कृषी संशोधन
केंद्रीय कृषी मंत्रालय अखत्यारीत १९७३ मध्ये ‘कृषी संशोधन आणि शिक्षण’ विभागीय रचना केली गेली. आज आपल्याकडे कृषीविद्यापीठ मधून मोठ्या प्रमाणावर संशोधन होताना दिसते. त्यामुळे आजच्या जागतिकीकरणाच्या काळात शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन उपलब्ध झालेले आहे.
कृषी संशोधनाची उद्दिष्ट्ये
- पिकांच्या संदर्भात वेगवेगळया जातींचा नव्याने शोध घेतला जातो.
- मृदेच्या बाबतीतही नवनवीन शोध सातत्याने लावले जातात.
- वेगवेगळ्या प्रकारची बी-बियाणे, खते, औषधे बनवून शेतकऱ्यांना स्वस्त भावात उपलब्ध करून दिली जातात.
- शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन केले जाते.
- बदलत्या काळाला अनुरूप अशी नवी साधनेही उपलब्ध करून देण्याचे काम या संशोधनातून पुढे आलेले दिसून येते.
- आज कृषीसंशोधनामुळे मिश्र शेतीचा विस्तार ही वाढताना दिसून येतो आहे.
- नवी तरुण पिढीही आज कृषी संशोधानातून एकूण आपली शेती व्यवस्था व शेतकरी यांच्या जीवनमानाचा, राहणीमानाचा दर्जा उंचवावा या दृष्टीने प्रयत्नशील असलेली दिसून येते.
- माती परीक्षण, हवामानाचा अंदाज, पाण्याची उपलब्धता व नियोजन, कमी काळात, कमी वेळात, शरीराला पोषक अन्नद्रव्व्ये असणारी पिके, मानवी आरोग्य, बाजारपेठेतील अस्थिरता लक्षात घेऊन बाजारपेठेत चांगला भाव मिळणारी पिके, कोरडा व ओला दुष्काळ त्या अनुषंगाने असणाऱ्या विविध योजना, सेंद्रिय शेती, स्थानिक वातावरणात तग धरणारी व जास्त उत्पादकता, उत्त्पन्न मिळून देणारी पिके, बी बियाणांची उपलब्द्धता, जमीन व पिकांचे योग्य संगोपन या बाबींचाही विचार आता नव्याने संशोधनात होत आहे.
आज आपल्याकडे कृषीसंशोधनामुळे शेतीच्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्यासाठी शेतकऱ्यांना माहिती सहज उपलब्ध होताना दिसते. अनेक योजना, विविध बि-बियाणांवर संशोधन करून त्यापासून मिळवलेल्या नवीन जाती, कीटक-नाशकांच्या संदर्भात सातत्याने नव्याने होणारे संशोधन, बदलत्या हवामानानुसार शेती क्षेत्रातही वेगाने बदल होत आहेत. म्हणूनच, त्या सर्व गोष्टींना केंद्रवर्ती ठेऊन संशोधन झालेले आपणाला दिसून येते. यामुळे आज आपल्याकडे आधुनिक शेतीचे प्रमाण मोठया प्रमाणावर दिसून येते. जागतिकीकरणाच्या बदलत्या काळात आपल्याला शेती व्यवसायात उंच भरारी घ्यायची असेल तर कृषी संशोधनात सातत्याने होणारे बदल आपल्याला अंगीकारणे जरुरीचे आहे.
अंतिम सुधारित : 6/5/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.