कारले लागवडीसाठी मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करून पुरेसे शेणखत मिसळावे. लागवड जून-जुलै आणि जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत करावी. ताटी पद्धतीने लागवड करण्यासाठी 1.5 x 1 मीटर अंतराने लागवड करावी. लागवडीसाठी फुले ग्रीन गोल्ड, हिरकणी या जातींची निवड करावी. लागवडीसाठी प्रतिहेक्टरी दोन किलो बियाणे लागते. लागवडीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास 2.5 ग्रॅम कार्बेन्डाझिमची बीजप्रक्रिया करावी. लागवडीपूर्वी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश प्रतिहेक्टरी द्यावे. पिकावर केवडा, भुरी हे रोग येतात. तसेच फळमाशी, सूत्रकृमीचा प्रादुर्भाव दिसतो.
लागवडीबाबत अधिक माहितीसाठी अखिल भारतीय भाजीपाला सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (02426- 243342) किंवा कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (टोल फ्री क्रमांक - 18002330724) येथे संपर्क साधावा.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य...
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीक...