मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील तणनियंत्रण योजना विभागाच्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती : निसर्गात काही वनस्पती अशा आहेत, की ज्या गाजर गवताच्या उगवणक्षमतेवर परिणाम करतात, त्यात केशिया तोरा (उरीीळर ढीेर) तरोटा ही एक वनस्पती आहे. त्याची दुसरी जात केशिया सेरिसिया हीदेखील गाजर गवताच्या उगवणशक्तीवर परिणाम करते. ज्या ठिकाणी या वनस्पती आढळतात, तेथे गाजर गवताचा प्रसार कमी आढळतो.
तरोटा वनस्पतीमध्ये एक विशिष्ट प्रकारचे रसायन असते, जे गाजर गवताच्या बियांची अंकुरणक्षमता कमी करते, त्यामुळे गाजर गवताच्या प्रसाराला नैसर्गिकरीत्या आळा बसतो. तरोटा मेल्यावर रोपे जेव्हा जमिनीवर सडतात तेव्हा त्यातून कोलाइन नावाचे रसायन मातीत मिसळते. त्यामुळे गाजर गवताच्या बियांच्या उगवणक्षमतेवर विपरीत परिणाम होतो.
तरोट्यामुळे जमिनीतील अन्नघटक किंवा जमिनीच्या प्रतीवर काही विपरीत परिणाम होत नाही. त्याचबरोबर त्याचा उपयोग हिरवा चारा, भाजी, वाळलेल्या झाडांचा इंधन म्हणून व त्यांच्या बियांपासून मेण तयार करण्यासाठी होऊ शकतो. त्याचबरोबर तरोट्यामुळे मनुष्य व जनावरांच्या आरोग्यावर कुठलाही विपरीत परिणाम दिसून येत नाही आणि तरोटा जर फार पसरला तर त्याचे नियंत्रण हे सोपे आहे. त्या बिया वजनाने जड असल्यामुळे त्या गाजर गवताप्रमाणे दूरदूर उडून जात नाहीत, त्यामुळे त्याचा प्रसार लगेच थांबविता येतो. शेतकऱ्यांनी जर उन्हाळ्यात तरोट्याची बी जमा करून पाऊस पडण्याआधी ज्या ठिकाणी गाजर गवत उगवते अशा ठिकाणी जर हे बी टाकले तर एक-दोन वर्षांत तिथे गाजर गवताचे प्रमाण कमी होते. या प्रतिस्पर्धी वनस्पतींचा व सूक्ष्म जिवांचा वापर जर केला तर गाजर गवताचे नैसर्गिक पद्धतीने नियंत्रण करता येईल.
- 02452-229000
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
कीटकांद्वारेदेखील या रोगाचा प्रसार होतो
तापमानवाढ आणि आर्द्रतेत घट झाल्यास उसावरील खोडकिडी...
उन्हाळी भुईमुगामध्ये पाने खाणाऱ्या व गुंडाळणाऱ्या ...
डाळिंब पिकामध्ये बॅक्टेरिअल ब्लाइट, मर (फ्युजॅरिय...