिकाणी किंवा प्रदेशात शब्दशः चांगले ठरले असतील, परंतु त्या वस्तू किंवा तो माल मूळच्या दुसर्या हद्दीतील किंवा भागातील असल्याचे खोटे सांगितले गेले असेल.
स्पष्टीकरण १: सेक्शन 1 ते 9 असे सांगतात की, या सेक्शनपुरता ‘मालांच्या {चन्हांकनाची जेनेरिक नावे’ याचा अर्थ माल मूळच्या ज्या परिसरात तयार केला गेला असेल किंवा उत्पादित केला गेला असेल, त्या ठिकाणाशी संबंधित असतील, तरीही त्यांच्या नावांचा मूळ अर्थ हरवला असेल; आणि मालाच्या त्या प्रकारासाठी, स्वरूपासाठी, इतर गुणधर्माच्या प्रकारासाठी किंवा गुणधर्मासाठी त्या स्थानांची नावे ही सर्वसामान्य नावांप्रमाणे वापरली जात असतील.
स्पष्टीकरण २: एखादेे नाव जेनेरिक आहे का हे {नश्चित करण्यासाठी ज्या प्रदेशात किंवा ठिकाणी या नावाचा उगम झाला असेल, त्या प्रदेशातील किंवा ठिकाणच्या सध्याच्या परिस्थितीसह इतर सर्व घटकांचा विचार केला पाहिजे. त्याचबरोबर जिथे हा माल खाल्ला किंवा वापरला जाणार आहे, त्या परिसरातील सद्यःस्थितीसह इतर सर्व घटकांचा विचारही झाला पाहिजे.
विशिष्ट मालांना अतिरिक्त संरक्षण
- * केंद्र सरकारने नोंदणीकृत भौगोलिक चिन्हांकनास अतिरिक्त संरक्षण मिळण्यासाठी {नश्चित केलेल्या मालांच्या संदर्भात जी. आय. - 9 हा नमुनाअर्ज प्रकरणाच्या तीन प्रतींतील {नवेदनासह नोंदणी अधिकार्यासमोर (रजिस्ट्रारसमोर) सादर केला जावा. त्याबरोबरच दिल्या गेलेल्या सूचनांची प्रतही जोडलेली असावी.
- * हा अर्ज भारतातील भौगोलिक निदर्शकांचा नोंदणीकृत मालक आणि भौगोलिक निदर्शकांचे सर्व उत्पादक यांच्याकडून संयुक्तपणे केला जाईल.
प्रतिज्ञापत्रे
- * कायद्यानुसार आणि नियमांनुसार आवश्यक असलेली प्रतिज्ञापत्रे संबंधित प्रकरणांमध्ये पुरवण्यात आली नसतील, तर ती प्रतिज्ञापत्रे भौगोलिक चिन्हांकन नोंदणी कार्यालयाकडे ({जऑग्रा{\कल इंडिकेशन्स रजिस्ट्रीकडे) दाखल करावीत किंवा नोंदणी अधिकार्याकडे (रजिस्ट्रारकडे) त्यांची माहिती पुरवावी. परिच्छेदांना क्रमवार आकडे द्यावेत आणि प्रत्येक परिच्छेदात एक विषय पूर्ण करणे ही बाब जितकी व्यावहारिकदृष्ट्या शक्य असेल तेवढी करावी. प्रत्येक प्रतिज्ञापत्रात ते दाखल करणार्या व्यक्तीच्या रहिवासाच्या खर्या ठिकाणाची माहिती असावी आणि ते कोणाच्या वतीने दाखल करण्यात आले आहे ते स्पष्ट केलेले असावे.
- * भारतात कोणत्याही न्यायालयासमोर किंवा ज्या अधिकार्याला कायद्याने पुरावे स्वीकारण्याचा अधिकार दिला असेल किंवा ज्या अधिकार्याला न्यायालयाने शपथा देण्याचा किंवा प्रतिज्ञापत्रे घेण्याचा अधिकार दिला असेल; त्याच्यासमोर प्रतिज्ञापत्रे सादर करावीत.
- * भारताबाहेरच्या कोणत्याही देशात किंवा ठिकाणी एखाद्या राजनैतिक अधिकार्यासमोर किंवा दूतावासातील अधिकार्यासमोर (ओथ्स अँड फी) अॅक्ट, 1948 किंवा त्या देशाच्या अगर ठिकाणच्या नोटरी पब्लिकसमोर किंवा देशाचा न्यायाधीश किंवा दंडाधिकारी यांच्यासमोर प्रतिज्ञापत्रे सादर करता येतील.
- * ज्या वेळी साक्षीदार अशिक्षित; अंध; किंवा ज्या भाषेत प्रतिज्ञापत्र लिहिलेले असेल, त्या भाषेविषयी अनभिज्ञ असेल; त्या वेळी प्रतिज्ञापत्राचे भाषांतर करून साक्षीदाराला ते वाचून दाखवल्याचे किंवा त्याच्या उपस्थितीत साक्षीदाराला त्याचे स्पष्टीकरण दिल्याचे प्रशस्तिपत्र प्रतिज्ञापत्र स्वीकारणार्या व्यक्तीच्या स्वाक्षरीसह किंवा शिक्क्यासह त्याच्याकडून घेतले जावे आणि ते जोडावे.
- * या कायद्याअंतर्गत किंवा नियमांअंतर्गत कोणत्याही कामकाजाशी संबंधित असलेले प्रत्येक प्रतिज्ञापत्र हे अमलात असलेल्या तत्कालीन कायद्याअंतर्गत शिक्कामोर्तब झालेले असले पाहिजे.
कागदपत्रांची जनतेकडून तपासणी
- * कलम 78मधील उपकलम (1) या कलमाअंतर्गत नमूद करण्यात आलेली कागदपत्रे भौगोलिक चिन्हांकन नोंदणीच्या मुख्य कार्यालयात तपासणीसाठी उपलब्ध असतील.
- * केंद्र सरकारकडून भौगोलिक चिन्हांकन कार्यालयाच्या प्रत्येक शाखेतील नोंदवहीची प्रत आणि कलम 78मध्ये नमूद केलेली इतर कागदपत्रे तपासली जाऊ शकतील.
- * या तपासणीसाठी विहित शुल्क भरावे लागेल आणि भौगोलिक चिन्हांकन नोंदणी कार्यालयांमध्ये नोंदणी अधिकार्यानी (रजिस्ट्रारनी) ठरवलेल्या कामकाजाच्या सर्व दिवशी ती जनतेला पाहण्यासाठी उपलब्ध होतील.
नियतकालिकाचे (जर्नलचे) आणि इतर कागदपत्रांचे वितरण
राज्य सरकारशी सल्लामसलत करून निश्चित केलेल्या ठिकाणी आवश्यक कागदपत्रांचे आणि अधिकृत राजपत्रात (ऑफिशियअल गॅझेटमध्ये) वेळोवेळी दिलेल्या अर्जांचे वितरण करण्याचे निर्देश केंद्र सरकार नोंदणी अधिकार्याला (रजिस्ट्रारला) देईल.
स्रोत:http://www.ipindia.nic.in/ या संकेतस्थळावरील अंशात्मक माहितीचा मुक्त अनुवाद.
माहिती स्रोत: वनराई