एकरी १०० टन उसाचे उत्पादन घेण्यासाठी काही ठळक गोष्टीवर लक्ष द्यावे लागते .त्यात बेने ही एक गोष्ट फार महत्वाची आहे. उस लावताना तिनस्तरीय बेणेमळा पद्ध्तीलालच बेने वापरायला हवे आणि किमान चार वर्षातून एकदा बेने बदलावे.
अश्या वैशिष्ट्याचे उस म्हणजे उत्तम प्रतीचे बेने वापरल्याने उगवण ९० टक्के होते.बेने कमी लागते, त्यामुळे खर्चात बचत होते.
किड रोगविरहित उसाची वाढ झपाट्याने होते. चांगले टनेज मिळते.
उगावणीपासून उसाची वध बाळसेदार जोमाने होते.ख़त पानी मशागतीला चांगला प्रतिसाद मिळतो. खोडवा पिक चांगले येते.
बेने मळ्यातील बेने चांगले येण्यासाठी जमीनीची चांगली मशागत करावी लागते.खास करुन तयार केलेल्या बेने मल्यातील बेने वापरावे.लागावडीच्या दरम्यान तयार झालेले बेने १० ते ११ महीने होईल अशा तर्हेने बेन्याची लागवड करावी.
उसाचे बेने रसरसित, सशक्त, रोग किडमुक्त असे तयार होण्यासाठी खताच्या मात्र जास्त द्याव्यात. एकून ८ गोण्या यूरिया,८.५ गोल्या सिंगल सुपर फोस्फेट आणि २.५ गोण्या म्यूरेट ऑफ़ पोटेश विभागातुन द्याव्यात.
उसबेने मळ्यामध्ये तन असू नये. यासाठी तन नाशक आणि खुरपन्या कराव्यात रोगग्रस्त, किडग्रस्त,कानी, गवताळ वाढ तसेच दुसरया जातीचे बेने काढून नष्ट करावी. बेन्यासाठी उसाचे पाचट काढू नये.पाचट काढल्यामुळे डोळे ख़राब होतात.फुटवे फुटतात. डोळे जून आणि निस्तेज होतात.त्यामुळे उगवानीवर परिणाम होतो.म्हणून पाचट काढू नये.
१०० ग्राम बाविस्टिन अगर ३०० मी.ली. मलेथियान + १०० लिटर पानी यांच्या मिश्रणाची बेनेमळा लावताना बेन्यांवर प्रक्रिया करावी. बेन्यांची कांडी करताना पिचु देऊ नयेत.
शीळे बेने वापरने भाग पडल्यास ५०० ग्राम चुना + २०० लिटर पानी यांच्या मिश्रणात बेने बुडवावे आणि मग लावावे.
तिनस्तरीय बेनेमळा व्यवस्थापनात प्रजनित म्हणजे ब्रीडर सीड संशोधक संशोधन संस्थेत ब्रीडर सीड तयार करतात.पायाभूत बेने संशोधन संस्था/कारखाना प्रक्षेत्रावर तयार केले जाते आणि प्रामाणित बेने शेतकर्यांना लावणीसाठी दिले जाते.म्हणजे ब्रीडर बेन्यापासून पायाभूत (फाउन्डेशन) बेने आणि पायाभूत बियान्यापासून प्रामाणित बेने तयार करुन शेतकर्याना दिले जाते.प्रामाणित म्हणजे सर्टिफाईड बियाणे ४ वेळा लावावे.त्यानंतर मात्र बेने बदलावे.
अशा पद्धतीने उसाचे टनेज वाढवन्यासाठी त्रिस्तरीय बेणेमळा व्यवस्थापन करुन शेतकर्याना चांगले बेने दिले जाते.
संदर्भ - प्रह्लाद यादव (कृषी प्रवचने)
अंतिम सुधारित : 6/5/2020
आडसाली उसाची लागवड 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत...
ऊस बियाणे लागण करताना बियानाद्वारे नवीन रोपामध्ये ...
कोव्हीएसआय - 03102 या जातीचे को 86032 या तुल्य जात...
एक किलो मळी (मोलॅसिस) सुमारे 500 लिटर बायोगॅस देते...