অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

खवानिर्मिती यंत्राबाबत माहिती

खवानिर्मिती यंत्राबाबत माहिती

  1. विविध क्षमता आणि प्रकारांत खवानिर्मिती यंत्र उपलब्ध आहे. यंत्रामध्ये गॅसवर चालणारे, डिझेलवर चालणारे आणि वाफेवर चालणारे, असे तीन प्रकार आहेत.
  2. बहुतांशी गॅसवर चालणाऱ्या यंत्राचा जास्त वापर होतो. प्रति किलो खवा उत्पादनाच्या खर्चात मात्र यंत्रानुसार खर्च वेगवेगळा येतो.
  3. खवानिर्मिती यंत्रामध्ये मोठे गोलाकार भांडे असते. क्षमतेनुसार 0.5 ते 1 एच.पी. मोटारच्या साह्याने भांडे गोल फिरते. भांड्यात असणाऱ्या दोन स्क्रॅपरच्या साह्याने दूध भांड्याच्या पृष्ठभागास म्हणजे तळाला आणि कडेस (दीड ते दोन वीत) लागत नाही. फक्त आपल्याला आचेवर नियंत्रण ठेवावे लागते.
  4. मोठ्या चौकोनी चमच्याने (सुपडी) दूध खाली-वर करावे लागते. या यंत्राची किंमत जारच्या क्षमतेवर अवलंबून असते. याची 65 लिटर, 130 लिटर आणि 260 लिटर क्षमता आहे. वेगवेगळ्या कंपन्यांनुसार थोडाफार बदल असू शकतो. जार क्षमता लक्षात न घेता जास्तीत जास्त आणि कमीत कमी किती दुधापासून खवा बनविता येईल, याचा विचार करावा.
  5. भांड्याच्या क्षमतेनुसार जास्तीत जास्त दूध घेतल्यास खवा तपकिरी रंगासारखा होण्याची शक्‍यता असते; तर कमीत कमी दूध घेतल्यास रंग पांढरा मिळतो. मोठ्या गोलाकार भांड्यात तळाला अर्धवट स्क्रॅपर असतो. जर जास्तीचे दूध घेतले, तर मोठ्या भांड्यात स्क्रॅपर नसलेल्या अर्धवट भागात मोठा चमचा (3 ते 4 फूट) सतत स्क्रॅपरसारखा धरून ठेवल्यास खव्याचा तपकिरी रंग खूपसा कमी होतो.
  6. गोलाकार भांड्यास बाहेरील बाजूस नळही काढलेला असतो. बासुंदी तयार करण्यासाठी, आइस्क्रीम मिक्‍स गरम करण्यासाठी, कुल्फीचे दूध आटविण्यासाठी या यंत्राचा उपयोग होतो.
  7. राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था, कर्नाल येथील शास्त्रज्ञांनी "कंटिन्युअस खवा मेकिंग मशिन' विकसित केले आहे. हे यंत्र हीट ट्रान्स्फर आणि हायड्रोडायनॅमिक्‍सवर आधारित आहे. एका हीट एक्‍स्चेंजरमध्ये दूध 40 टक्‍क्‍यांपर्यंत आटवून ते पुढच्या हीट एक्‍स्चेंजरमध्ये पाठवले जाते.


संपर्क - डॉ. धीरज कंखरे - 9405794668
कृषी महाविद्यालय, धुळे
स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate