অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जैवतंत्रज्ञान : जनुक अभियांत्रिकी आणि उतीसंवर्धन

भारतातल्या ११० कोटी लोकसंख्येला अन्नपुरवठा होण्याच्या दृष्टीनं जैवतंत्रज्ञानाचा फार मोठा हातभार लागणार आहे. त्याचे उदहारण द्यायचे झाल्यास आपल्या देशात फ़क्त बी.टी. कापसाचे उदहारण बोलके आहे. बी.टी. जिवानुचा वापर केलेल्या कापसाच्या जातीची लागवड करण्यास सरकारने परवानगी दिल्यानंतर कापसाच्या उत्पादनात वाढ होउन सारया जगात भारत हा कापूस उत्पादनात पाचव्या क्रमांकावर आला आहे.

पण प्रत्यक्ष खाण्याच्या पिकांमध्ये हे पारजीनरुपीय वाणाचे पूर्ण परिक्षण केल्याशिवाय त्याची व्यापारी तत्वावर उत्पादन करण्यास परवानगी देण्यात येणार नाही, असे कड़क निर्बंध सरकारने घातले आहेत.यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर पारजीनरुपीय पिकांचे अभ्यासगट नेमलेले आहेत. त्या शास्त्रज्ञ गटाचे अनुकूल अभिप्राय निर्णय आल्यानंतरच या तंत्रज्ञानाचा उपयोग वांगी, बटाटा, भेंडी, भात, टोमेटो, पत्ताकोबी, फुल कोबी, सोयाबीन, मका, भुईमुग, मोहरी, एरंड, इ. पिकांमध्ये करण्यास परवानगी मिळेल.

शासन या पारजीनरुपीय वानांचे धोके पत्ककरणार नाही.पण सकारात्मक अभिप्राय आले, टार मात्र या वेगवेगळ्या पिकांचं हरितक्रांतिपेक्षा कितीतरी पटीने प्रचंड उत्पादन घेता येईल, यात मात्र शंका नाही.म्हणून भविष्यात जैवतंत्रज्ञानाला फार मोठे महत्त्व आहे.

जैवतंत्रज्ञानाच्या मदतीनं बी.टी. टोक्सिंस हे विष खोडकिडा, बोंडअळी शेंगा पोखरणारी अळी, भुंगे प्रकारातल्या किडी आणि पंख असणार्या  कीडीन्ना मारक ठरणारे आहे. जैवतंत्रज्ञानाद्वारे बी.टी. जनुक वापरून केलेल्या पिकांच्या कोणत्याही भागावर किडिन्नी हल्ला केल्यास वापरलेल्या बी.टी. जनुकामुळे किडिंच्या पचनसंस्थेवर परिणाम होतो.अन्नग्रहण न केल्यामुळे त्या मरतात. किडी बाह्य अवस्थेतच नष्ट झाल्याने पुढच्या पिढ़ीची उत्पत्ति होत नाही. म्हणून रासायनिक औषधांची फवारणी करावी लागत नाही. ३०% पर्यंत खर्चात बचत होते. पर्यवार्नाची हानी होत नाही.

जैवतंत्रज्ञानाच्या दोन शाखा आहेत.

१)उतीसंवर्धन आणि

२)जनुक अभियांत्रिकी (जनेटिक इन्जिनीरींग)

जनुक अभियांत्रिकीद्वारे एखाद्या सुधारित जातिमध्ये दुसरया जातीतील किड-रोग प्रतिकारक जनुक वापरून किड-रोग          प्रतिकारक जात विकसित करता येते.अगर प्रचंड उत्पादनक्षमता असणार्या पिकांतील जनुक दुसरया पिकांत वापरून भरपूर उत्पादनक्षमता असणारी जात विकसित करता येते म्हणजे आपल्याला हव्या त्या गुणधर्माची वनस्पति अगर पिक मिळवि, या जेनेटिक अभियांत्रिकीद्वारे शक्य झालं आहे.म्हणजे वनस्पति स्वत: कधीही करू शकल्या नसत्या त्या आता या प्रगत तंत्रामुळे शक्य झालं आहे.

प्रचलित जातिमध्ये काहीतरी उपयुक्त गुण असतात.त्या गुणांचा वापर करून नविन अधिक उत्पादन देणार्या जाती निर्माण करण, रोगकिडिन्ना प्रतिकारक्षम जाती निर्माण करण, अवर्षणास तोंड देऊन उत्पादनक्षम जाती निर्माण करण. उच्च प्रतिचं प्रथिन निर्माण करण म्हणजे हवे असेल तशा जाती-वाण या तंत्रामुळे विकसित करता येतील यात शंका नाही. जैवतंत्रज्ञानाची दूसरी शाखा म्हणजे म्हणजे उतीसंवर्धन. उतीसंवर्धन तंत्राद्वारे आपण उत्तम प्रतीची अभिवृद्धि फार झपाट्याने करू शकतो. जनुक अभियांत्रिकीद्वारे विकसित केलेल्या वाणाची प्रचंड प्रमाणात अभिवृद्धि या उतीसंवर्धन तंत्राद्वारे करता येने शक्य झालं आहे.गुणधर्म अबाधित राखून रोपांची निर्मिती करता येते.

त्यामुळे जैवतंत्राच्या या दोन्ही शाखा जनुक अभियांत्रिकी आणि उतीसंवर्धन अतिमोलाच्या आहेत. जैवतंत्रज्ञान या उच्च तंत्रज्ञानाचा वापर जगात वाढू लागला आहे.

कृषीक्षेत्रात हे एक क्रांतिकारी तंत्रज्ञान थारू पाहतेय.आपल्या देशाप्रमानेच जग्गाची लोकसंख्या वाढतेच. या वाढत्या लोकसंख्येला पुरेल एवढ अन्नधान्य आणि आरोग्यदायी जीवन देण्याचा प्रत्येक शासनाची जबाबदारी आहे आणि त्या दृष्टीने या तंत्राचा विकास आणि वापर करण्याचा शास्त्रज्ञ मंडळी अहोरात्र प्रयत्न करतात.आपला देशही यात मागे नाही. संशोधन प्रयत्न चालू आहेत.चांगले यश आल्यानंतर वाढत्या लोकसंख्येला नक्कीच आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी सकस अन्नधान्य मिळेलच. शिवाय पर्यावरणाच संतुलन राखण्यासाठी सुद्धा या जैवतंत्राचा चांगलाच फायदा होईल, यात शंका नाही

संदर्भ-प्रल्हाद यादव(कृषी प्रवचने)

अंतिम सुधारित : 7/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate