पंढरपुरी म्हैस ही हलक्या आणि निकृष्ट चाऱ्यावर तग धरून राहणारी काटक जात आहे. अत्यंत प्रतिकूल वातावरणात ही जात चांगले दूध देते. पारड्या वयाच्या 25 ते 30 महिन्यांत गाभण राहतात आणि 35 ते 40 महिन्यांत पहिल्यांदा वितात. मध्यम शरीर, लवकर वयात येणाऱ्या पारड्या, कमी भाकड काळ, पहिल्या वेताच्या वेळी कमी वय, उत्तम प्रजनन, दुग्धोत्पादनक्षमता आणि सातत्य या गुणांमुळे ही जात दुधासाठी चांगली आहे. या म्हशी एका वितामध्ये 1500 ते 1800 लिटर दूध देतात. या म्हशींच्या व्यवस्थापनाबाबत अधिक माहितीसाठी प्रमुख, सर्व समावेशक पंढरपुरी म्हैस सुधार प्रकल्प, कोल्हापूर (0231-2692416) या ठिकाणी संपर्क साधावा.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
करडांच्या शरीरस्वास्थ्य सुयोग्य राखण्यासाठी सकस आह...
अपघातात कायमचे अपंगत्व आलेल्या अकोला जिल्ह्यातील प...
प्रसूतिपूर्व, विताना आणि विल्यानंतर होणारे कोकरांच...
जनावरांची उत्पादकता टिकवण्यासाठी, तसेच त्यांचे आरो...