অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पाने गुंडाळणारी अळी

या अळ्यांचा समावेश लेपिडॉप्टेरा गणात होतो. त्या बहुतेक पायरॅलिडी कुलातील आहेत. त्या हिरव्या किंवा पिवळसर तपकिरी रंगाच्या असतात. या अळ्या पानांच्या कडा एकत्र चिकटवून त्याच्या गुंडाळ्या तयार करून त्यांत राहतात व पाने खातात. परिणामतः अशी पाने वाळू लागतात आणि गळून पडतात. किडीचा उपद्रव जास्त असेल, तर संपूर्ण झाड पर्णरहित होते व त्यामुळे बरेच नुकसान होते.

या किडीचे मादी पतंग कोवळ्या पानावर बहुधा पाठीमागील बाजूस एक-एक अशी अंडी घालतात. ती एक आठवड्यात उबतात व त्यांतून बाहेर पडणार्‍या अळ्या पानांच्या गुंडाळ्या तयार करून त्यांत राहतात व दोन-तीन आठवड्यांत त्यांची वाढ पूर्ण होते आणि त्याच गुंडाळ्यांत त्या कोशावस्थेत जातात. कोशावस्था एक आठवडा टिकते व तीतून पतंग बाहेर पडतात. अशा रीतीने एक महिन्यात एक पिढी पूर्ण होते.

निरनिराळ्या पिकांना उपद्रव देणार्‍या या किडीच्या निरनिराळ्या जाती आहेत. त्यांत कापूस व भेंडीवरील सायलेप्टा डेरोगेटा,वांग्यावरील यूब्लेमा ऑलिव्हेसीया, संत्र्यामोसंबीवरील टोनिका झिझिफाय, भुईमूग, सोयाबीन इत्यादीवरील स्टोमोप्टेरिक्स वंशातील जाती; भातावरील नॅफॅलोक्रॉसिस मेडिनॅलिस या महत्त्वाच्या आहेत.

कपाशीवरील पाने गुंङाळणारी अळी

पाने गुंडाळणार्‍या अळ्यांचा नियंत्रणासाठी अळ्यांसहित पानांच्या गुंडाळ्या जमा करून नष्ट करतात किंवा पिकावंर १०% बीएचसी किंवा कार्बारिल भुकटी उडवितात.

(अ) अळी व गुंडाळ्लेले पान(आ) पतंग

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate