অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पिकासाठी योग्य वातावरणासाठी हरितगृह आवश्‍यक

प्रस्तावना

हरितगृहातील शेतीविषयी शेतकऱ्यामध्ये जागरूकता वाढत आहे. कमी क्षेत्रातून अधिक दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी हरितगृहामध्ये शेती केली जाते. हरितगृह उभारणीपासून विविध घटकांची माहिती आपण या लेखमालेतून घेणार आहोत.

सामान्यपणे हरितगृहाविषयी फारच जुजबी माहिती आपल्याला असते. हरितगृहाची नेमकी संकल्पना जाणून, त्यातील शास्त्रीय तत्त्वाचा वापर केल्यास उत्पादनामध्ये चांगली वाढ मिळू शकते.

हरितगृह म्हणजे काय?

पॉलिथिलीन, पी. व्ही. सी., ऍक्रॅलिक, पॉलीकार्बोनेट किंवा काच यासारख्या पारदर्शक आच्छादनाचा वापर करून बाह्य वातावरणापेक्षा अधिक नियंत्रित वातावरण विशिष्ट प्रकारे तयार केले जाते. पिकांच्या वाढीसाठी आवश्‍यक असे तापमान, सूर्यप्रकाश, आर्द्रता व कार्बनडायऑक्‍साइड हे चार घटक या ठिकाणी नियंत्रित केले जातात.

तापमान

हरितगृहामध्ये दिवसांचे तापमान साधारणतः 23-20 अंश सेल्सिअस व रात्रीचे तापमान साधारणतः 14-19 अंश सेल्सिअसपर्यंत असावे. हे तापमान पिकासाठी पोषक असल्याने पिकाची वाढ चांगली होते. पिकाच्या गुणवत्तेमध्येही सुधारणा होते.

सूर्यप्रकाश

वनस्पतीच्या प्रकाशसंश्‍लेषण क्रियेसाठी 40 हजार ते 60 हजार लक्‍स इतका सूर्यप्रकाश आवश्‍यक असतो. ज्या वेळी उन्हाळ्यामध्ये तापमान जास्त असते, त्या वेळी आपण 50 टक्के पांढऱ्या रंगाची शेडनेट वापरून तापमान कमी केले जाते.

आर्द्रता

हरितगृहामध्ये सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे वनस्पतीची चांगली वाढ होते. सामान्यतः हरितगृहात आर्द्रता 50-80 टक्के असावी. यापेक्षा आर्द्रता जास्त झाल्यास, रोगांचे प्रमाण वाढते. पावसाळ्यामध्ये आर्द्रता वाढलेली असते, ती कमी करण्यासाठी डीह्युमीडीफायर्सचा वापर करावा.

कार्बन-डाय-ऑक्‍साइड

कार्बन-डाय-ऑक्‍साइड हा बाहेरच्या हवेत 300 प्रतिदशलक्षांश किंवा 0.03 टक्के एवढा असतो. हरितगृहात रात्री वनस्पतीने सोडलेला कार्बन-डाय-ऑक्‍साइड हा 1500-2000 प्रतिदशलक्षांश एवढा जास्त असतो. तोच कार्बन-डाय-ऑक्‍साइड हरितगृहात साठून राहतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवल्यानंतर वनस्पती प्रकाशसंश्‍लेषण क्रियेसाठी तोच वापरतात.

वायुविजन : हरितगृहातील हवा खेळती ठेवण्यासाठी योग्य प्रकारच्या वायुविजन पद्धतीचा वापर केला जातो. त्याच्यामुळे हवेतील आर्द्रताही वाढते. नैसर्गिक वायुविजन पद्धतीत हवा खेळती राहण्यासाठी हरितगृहाच्या दोन्ही बाजू उघडल्या जातात. तसेच दिवसा एक्‍झॉस्ट फॅनचाही उपयोग केला जातो.

हरितगृहाचा उद्देश

  1. वनस्पतीचे पाऊस, गारपीट यापासून संरक्षण मिळविण्यासाठी.
  2. पिकास आवश्‍यक ते योग्य तापमान नियंत्रित करण्यासाठी.
  3. साधारण वातावरणामध्ये जी पिके येत नाहीत त्यांचे योग्यरीतीने संगोपन करण्यासाठी.
  4. पिकास आवश्‍यक तो योग्य सूर्यप्रकाश नियंत्रित करण्यासाठी.
  5. पिकास आवश्‍यक ती आर्द्रता नियंत्रित करण्यासाठी.
  6. प्रकाश संश्‍लेषण क्रियेसाठी आवश्‍यक कार्बन-डाय-ऑक्‍साइड नियंत्रित करता येतो.
  7. बिगर हंगामात वर्षभर पिके घेता येतात.
  8. कीड व रोगांपासून कमी अधिक बचाव शक्‍य होतो.
  9. टिश्‍यूकल्चरपासून केलेल्या रोपांना कणखर बनविण्यासाठी.
  10. उच्च प्रतिच्या पिकांचे संशोधन करण्यासाठी.

फायदे

  1. वर्षभर पिके घेता येतात.
  2. बाजारपेठेतील मागणीप्रमाणे पिकांची लागवड करता येते.
  3. पिकास आवश्‍यक तापमान व आर्द्रता फॉगर्सच्या साह्याने निर्माण करता येते.
  4. उच्च प्रतिचे उत्पादन मिळते.
  5. भाजीपाला पिके, फुलपिके, औषधी व सुगंधी वनस्पती, मसाला पिके यांची यशस्वीपणे लागवड करता येते.
  6. पिकाचे अती व कमी तापमान वारा, पक्षी, कीटक यांच्यापासून संरक्षण होते.
  7. लागवडीस अयोग्य जमिनीवरही माती किंवा अन्य माध्यमाचा वापर करून हरितगृहात चांगले उत्पादन घेता येते.
  8. भाजीपाला पिकांच्या जाती व बिजोत्पादन करण्यासाठी उपयोग होतो.

अडचण

  1. सुरवातीचे भांडवल जास्त लागते.
  2. कीड व रोग एकदा आले, तर नियंत्रण करणे अवघड होते.
  3. दर 3 वर्षांनी पॉलीफिल्म बदलावी लागते.
  4. दररोज सकाळी व सायंकाळी बाजूचे पडदे उघडणे व बंद करणे.
  5. कुशल मनुष्यबळाची आवश्‍यकता.
  6. सतत देखभाल खर्च आवश्‍यक.
  7. वेगवेगळ्या पिकाच्या आवश्‍यकतेनुसार प्रकाश, आर्द्रता, तापमान नियंत्रित करणे अवघड.
  8. जिवाणूजन्य रोगांचे प्रमाण जास्त असते.

हरितगृहामध्ये आपण खालीलप्रकारची फुलपिके चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो.
अ.क्र.----पिकाचे नाव----तापमान (अंश(c)----आर्द्रता (टक्के)----सूर्यप्रकाश (लक्ष) 
0----0----दिवसाचे----रात्रीचे----0 
1.----कार्नेशन----6.20----10-12----6065----4000-50000 
2.----शेवंती 
अ) कट फ्लावर---- 22-24 ----15-16 ----60-65 ----35000-40000 
ब) कुंडी---- 23-26---- 16-19----60-65----35000-40000 
3.----जरबेरा----2024----18-21----60-65----40000-50000 
4.----ऑर्कीड----22-24----18-20----70-80----25000-30000 
5.----ऍन्थुरियम----22-25----18-20----70-80----25000-30000 
6.----गुलाब----24-28----18-20----65-70----60000-70000 

(काटेकोर शेती विकास केंद्र, जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 8/7/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate