गॅलार्डिया फुलपिक
गॅलार्डियाचे पीक वर्षभर घेता येते. हे झाड काटक असल्यामुळे हलक्या ते मध्यम जमिनीत चांगले वाढते. मध्यम पोयट्याची, साधारणतः पाच ते आठ सामू असणारी जमीन निवडावी. पिक्टा प्रकारातील फुले आकाराने मोठी; परंतु सिंगल असतात. लॉरेंझियाना प्रकारातील फुले मोठी व डबल असतात. गॅलार्डिया फुलपिकांच्या गॅलार्डिया ग्रॅंडिफ्लोरा या प्रकारातील जाती बहुवर्षीय असून, त्यांना मोठ्या आकाराची पिवळसर, केशरी आणि लाल रंगाची फुले येतात.
गॅलार्डियाचे नियोजन
- रोपे तयार करण्यासाठी सर्वप्रथम एक मीटर रुंद, 15 सें.मी. उंचीचे आणि योग्य त्या लांबीचे गादीवाफे तयार करावेत. त्यामध्ये चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.
- बी गादीवाफ्यावर ओळीत एक ते 1.5 सें.मी. खोल पेरावे. दोन ओळींतील अंतर 10 सें.मी. ठेवावे. एक हेक्टर लागवडीसाठी 100 ते 150 ग्रॅम बियाणे पुरेसे होते. बी पेरल्यानंतर तीन ते चार आठवड्यांत रोपे चार ते सहा पानांची झाल्यावर लागवडीयोग्य होतात.
- रोपांची लागवड ऑगस्ट, एप्रिल आणि ऑक्टोबर महिन्यांत केल्यास वर्षभर फुले उपलब्ध होऊ शकतात. लागवड सपाट वाफे अथवा सरी वाफे तयार करून करतात.
- जमीन आडवी- उभी नांगरून घ्यावी आणि जमिनीत प्रतिहेक्टरी 25 ते 30 टन या प्रमाणात चांगले कुजलेले शेणखत मिसळून घ्यावे. नंतर सपाट वाफे तयार करून जमीन व हंगामापरत्वे लागवड 45 x 60 सें.मी. अथवा 45 x 30 सें.मी. अंतरावर करावी.
- प्रतिहेक्टरी 55 किलो युरिया, 157 किलो सिंगल सुपर फॉस्फेट व 42 किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. खतमात्रा माती परीक्षणानुसार द्यावी.
संपर्क - 020 - 25693750
राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.