অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रभावी आणि कार्यक्षम प्रशिक्षण - स्थळाचे महत्व

प्रभावी आणि कार्यक्षम प्रशिक्षण - स्थळाचे महत्व

प्रशिक्षणे हे व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासाचे एक मध्यम, नाविन्यपूर्ण माहितीची चर्चा, सादरीकरणाचे उत्तम व्यासपीठआणि शंकांचे समाधान करणारी प्रयोगशाळा हि  संकल्पना आहे. प्रशिक्षणमुळे मनुष्यास ज्ञानप्राप्ती, कौशल्य विकास आणि दृष्टीकोनात बदल घडविण्या करिता अत्यंत महत्वपूर्ण साधन मानले गेले आहे.

प्रशिक्षणे देण्याकरिता विविध संसाधनाचा वापर केला जातो. उदा.तज्ञ प्रशिक्षक,प्रशिक्षण साहित्य,वाचन साहित्य, गट चर्चा सत्र, सादरीकरण आणि प्रात्यक्षिक क्षेत्रीय भेट इ.सोबतचपरिपूर्ण प्रशिक्षणा करिता  - प्रशिक्षण स्थळाला अनन्य साधारण महत्व दिले जाते. हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे.प्रशिक्षण हे  फक्त क्लास रूम असेल तर विशिष्ठ कालावधी नंतर प्रशिक्षणार्थी कंटाळून जातात त्या मुळे त्यामध्ये प्रात्याक्षिके, सहल इ. चा सहभाग असणे गरजेचे आहे. प्रशिक्षण केवळ प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी यांच्यात मर्यादित न राहता एक सकारात्मक वास्तव दृष्टिकोन निर्माण करण्याकरिता महत्वाचे सिद्ध झाले आहे.

एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम अंतर्गत कृषी सहाय्यक / WDTकरिता कृषी व्यवस्थापन हे प्रशिक्षण राज्य संसाधन संस्था द्वारे आयोजित करण्यात येते. त्यामुळे योग्य प्रशिक्षण प्रभावी आणि कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने संपदा ट्रस्ट या संस्थेकडून एक प्रयोग करण्यात आला.  कृषी सहय्याकांकारिता ५ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन २७ एप्रिल २०१५ ते ०१ मे २०१५ राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील मुळा प्रवरा अतिथी गृहामध्ये करण्यात आले.

राहुरी कृषी विद्यापीठ राज्य महामार्गावर स्थित असल्यामुळे सर्व प्रशिक्षणार्थ्याना प्रशिक्षण स्थळी पोहचण्यास  सोयीस्कर आहे. विद्यापीठामध्ये भौतिक सुविधांची उपलब्धता, प्रशिक्षकांचा सखोल अभ्यास आणि उदिष्टानुसार प्रशिक्षणाची मांडणी, सुसज्ज नियोजन असल्या मुळे प्रभावी होण्यास मदत झाली. प्रशिक्षनार्थींकरिता योग्य बैठक व्यवस्था, प्रात्यक्षिकांची उपलब्धता या मुळे वेळापत्रकाप्रमाणे प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले .

तज्ञ प्रशिक्षक /शास्त्रज्ञ यांची उपलब्धता असल्यामुळे प्रशिक्षण हे प्रशिक्षक केंद्रित न राहता वर्गाबाहेरील प्रत्याक्षिकाचा समावेश होऊ शकला, भविष्यात ते प्रत्यक्ष उपयोगी कसे पडेल यावर भर दिला गेला.राहुरी कृषी विद्यापीठांमध्ये जैवतंत्रज्ञान, नॅनोटेक्‍नॉलॉजी अशा नवनव्या क्षेत्राची दालने खुली केली आहेत. उत्पादनापासून मार्केटिंगपर्यंतच्या अनेक बाबींच्या सक्षमीकरणासाठी संशोधन होते आहे.तज्ञ  प्रशिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून फक्त व्याख्यान पद्धतीचा वापर न करता सादरीकरण,कृतीशीलसत्रे आणि चर्चासत्रे यांचा अवलंब केला या मुळे प्रशिक्षणात चैतन्य निर्माण होऊ शकले.

प्रशिक्षणा दरम्यान कृषी विद्यापीठाचा शिवारफेरीचा उपक्रम देखील अत्यंत उपयुक्त ठरला. यानिमित्ताने शेतकरी-प्रशिक्षणार्थी-शास्त्रज्ञांचा संवाद घडणे शक्य होऊ शकले .

कृषी विद्यापीठांच्या मोठी प्रक्षेत्रे व उपलब्ध पायाभूत सुविधांचा उपयोग ह्या प्रशिक्षणात करून घेता आला. राज्य संसाधन  संस्था ह्या प्रशिक्षण आयोजनाकरिता सक्षम असल्यातरी ब-याच वेळा साधन व्यक्तींच्या उपलब्धतेचे प्रश्न निर्माण होतात. वेळेवर नियोजित विषय शिकविण्यासाठी साधन व्यक्ती काही अडचण मुळे न  आल्यास तो विषय पुढे ढकलावा लागतो किंवा इतर व्यक्तीस पूर्ण करावा लागतो.ह्या अनुषंगाने विद्यापीठ आवारात प्रशिक्षण आयोजन केल्यास या विषयीच्या अडचणी दूर होतात आणि प्रशिक्षण कालावधी मध्ये सत्र कार्यक्षमपणे पूर्ण करता येतात.

दुसरे म्हणजे कृषी विद्यापीठ हे कृषी संशोधन शिक्षण व विस्तार या मुख्य उद्दिष्टयामध्ये काम करीत असल्यामुळे प्रशिक्षणार्थीना नवीन संशोधन, शिक्षण -साहित्य आणि लोकांपार्यात हे कसे पोह्चवावे या बाबत शास्त्रीय दृष्ट्या मार्गदर्शन मिळते .

कृषी विद्यापीठात घेतलेल्या प्रशिक्षणाचे एक ठळक वैशिष्टय हे आहे कि, शिकवलेले तंत्रज्ञान संकल्पना लगेच प्रत्यक्ष स्वरुपात पाहता येतात आणि "Seeing Is Believing"या उक्तीस सार्थ आशी अनुभूती प्रशिक्षानार्थ्याना प्राप्त होते.

प्रशिक्षण केंद्र हे प्रशिक्षणार्थीना सक्षम बनविण्याचे अति उत्तम साधन आहे. प्रशिक्षण देणे हि एक कला आहे.आशय ज्ञान संपन्न अत्यंत कुशल तंत्रज्ञान संपन्न,तज्ञ प्रशिक्षकांमुळे प्रशिक्षण सुसह्य होते.या सर्व सुविधा राहुरी येथील कृषी विद्यापीठामध्ये सहजपणे उपलब्ध आहेत.

प्रशिक्षण स्थळाची निवड या निकषावर आधारित केल्यास, प्रशिक्षणे प्रभावी आणि उद्दिष्ट साध्य करणे  करिता उपयुक्त होतो हा अनुभव आहे.

 

लेखक : अनिरुद्ध मिरीकर, वॉटर, अहमदनगर

अंतिम सुधारित : 7/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate