साधारणपणे शेतीमध्ये जलसंधारणासाठी उताराला आडवी मशागत करण्यात येते. चीनमध्ये ज्युब्लजाना विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत विविध पद्धतींचा अभ्यास केला असून, त्याचा तुलनात्मक अभ्यास केला आहे. या पद्धती उतारावरील प्रदेशात प्रामुख्याने वापरल्या जातात; मात्र संशोधकांनी या पद्धतीचा वापर पठारी प्रदेशात करून त्यात आच्छादनासाठी प्लॅस्टिकचा वापर केला होता. त्यातील "आरएफआरआरएच' ही जल संधारणाची पद्धत अधिक कार्यक्षम व वापरण्यास सोपी असल्याचे आढळले आहे.
जल संधारण आणि पाणी साठवणीसाठी (रेन वॉटर हार्वेस्टिंग) मशागतीच्या विविध पद्धती राबवल्या जातात. त्यात प्रत्येक पद्धतीचे फायदे - तोटे आहेत. कोणतीही पद्धत वापरण्यापूर्वी त्याचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने चीनमधील उत्तर पश्चिम प्रदेशातील पठारी प्रदेशात जलसंधारणासाठी आच्छादनासह सरी - ओरंबा पद्धत राबवली होती. या पद्धतीला "रिज ऍण्ड फरो रेनवॉटर हार्वेस्टिंग' (RFRH) असे म्हणतात. यात पावसाच्या पाण्याची साठवण करण्यासाठी काही ओरंब्यांच्या काठावर आच्छादनासाठी प्लॅस्टिक पेपरचा वापर केला जातो. अन्य ओरंब्यांवर गवताच्या साह्याने आच्छादन करून लागवड केली जाते. यामुळे बाष्पीभवनामुळे होणारे पाण्याचे नुकसान रोखता येते. ही पद्धत आता जगभर लोकप्रिय होत आहे. या पद्धतीमुळे पाण्याच्या पातळीत वाढ होते, तसेच पिकाच्या उत्पादनात वाढ होते; मात्र तरीही प्रत्यक्ष शेतावर वापर करताना या पद्धतीत काही अडचणी आहेत.
विशेषतः मातीची मोठ्या प्रमाणात झीज होते, तसेच जास्त पावसाच्या प्रदेशात खते वाहून जाण्याचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे या पद्धतीच्या तुलनात्मक अभ्यासासाठी ओरंबा- सरी- ओरंबा जल संधारण पद्धत (RFRRH) वापरण्यात आली. ही पद्धत सुरवातीला युरोपमधील सपाट प्रदेशात वापरण्यात आली होती. या पद्धतीत प्लॅस्टिकच्या साह्याने दोन ओरंबे आच्छादिले जातात, त्यामध्ये असणाऱ्या सरीमध्ये पाण्याची साठवण केली जाते. त्यात सिंचनाची व्यवस्था न करताही चांगल्या प्रकारे पिकांचे उत्पादन घेता येते. या दोन्ही पद्धतींचा अभ्यास करून त्याचे निष्कर्ष "हॉर्टसायन्स' या संशोधन पत्रिकेत प्रकाशित करण्यात आले आहेत. ज्युब्लजाना विद्यापीठातील संशोधक बोरू गोसर आणि दे बॅरिसेविक यांनी "आरएफआरआरएच' पद्धतीचा वापर करून जांभळे कोन फ्लॉवरची (Echinacea purpurea Moench) चाचणी केली होती.
याबाबत बोलताना गोसर म्हणाले, की स्लोव्हेनिया प्रांतात कोन फ्लॉवर ही महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. त्याची विक्री राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर केली जाते, त्यामुळे या औषधी वनस्पतीचा वापर या दोन्ही पद्धतींची चाचणी करण्यासाठी केला. त्यात प्लॅस्टिक आच्छादनाचे विविध प्रकार तसेच भूजलाची पातळी, पिकाचे उत्पादन आणि तण नियंत्रण यांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या.
."आरएफआरआरएच' पद्धतीत आच्छादनामुळे चांगले निष्कर्ष मिळाले असून, पिकांच्या वाढीच्या सुरवातीच्या काळात कोरड्या हवामानातही भूजलाच्या पातळीत वाढ झाली, त्यामुळे तण काढणीसाठीचा खर्च कमी होऊन पीक उत्पादनात वाढ झाली.
कोरडवाहू भागातील "आरएफआरआरएच' पद्धतीमध्ये आच्छादनाविना असलेल्या शेताच्या तुलनेत भूजलाच्या पातळीत खूप अधिक प्रमाणात वाढ झाल्याचे आढळले.
पूरक सिंचनासहही आच्छादनाचा वापर करूनही "आरएफआरआरएच' पद्धत अधिक फायदेशीर, कार्यक्षम आणि सोपी असल्याचे निष्कर्ष मिळाले आहेत.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
मृदा संधारण : मृदा संधारण म्हणजेच शेतजमिनीचे धुपीप...
जलसंधारणाच्या दृष्टीने नालाबांध महत्त्वाचा आहे. ना...
कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे साल २०१५-...
सेंद्रिय व हिरवळीच्या खतांच्या कमी वापरामुळे जमिनी...