शेतीच्या शाश्वत विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलाच पाहिजे, मात्र जनुकीय परिवर्तित (जी. एम.)तंत्रज्ञानातून पिकांची उत्पादकता खरोखरच वाढते का हे तपासणेदेखील गरजेचे असल्याचा सूर ‘वनराई’ आणि ‘फोरम ऑफ इंटेलेक्च्युअल्स’ ह्या संस्थांच्या वतीने आयोजित ह्या परिसंवादातून उमटला. ‘बी. टी. बियाणे आणि जी. एम. तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य’ ह्याविरुद्ध ‘पर्यावरणासमोरील धोके व शाश्वत सेंद्रिय शेती’ ह्या विषयावरील वैचारिक द्वंद्वाविषयीचा परिसंवाद वनराई कार्यालयात नुकताच पार पडला.
शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते अजित नरदे ह्यांनी जी. एम. तंत्रज्ञानाची सकारात्मक बाजू ह्या परिसंवादात मांडली, तर ‘धरामित्र’ ह्या पर्यावरण तंत्रज्ञान संशोधन केंद्राचे अध्यक्ष डॉ. तारक काटे ह्यांनी जी. एम. तंत्रज्ञानामुळे निर्माण होणार्या आव्हानांसंदर्भातली त्यांची बाजू मांडली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ‘वनराई’चे अध्यक्ष श्री. रवींद्र धारिया ह्यांनी भूषवले. ‘फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स’ ह्या संस्थेचे सतीश देशमुख, कल्पनाताई साळुंखे, पांडुरंग शितोळे, राजीव साने, वसुधा सरदार, गिरधर पाटील तसेच विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि सेंद्रिय शेती क्षेत्रात काम करणार्या वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधी ह्या वेळी उपस्थित होते.ह्या प्रसंगी अजित नरदे म्हणाले, “स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा देशाची लोकसंख्या चाळीस कोटी होती. त्या काळात सेंद्रिय पद्धतीनं शेती केली जात होती. त्यातून उत्पादित होणारं धान्य देशातल्या शंभर टक्के जनतेला पुरू शकेल इतकं नव्हतं.”
“बी. टी. कॉटनचं बियाणं येण्याअगोदर बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी मेटाकुटीला आला होता. त्याला वेगवेगळ्या कीटकनाशकांच्या तेरा फवारण्या कराव्या लागत असत. त्यामुळे शेतकर्यांगचा खर्च वाढत होता. मात्र तरीही बोंडअळीचं नियंत्रण होत नव्हतं. बी. टी. कॉटनच्या बियाणांमुळे औषधांच्या केवळ तीन फवारण्या कराव्या लागतात. बोंडअळीवरही पूर्णपणे नियंत्रण आलं आहे. त्यामुळे शेतकर्यांरची एकरी उत्पादकता वाढली आणि त्यांच्या खर्चातही कपात झाली आहे. हे तंत्रज्ञान 97 टक्के शेतकर्यां्नी स्वीकारलेलं असून या तंत्रज्ञानाबद्दलचा संभ्रम दूर होणं आवश्यक आहे.” असेही नरदे ह्यांनी सांगितले.
डॉ. तारक काटे म्हणाले, “जनुकीय परिवर्तित (जी. एम.) तंत्रज्ञानामुळे उपयुक्त कीटकांना आणि जैवविविधतेला धोका निर्माण होऊ शकतो. पशुपक्ष्यांनाही धोका निर्माण होऊ शकतो. हवामानबदलाच्या पार्श्वभूमीवर पिकांच्या नवीन जाती निर्माण करण्यासाठी रानटी जातींची आवश्यकता आहे, मात्र जनुकीय परिवर्तित तंत्रज्ञानामुळे पिकांच्या रानटी जाती नष्ट होण्याची भीती आहे. बी. टी. कापसामुळे उत्पादकता वाढली असं जे सांगितलं जातं, त्यामागचं मुख्य कारण बी. टी. (कापसाच्या) लागवडीखालच्या सरासरी क्षेत्रात झालेली वाढ हे आहे; बी. टी. (कापसाच्या) एकरी उत्पादनात वाढ झाली असा याचा अर्थ नाही. उलट शेतकरी जी इतर पिकं घेत होते, त्यांखालचं क्षेत्र कमी झालं. त्यामुळे शेतकर्यांलच्या हितासाठी हे तंत्रज्ञान खरंच उपयोगी आहे का आणि या तंत्रज्ञानामुळे उत्पादकता वाढली आहे का हे तपासून पाहणं गरजेचं आहे.“बदलत्या काळानुसार शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणं आवश्यक आहे, मात्र या तंत्रज्ञानाचा वाईट परिणाम पर्यावरणावर आणि जैवविविधतेवर होणार नाही याची दक्षता घेतली जाणं आवश्यक आहे.” असे मत ‘वनराई’चे अध्यक्ष श्री. रवींद्र धारिया ह्यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.
माहिती स्रोत: वनराई
अंतिम सुधारित : 6/5/2020
ओषधी गुणधर्म ओव्यात ब-याच मोठ्या प्रमाणत आहे. ओवा ...
विविध सरकारी क्षेत्रांमध्ये सरकारी सेवांचे वितरण अ...
कर्ण रोपण तंत्रज्ञान (Cochlear Implant) हे एक अत्य...
यावर्षी खरीप हंगामात उशिरा पाऊस पडल्यामुळे ब-याच क...