অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बायोडिझेल (जैवइंधन)

बायोडिझेल (जैवइंधन)

वनस्पतिजन्य तेलापासून तयार केलेले इंधन म्हणजे जैविक इंधन. यासाठी खाद्य आणि अखाद्य तेलाचा उपयोग करता येतो, पण खाद्यतेलाची टंचाई असल्यानं खाद्य तेलं वापरण योग्य नाही.यासाठी अखादय तेलाचा वापर जरुर करता येईल म्हणून अखाद्य तेल बियांच्या कोणत्य वनस्पति आपल्याला चांगलं उत्पादन देऊ शकतात. याचा जरुर विचार करायला हवा. तसं पहिलं तर पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि कमी पुरवठ्यामुळे सर्वजन काळजीत आहेत.

गतिमान विकसात प्रत्येक गोष्टीत ऊर्जेची आवश्यकता असते. पाहिजे तेवढ्या प्रमाणात या इंधन ऊर्जेचा पुरवठा होत नाही. विकासासाठी इंधन ही अपरिहार्य बाब आहे. आपल्याला कोळशापासून आणि खनिज तेलापासून उर्जा मिळत असते.खनिज तेल हे वाहतुकीसाठी फार मोठ्या प्रमाणात वापरल्या जातं. पण त्याचा पुरवठा मर्यादित आहे. भविष्यात नक्कीच मर्यादा येणार आहेत, हे ओळखून सर्वजन पर्यायी इंधन स्रोताच्या शोधात आहे. आपल्याकडे भविष्यात सौरउर्जा, पवनउर्जा, इथेनोल, बायोगैस कचरयापासून उर्जा, बायोडिझेल पासून उर्जा आणि समुद्राच्या पाण्यापासून उर्जा इ. उर्जांचा वापर करण्यावर भर दिला आहे. त्यामध्ये जैविक इंधनाचा पर्याय मोठ्या प्रमाणात पुढे आला आहे.

आपल्याकडे हवामानाचा विचार केला तर वनएरंड, जोजबा, करंज, एरंडी, कडूनिंब, सिमारोबा इ. झाडांची जैविक इंधन साठी लागवड करू शकतो, शेतकरी बायोडिझेल एवढेच फ़क्त निर्माण करू शकतो आणि साठवून ठेऊ शकतो. इतर कोणतेच स्रोत तो सुरु करू शकत नाही आणि इतर स्रोतापासून मिळणारी उर्जा साठवून ठेऊ शकत नाही. बायोडिझेल मात्र साठवून ठेवता येते. याच्यावर चालणारी विद्युत निर्मिती यंत्रणा, डिझेल पंप, तसेच कृषि यंत्रे (थ्रेशर, ट्रक्टर, ट्रक) चालवता येतील. डिझेलमध्ये १०% पर्यंत बायोडिझेल मिसळले, तर ते फारच चांगले आहे सुरक्षित आहे. विशेषतः वाहतुकीसाठी फारच उपयुक्त ठरतेय. असे संशोधनांती  आणि अनुभवावरून सिध्य झालेलं आहे. रेल्वे डिझेल इंजिन, शेतीचे पंप, ट्रक्टर चालविले आहेत. किंबहुना डिझेलपेक्षा जैव इंधन फारच उपयुक्त आहे.भविष्यात खुप मोठा वाव आहे. जैविक इंधनाची सध्याची गरज आणि होणारा पुरवठा यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तफावत आहे आणि ही तफावत दूर करण्यासाठी अखाद्य तेल बियांच्या निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली पाहिजे.

आपल्याकडे पडीक जमीन, डोंगरउतरणीच्या जमिनी नदी नाल्याचे काठ, बांध रस्त्याच्या दुतर्फा, मैदानाच्या सभोवारच्या बाजु, कुंपन अशा जिथं पिक पेरता येत नाही अशा प्रचंड प्रमाणात नापीक क्षेत्रावर विनाउपयोगाची झाड झुड़प, तरवड, टेकळी, हेकळी, वेगवेगळे शेर, वेडीबाभुळ, ककटस, केकताड, घायपात इ. वनस्पतीच झाडं भरमसाठ वाढलेली आपण पाहतोय. ही झाडं काढून नियोजनबद्धरित्या जिथं जगा सापडेल त्या ठिकाणी खाजगी गावठण शासकीय अगर वन जमिनीवर गावातल्या गावकर्याँनी सामुदायिकरित्या श्रमदानाने पावसाळ्यात वनएरंड, जोजबा, करंज, एरंडी, कडूनिंब, सिमारोबा इ. याची लागवड केली १-२ जोपासली तर निश्चितपणे या गावाची इंधन पुर्तता  या तेलबियांच्या झाडापासून पूर्ण होऊन भागात प्रदुषण कमी होईल. इंधन आयात करण्याची वेळ यायची नाही. रोजगार उपलब्ध होईल. जे खनिजतेल आहे ते साठ्याच्या स्वरूपात आहे. ते कधी ना कधी संपणाराच आहे. पण तेल बियांपासून जे इंधन मिळणार आहे ते दरवर्षी होणार्या तेलबियांच्या उत्पदानामुळे मिळणारचं आहे. त्याचा साठा संपेल अशी भीती नाही. उलट जेवढं जास्त तेलबियांच उत्पादन तेवढी जास्त इंधन निर्मिती त्याला मर्यादा नाही.

ट्रांन्सइस्टरीफिकेशन पद्धतीने कोणत्याही वनस्पतिजन्य तेलापासुन म्हणजे खाद्य अगर अखाद्य तेलापासून बायोडिझेल तयार करता येते.

बायोडिझेलचे अनेक फायदे आहेत.

१) जैव इंधन हे एक अपारंपारीक स्रोत आहे.

२) जैव इंधन कोणत्याही तेअलापासून बनविता येते.

३) जैव इंधन तयार करण्याची अत्यंत सरळ सोपी कमी खर्चाची आणि घरगुती पद्धत आहे.

४) जैव इंधनात १० ते ११% ऑक्सीजन असल्याने १००% ज्वलनशील आहे.

५) जैव इंधानात गंधकाचे प्रमाण नगण्य असते.

६) जैव इंधन त्वरित पेटते.

७) जास्त दिवस साठवून ठेऊन पाहिजे तेव्हा वापरता येतं.

८) जैव इंधन दुर्गंधीरहित आहे.

९) अत्यंत कमी आणि पांढरा धुर निघतो.

१०) कार्बन डायऑक्साईड आणि गंधाकाचं प्रमाण कमी असल्यानं प्रदुषण कमी होते. हाताळण्यास आणि वापरण्यास सोपे आहे.

११) डिझेलला पर्याय.

१२) पडीक नापीक जमिनीचा वापर.

१३) स्वयंरोजगाराला चालना मिळेल.

पर्यावरणाच्या प्रदुषणाला आळा बसेल. म्हणून या अखाद्य तेल बियांच्या (एरंड, लिंब, करंज, जोजबा) लगवादिची एक चळवळ म्हणून राबवूया.

संदर्भ - प्रल्हाद यादव(कृषी प्रवचने)

अंतिम सुधारित : 8/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate