जमिनीच्या पृष्टभागावर पिकांच्या बुंध्याभोवती सेंद्रिय पदार्थ, उष्टावळ, कुजणार्या पदार्थाचे अवशेष, प्लास्टिक कागद यांचे अंथरुण म्हणजे आच्छादन.
पिकांना दिलेले पाणी आणि ओलावा सुर्याच्या उष्णतेने वाफ़ होऊन जमिनितुन उडून जाते.अशा प्रकारे वाफेने उडून जाणारे पाणी जामिनीवर आच्छादन करून थोपवून धरल्यास त्या पाण्याचा उपयोग वन्स्पतीच्या पिकांच्या निकोप वाढ़ीसाठी होऊ शकतो.त्यासाठी फळबागेत इतर कोणत्याही पिकांत आच्छादन करने फायद्याचे तर आहेच पण अत्यावश्यक आहे.
जून ते सप्टेंबर या काळात उष्णतेने पाणी उडून जाण्याचे प्रमाण कमी म्हणजे प्रतिदिन ४ ते ५ मि.मी., तर हिवाळ्यात हे प्रमाण आणखी कमी म्हणजे प्रतिदिन सरासरी ३ ते ४ मि.मी. इतके असते.या काळात फळबागंना आच्छादानाची गरज नसते.मात्र फेब्रु. ते मे या काळात हेच प्रमाण प्रतिदिन ७ ते ८ मि.मी. पासून १४ ते १५ मि.मी. पर्यंत वाढते.खुप मोठ्या प्रमाणात ओलाव्याचे बाष्पीभवन होते.हे रोखण्यासाठी आच्छादनाचा चांगला उपयोग होतो.
कोरडवाहू शेतीत पावसाचे प्रमाण खुप कमी असते, त्यामुळे जमिनीत जे काही पाणी अगर ओलावा असतो त्याचा योग्य वापर व्हावा म्हणून आच्छादन हवे.आच्छादन केल्यामुळे ओलाव्याचा उपयोग पिके-झाडे जगवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी केला जातो.
टाकाऊ पदार्थाच्या आच्छादनासाठी जसा उपयोग करता येतो तसाच अलीकडे प्लास्टिकचे शिट वापरून आच्छादन करता येते.आच्छादन कशाचेही करता येते.
थोडक्यात, आच्छादन हे एक काटकसरिने वापरण्याचे महत्वाचे तंत्र आहे. अशा तंत्राचा वापर करण्यासाठी फळबागांच्या वाफ्यात, कोरडवाहू पिकात गव्हाचे भुसकट सोयाबीन अगर कडधान्यांचे भुसकट, भाताचा कोंडा, काड, पालापाचोळा, वनस्पतींच्या छोट्या फांद्या-पाने, पिकांचे वाढलेले अवशेष, गुरांच्या उष्टावळ, वाळलेले निकृष्ट गवत वापरून जमिनीचा पृष्ठभाग झाकून आच्छादन केल्यास वाफेद्वारे उडून जाणारे पाणी थांबते आणि त्याच पाण्याच्या उपयोग झाडे पिक वाढवण्यासाठी होतो. उसाच्या पाचटाच्या आच्छादनासाठी चांगल्या पद्धतीने वापर कता येतो. एकरी २ ते ४ टन आच्छादन वापरल्यास त्यांचा चांगला फायदा होतो. पावसाळ्यात टाकलेले हे आच्छादन बुडक्यापासून दूर करावे. आछादानासाठी लाकड़ाचा भूसाही वापरतात. अलीकडे प्लास्टिक शीट्स मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ लागले आहेत.
संदर्भ - प्रल्हाद यादव(कृषी प्रवचने)
अंतिम सुधारित : 6/5/2020