निसर्गात कोणताच कचरा नसतो. कचरा हा आपणच करतो. निसर्गापासून जे आपल्यला मिळतं ते आपण निसर्गाला परत द्यावं असंच अपेक्षित असतं. झाडांचेच उदाहरण द्यायचे झाले तर झाड आपल्याला पाने, फुलं, फळं देतं. आपण ते खाऊन उरलेला भाग त्या झाडालाच योग्य माध्यमातूनं परत करायला हवा. ज्या स्वरुपात निसर्गाला द्यायला हव म्हणजे खताच्या रुपानं झाडाला द्यायला हवं. पण तसं आपल्या हातून घडत नाही. आपण हे सगळं वापर करून उरलेला नैसर्गिक कचरा इथं तिथं फेकून देतो, थोडीफार विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात येतो, पण त्या कचऱ्याचा काही उपयोग अगर वापर करून घेता येईल का याचा विचार न करता विल्हेवाट लावली जाते. निसर्गाला परत करत नही. त्याच्यावर उत्तन उपाय म्हणजे आपण जो कचरा करतो तो आपणच केलाय याची भावना आणि प्रत्यक्ष कार्यवाही प्रत्येकानं ठेवली तर कचर्याचा प्रश्नच राहणार नाही.
सेंद्रिय कचरा आणि असेंन्द्रीय कचरा असे कचऱ्याचे दोन प्रकार आहेत. सेंद्रिय कचरा हा आपलं घर, स्वयंपाक घर, देवघर, जनावरांचा गोठा, हॉल, अंगण इथून तयार होतो. यात भाजीपाल्यांचे उरलेले अवशेष, खरकटे, घरातील धूळ आणि इतर कचरा, निर्माल्य जनावरांची उष्टावळ, शेन – मुत्र, हॉलमध्ये सजावटीसाठी वापरलेल्या वस्तू, अंगणातला केरकचरा, गवत, पालापाचोळा धान्याचा निरुपयोगी भाग अशा किती तरी सेंद्रिय पदार्थांमुळे कचरा निर्माण होतो असेंन्द्रीय कचऱ्याचे स्त्रोत म्हणजे वेगवेगळे कारखाने उद्योग, वर्कशॉप्स, हॉस्पिटल इ. आहेत. नादुरस्त, गांजलेल्या, निरुपयोगी लोखंडी पत्र्याच्या वस्तू, रबरी वस्तू, फायबरच्या वस्तू आणि मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि काच इ. चा असेंन्द्रीय कचऱ्यात समावेश होतो.
घरात जो कचरा निर्माण होतो त्यासाठी खोली आणि आवश्यकतेनुसार लांबी – रुंदी घेऊन एका खड्यात टाकला, त्यात थोडे कंपोस्ट कल्चर टाकलं. तर उत्तम प्रतीचं कंपोस्ट खत तयार होऊन ते आपल्याच पारसबागेतल्या झाडांना घालता येईल. रोजचा घरातला ओला कचरा, निर्माल्य, इतस्ततः न टाकता कंपोस्ट खड्ड्यात अगर गांडूळनिर्मितीच्या खड्ड्यात टाकला तर त्या कचऱ्याचा नक्कीच चांगला फायदा होईल.
जनावरांच्या गोठ्यापासून जो कचरा तयार होतो म्हणजे प्रामुख्याने शेन – मुत्र, उष्टावळ याचा योग्यरीतीनं कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वापर करावा. आपण करतोही, पण योग्य रीतीनं करत नाही. म्हणून कंपोस्ट खत, गांडूळ खत कसं तयार करायचं याची माहिती करून घेऊन त्याची विल्हेवाट लावावी. याचबरोबर झाडांचा पालापाचोळा, इतर केरकचरा हाही झाडून – लोटून कंपोस्ट खड्ड्यात टाकावा. हॉल, अंगणातला कचराही झाडून कंपोस्ट खड्ड्यात टाकून त्याचं कंपोस्ट खत तयार करून झाडांना पिकांना द्यावं म्हणजे त्या कचऱ्याचा योग्य प्रकारे वापर करता येतो. घन होत नाही.
असेंन्द्रीय कचऱ्यात प्रथमतः प्लास्टिक पिशव्या इथं तिथं न टाकता एका ठिकाणी जमवून ठेवाव्यात. रिकाम्या बाटल्या, बल्ब, फुटलेल्या काचा याही एका कोपर्यात साठवून ठेवाव्यात. याशिवाय मोडक्या तोडक्या लोखंडी, फायबर अगर प्लास्टिकच्या वस्तूही कुठेही न टाकता साठवून ठेवाव्यात आणि भंगारवाल्यांना विकाव्यात त्यामुळे या असेंन्द्रीय पदार्थांची ओग्याप्रकारे विल्हेवाट लावता येते. शिवा दोन पैसेही त्यापासून मिळतात. फक्त गरज आहे ती कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन कसं करायची याची. तसेच साक्षरता निर्माण करण्याची, त्याचबरोबर स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याची.
महिला पुरुष, लहान मुलं, शाळकरी मुलं, कामगार या सर्वांना याचं महत्व पटवून देवून कचऱ्याची विल्हेवाट आणि स्वच्छता कशी करायची याची अंगी शिस्त लावून घेतली पाहिजे. प्रत्येकानं आपली व्ययक्तिक जबाबदारी समजून कचऱ्याचा विनियोग खत तयार करण्यासाठी, भंगारवाल्यांना विकण्यासाठी केला तर त्यापासून नक्कीच फायदा आहे. तोटा होणार नाही. सर्व गांव, अंगण, रस्ते, मंदिर, शाळा, पर्यटनस्थळे, बगीचे इ. ठिकाणच्या कचरा व्यवस्थापनात प्रत्येकानं जबाबदारीनं वाटा उचलला तर नक्कीच स्वच्छता राहून आरोग्य चांगलं राहील.
फक्त गरज आहे कचरा व्यवस्थापनाची आणि स्वच्छता साक्षरतेची. यासाठी वयक्तिक पातळीवर आणि सामुदायिक पातळीवर चळवळ सातत्याने म्हणजेच रोजच राबवण्याची, अंगी तशी शिस्त बाळगण्याची.
लेखक: प्रल्हाद यादव
स्त्रोत - कृषी प्रवचने
अंतिम सुधारित : 8/10/2020
दूरदर्शन सह्याद्री निर्मित कचरा म्हणजे काय? कचऱ्या...
डोळयामध्ये कचरा, धातूचे कण, कीटक, इत्यादी जाणे ही ...
घन कचऱ्याची निर्मिती घराघरातून होत असल्याने गोळा ह...
अन्न कचरा म्हणजे काय? अन्न कचऱ्याचे व्यवस्थापन कसे...