অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जॉर्जियात सेंद्रिय शेतीला मोठी चालना

जॉर्जियात सेंद्रिय शेतीला मोठी चालना

अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात तर सेंद्रिय शेती व मालाला अधिक उत्तेजन देण्याच्या हेतूने सेंद्रिय शेतीत कार्य करणाऱ्यांचा मेळावा भरवण्यात आला आहे. जॉर्जिया राज्यात सेंद्रिय शेतीला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे. या राज्यात सुमारे 6.85 अब्ज डॉलर क्षमतेचा शेती उद्योग चालवला जातो. या राज्यात सन 2004 ते 2009 या काळात सेंद्रिय प्रमाणित शेतकऱ्यांची संख्या 220 पटीने वाढली आहे. सेंद्रिय प्रमाणीकरण झालेल्या क्षेत्रात सन 2009 पर्यंत 4,100 एकरने वाढ झाली आहे. सेंद्रिय क्षेत्राची वाढ राज्यात चांगली असली तरी अमेरिकेतील काही राज्यांच्या तुलनेत जॉर्जिया अद्याप मागे आहे. सन 2008 मध्ये राज्यात 5.8 दशलक्ष डॉलर क्षमतेच्या सेंद्रिय उत्पादनांची विक्री झाली. अन्य राज्यांचा आढावा घ्यायचा, तर कॅरोलिनामध्ये याच वर्षात 52.8 दशलक्ष डॉलर किमतीच्या सेंद्रिय उत्पादनांची विक्री झाली होती, तर फ्लोरिडामध्ये हीच विक्री 43.4 दशलक्षापर्यंत पोचली होती. सन 2008 पर्यंत कॅरोलिना राज्य सेंद्रिय क्षेत्रात आघाडीवर राहिले.

सेंद्रिय शेतीला पाठिंबा देणाऱ्यांनी विविध धोरणे पुढे आणण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. विद्यार्थ्यांना आरोग्यदायी अन्न उपलब्ध होण्याच्या दृष्टीने तेथील सार्वजनिक शाळांनाही सेंद्रिय मालाबाबत उत्तेजन देण्यास सुरवात झाली आहे. अनेक कंपन्यांनीही या क्षेत्रात प्रवेश केला आहे. एका संगणकीय प्रणाली क्षेत्रातील कंपनीनेही सेंद्रिय उत्पादकांची ऑनलाइन यादी करण्यास सुरवात केली आहे. जॉर्जियात आता होणाऱ्या सेंद्रिय मेळाव्यात सेंद्रिय क्षेत्राची वाढ करण्याच्या दृष्टीने विचारमंथन केले जाईल. एकूणच विविध देशांनी सेंद्रिय शेतीची चळवळ मोठ्या जोमाने पुढे नेण्यास सुरवात केली आहे असे म्हणता येईल.

 

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate