आपलं शेती उत्पादन वाढवून जीवनमान उंचवायच असेलं, जागतिक बाजारपेठेत आपली उत्पादनं विकायची असतील, तर जे विकतं ते पिकवण्याकडे निश्चितपणे वळलं पाहिजे. एकात्मिक कृषी व्यवसाय व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. या व्यवस्थापनासाठी-
यामध्ये नियोजन करणे महत्त्वाचे आहे.
कृषी उत्पादनाची विक्री हि व्यवस्थापनातील एक महत्त्वाची बाब आहे. आपण जेवढ कष्ट कृषी उत्पादन काढण्यासाठी करतो. तेवढ कष्ट त्याच कृषी उत्पादनाच्या विक्रीसाठी करत नाही. आपल्या मालाच्या किमती मधला दलाल ठरवितो. तो देईल तो भाव आपण मान्य करतो आणि लुटून घेतो. त्यामुळेच सतत कर्जाचा डोंगर वाढतो आणि आत्महत्या करण्याची वेळ येते म्हणून कृषी उत्पादनाची विक्री थेट ग्राहकाला करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी दर्जेदार माल, वर्गीकरण, वाहतूक, पॅकिंग, बाजारोपेठा आणि दरभावाची माहिती मिळविली पाहिजे. याचबरोबर प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून विकले पाहिजेत. ऑफ सिझन कधी येतो, कोणत्या मालाचा तुटवडा कधी असतो, याचा अभ्यास करून, अनुभव जमेला धरून कृषी उत्पादनं पिकविली पाहिजेत आणि त्याची विक्री करून जास्तीचे दोन पैसे मिळविले पाहिजेत.
अशा या सगळ्या बाबींचा विचार शेती व्यवसायाच्या व्यवस्थापनात नक्कीच करायला हवा.
कृषी व्यवसायात भांडवलाला फार महत्त्व प्राप्त झाले आहे, नव्हे आजची शेती ही भांडवली झाली आहे. पीक आराखडा तयार केल्यानंतर त्या त्या पीक – उत्पादनासाठी किती खर्च येणार आहे, याचा अंदाज घेऊन स्व – भांडवल, पीक – कर्ज, तसेच अल्प – मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या कर्जाची सोय वेळेत करून ठेवायला पाहिजे. ऐनवेळी पैशाची म्हणजेच भांडवलाची अडचण येते म्हणून कृषी उत्पादनाच्या संपूर्ण भांडवलाचे नियोजन अगोदर करून ठेवले, तर अडचण निर्माण होत नाही. या गोष्टीला व्यवस्थापनात महत्त्व आहे.
कृषी प्रक्रियेला कृषी व्यवसायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रक्रिया पदार्थाचे उत्पादन केल्यास अनेक फायदे होतात. एके म्हणजे मुल्यवर्धी (व्हॅल्यु – अॅडिशन) होते. बिगरहंगामातही प्रक्रियायुक्त पदार्थ टिकतात. निर्यातीला खूप मोठा वाव असतो. हे सगळे फायदे मिळविण्यासाठी प्रक्रियायुक्त कोणते पदार्थ तयार करता येतील, त्यासाठी कोणत्या संस्थेमार्फत मदत होईल, तांत्रिक मार्गदर्शन कुठे मिळेल, त्याचे साहित्य, या सर्व बाबतीतले नियोजन करून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले पाहिजेत.
कृषी व्यवसायात कुशल आणि अकुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. पीक आराखड्यानुसार मजुरी आणि मजुरांचे नियोजन करावे. त्याचप्रकारे कृषी अवजारे, ट्रॅक्टर, बैल यांचे आवश्यकतेनुसार अगोदरच कायमस्वरूपी नियोजन केल्यास हि साधनं कायमस्वरूपी हाताशी असल्यास शेतीकामात अडचण येत नाही.
अशा या वेगवेगळ्या बाबींच व्यवस्थापन केल्यास देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेत आपली कृषी उत्पादनं विकली जातील आणि आपली आर्थिक परिस्थिती नक्कीच उंचावेल.
एकात्मिक कृषी व्यवसाय व्यवस्थापनेत शेती पूरक व्यवसाय आर्थिक हातभार नक्कीच लावतात. संकरीत दुधाळ जनावर पाळून दुग्धव्यवसाय केल्यास फायद्याचा ठरतो. त्याचप्रमाणे कुक्कुटपालन, शेळीपालन, मेंढीपालन अशा अनेक स्वरूपाचे जवळजवळ ८० – ९० कृषिपूरक व्यवसाय आहेत, यातला आपल्याला करता येण्यासारखा व्यवसाय – उद्योग सुरु करावा म्हणजे व्यवसायातून मिळणारे उत्पन्न आणि कृषी उत्पन्न यातून आपला संसार सुखमय नक्कीच होऊ शकेल. फक्त गरज आहे चांगल्या व्यवस्थापनाची.
लेखक: प्रल्हाद यादव
स्त्रोत - कृषी प्रवचने
अंतिम सुधारित : 6/18/2020
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
गणेश घोरपडे यांनी जिल्ह्यातील सातारा, वाई आणि खंडा...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...