অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भारतीय चहा बोर्डाची पीक संरक्षण नियमावली

सुरक्षित चहा उत्पादनाला मिळेल प्रोत्साहन

भारतीय चहा बोर्ड या संस्थेने पीक संरक्षण उत्पादनाच्या सुरक्षित वापर वाढविण्याच्या हेतूने पीक संरक्षण नियमावली (प्लॅट प्रोटेक्शन कोड) प्रसारित केली आहे. त्यामुळे चहा उत्पादन पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि आरोग्यदायी होण्यास मदत होणार आहे. त्यामध्ये कीडनाशकांचा वापर कमी करण्यावर भर असणार आहे.

जागतिक पातळीवर चहा उत्पादनातील कीडनाशकांच्या अवशेषासंदर्भात मोठी जागरूकता होत असून, अवशेषमुक्त उत्पादनांच्या मागणीमध्ये वाढ होत आहे. भारतीय चहा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचविण्यासाठी चहा बागेमध्ये पर्यावरणपूरक पीक संरक्षण पद्धतीचा सुरक्षित वापर करण्याची गरज वाढत आहे. त्यासाठी भारतीय चहा बोर्डाने पीक संरक्षण नियमावली तयार केली आहे. ही पीक संरक्षण नियमावली भारतीय चहा मळ्यातील प्रत्यक्ष परिस्थिती आणि जागतिक पातळीवर स्वीकारार्ह तत्त्वे यांचे मिश्रण आहे. यामध्ये चहा उत्पादन आणि प्रक्रिया या दोहोचा समावेश आहे.

चहा बोर्डाची पीक संरक्षण नियमावली

  • या नियमावलीमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनांचा अंतर्भाव केला असून, त्यामध्ये कीड नियंत्रणासाठी विविध पद्धती आणि तंत्रांचा अधिक योग्यरीतीने वापर शक्य आहे. त्यामुळे आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली कीडीचा प्रादुर्भाव ठेवणे शक्य होणार आहे.
  • ही एकात्मिक कीड व्यवस्थापन प्रणाली किडी आणि रोगांच्या जैविक साखळीच्या माहितीवर आधारित असून, नियंत्रणासाठी वापरलेल्या पद्धतीचे आर्थिक गणित आणि कीडनाशकांच्या वापराचे माणसांचे आरोग्य व पर्यावरणातील अन्य उपयुक्त घटकांवरील परिणामांचा विचार करण्यात आलेला आहे.
  • यामध्ये विविध कीडनाशकांच्या व तणनाशकांच्या वापरासाठी शिफारशीत प्रमाण मांडण्यात आले आहे. त्यामुळे चहा उत्पादकांसाठी एकत्रित स्वरूपामध्ये पीक संरक्षण नियमावली फायद्याची ठरणार आहे. या पद्धतीचा वापर केल्याने काढणीपश्चात कीडनाशकांचे अवशेष कमी राहण्यास मदत होईल.
  • या नियमावलीमुळे पीक संरक्षण फॉर्म्युलेशनच्या वापरासंबंधी सजग राहण्यास प्रोत्साहन मिळेल. कीडनाशकांच्या वापराच्या सुरक्षित पद्धती आणि प्रमाण कमी करण्यासाठी उपयुक्त राहणार आहे.
  • भारतीय चहा बोर्ड अन्न सुरक्षिततेच्या प्रमाणकांच्या कार्यक्षम वापराकडे लक्ष पुरवित असून, त्यातून चहा उद्योग अधिक शाश्वत होण्यास मदत होईल, चहा मळ्यामध्ये लागवडीसाठी, कामगार व अल्पभूधारक शेतकरी यांच्यासाठी अधिक चांगले वातावरणनिर्मिती केल्याने दीर्घकाळासाठी चहाचा पुरवठा करणे शक्य होणार आहे.

 

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate