অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नांगरटीचे महत्व

नांगरटीचे महत्व

पिकांच्या योग्य वाढीसाठी अनुकूल अशी जमिनीची कायिक स्थिति तयार करण्यासाठी पिक पेरण्यापूर्वी जी जी कामे केली जातात त्यास पूर्वमशागत, असं म्हटल जात.

ज्या जमिनीत पेरलेले बी चांगल उगवून त्याची जोमदार वाढ होऊन त्यापासून भरपूर उत्पादन मिळते ती जमीन चांगली तयार केलेली आहे, असं समजावं, बी पेरण्यायोग्य, जमीन ओलसर, वाफशावर, बारीक़ पोताची, साधारण घट्ट अणि जरुर तेवढी खोल असावी.

पूर्वमशागत ही फार महत्वाची मशागत आहे. या मशागतित नांगरट करावी लागते.योग्य नांगराने जमीन उत्तम प्रकारे नांगरुन उघडी करता येते. निघालेली ढेकळ फोडून चांगली भुसभूशीत करता येते.

चांगली नांगरट झालेल्या जमिनीत पिकाची भरपूर प्रमाणात वाढ होऊन मुळ जमिनीत खोलवर पसरतात आणि भरघोस उत्पादन मिळत. नांगरटीचा चांगला आणि योग्य फायदा मिळवण्यासाठी टी योग्य वेळी आणि योग्य प्रकारे करन अत्यंत आवश्यक आहे.

नांगरटीच काम हे खर्चाच आणि कष्टाच काम आहे. पिकांची काढणी झाल्याबरोबर नांगरट करण फायद्याच आहे. कारण त्या वेळी जमिनीत योग्य तो ओलावा असतो, त्यामुळे बैल नांगरटीला कष्ट पडत नाहीत.मोठी ढेकळ निघत नाहीत.दमणुक कमी होते आणि नांगरटीनंतरची जी जी कामं करायची असतात ती सर्व कामं कमी त्रासाची आणि सुलभ होतात. मात्र पिक काढल्यानंतर जसजसा उशीर होईल तसतसा जमिनीतला ओलावा कमी होऊन जमीन टणक बनते. नांगरटीचा त्रास होतो. मोठी ढेकळ निघतात. म्हणून नांगरट योग्य वेळी करणं फार महत्वाचं असत, खरीप रब्बी अगर इतर पिक निघाल्या नांगरट करावी.

नांगरट उताराला आडवी करावी. दर वर्षी नांगरट करावी लागते, तर काही जमिनीला दोन अगर तिन वर्षांनी जरुरी असते. शिवाय दर वर्षी नांगरट केल्यामुळे कही ठराविक खोलीवर कठिन थर निर्माण होतो. त्यामुळे निचरा होत नाही. म्हणून हा तयार झालेला कठिन थर सब सॉयलर या नांगराने नांगरट करावी.

  1. योग्य वेळी नांगरट केल्यामुळे जमीन दीर्घकाळ सूर्यप्रकाशात उघडी राहून उन्हानं चांगली तापते.
  2. किडीचे अवशेष म्हणजे अंडी-अळी-कोष नांगरटीमुळे वर येतात.उघडे पडतात आणि प्रखर उन्हामुळे त्यांचा नयनत होतो.
  3. पूर्वीच्या पिकाची धसकटे, बुडखे निघतात.
  4. शिवाय पिकांचा पालापाचोळा, निघालेली बुडखे, धसकटे जमिनीत गाडली जाऊन तिथं कुजतात.
  5. थराची उलथापालथ होती.
  6. जमीन भुसभुशीत होते.
  7. हवा, पाणी आणि उष्णता जमिनीत योग्य प्रमाणात खेळती राहते.
  8. हरळी-कुंदा यांसारखी आणि इतर सोटमुळाचे बहुवर्षीय तन उलथूनउघडे पडते आणि उन्हाने मरून जातात. नांगरट केल्यामुळे जमीन भुसभुशित होते.
  9. नांगरट जर उताराला आडवी केली तर उन्हाळी, वादळी पावसच पाणी अडवलं जातं आणिजमिनीत मुरवलं जातं. नांगरटीमुळे निचरा न होणार्या भारी, चिकण आणि रेताड जमिनीत नायट्रोजन आणि पोटाशियम याचं प्रमाण वाढण्यास मदत होते.
  10. त्यामुळे जमिनीचा पोत आणि रासायनिक तसेच प्राणिज गुणधर्म सुधारतात. त्यामुळेच भरघोस उत्पादन मिळते.
  11. बागायती पिकं घेताना सुरवातीला त्यांना करावी लागणारी रानबांधणी आणि दिलं जाणार पाणी योग्य प्रकारे साठवण्यासाठी खोल नांगरट जरुर आहे.

संदर्भ - प्रल्हाद यादव(कृषी प्रवचने)

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate