অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राष्ट्रीय कृषि विमा

नैसर्गिक अगर इतर कारणानी उत्पनातघट आल्याने कर्जाची परतफेड न होऊ शकल्याने पहिल्या वर्षी तोट्यात. शिवाय पत नाहीशी होते. दुसरया वर्षी निसर्गाने साथ दिली तर भांडवला अभावी पीक उत्पादन घटले. अशा दुष्टचक्रात शेतकरी सापडून कर्जबाजारी होऊ लागले. यातूनच आत्महत्या घडू लागल्या.यातूनच दिलासा देण्यासाठी पीक विमा सुरु करण्यात आला. वैयक्तिक पातळीवर विमा संरक्षणासाठी शेतकर्यांच्या मोठी संख्या अधिक पिकाखालच्या क्षेत्राचा प्रचंड पसारा यामुळे अडचणी आल्या म्हणून क्षेत्र घटक धरून पीक विमा योजना सुरु केली.

पेरणी केलेल्या क्षेत्राला विमा संरक्षण

१९८२ साली पथदर्शक तत्वावर पीकविमा सुरु केला.१९८५ मध्ये सर्व प्रमुख खरीप रब्बी पिकांसाठी तालुका क्षेत्र धरुन सर्वकश पीकविमा सुरु केला.प्रतिकूल परिस्थितिमध्ये शेतकर्यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या दृष्टीने पीककर्ज़ घेणार्या कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतकर्यांना राष्ट्रीय कृषि विमा योजना सुरु करण्यात आली. पेरनी केलेल्या संपूर्ण क्षेत्राला विमा संरक्षण देण्याची तरतूद या राष्ट्रीय कृषि विमा योजनेत करण्यात आली. राष्ट्रीय कृषि विमा योजना सुरु करण्यापाठीमागचा उद्देश्य म्हणजे-१)नैसर्गिक आपत्तीमध्ये तसेच किडरोगाचा प्रादुर्भाव झाल्यास शेतकर्यांना दिलासा देणे.२) शेतकर्यांच्या शेतामध्ये प्रगत तंत्रज्ञान तसंच योग्य त्या निविष्ठा वापरण्यास देणे .आपत्तीसमयी शेतकर्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी मदत करणे.या राष्ट्रीय कृषी विम्याची वैशिष्ट्ये म्हणजे-

  • विम्याची व्याप्ती वधाव्लेली आहे.
  • विमा संरक्षित रक्मेवरील मर्यादा काढून टाकलेली आहे.
  • विमा रकमेची व्याप्ती वाढवून त्याची सांगड़ सरासरी उत्पन्न आणि किमान आधारभूत किंमत यांच्याशी घालण्यात आली आहे.

अल्प आणि अत्यल्प भुधारकांसाठी पीकविमा हफ्ता रकमेत १०% अनुदान. अनेक पिकांच मंडळनिहाय उम्बरठा उत्पन्न हे त्या पिकाच्या मागच्या ३-५ वर्षांचे सरासरी उत्पन्न आणि त्या पिकाची जोखिमस्तर विचारात घेऊन निश्चित करण्यात आलाय शिवाय जादा पीक संरक्षित रक्कम उत्पन्नाच्या १५०% पर्यंत शेतकर्यांना विमा उपलब्ध आहे.अशी या राष्ट्रीय कृषि विम्याची वैशिष्ट्ये आहे. राष्ट्रीय कृषि विमा योजनेचा लाभ क़र्ज़दार आणि बिगरकर्ज़दार शेतकर्यांना घेता येतो. शिवाय खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळासाठीसुद्धा हा विमा खुला ठेवण्यात आला आहे.हा पीक विमा विविध पिकांसाठी दिला जातो. तृणधान्यांमध्ये भात, खरीप, ज्वारी, बाजरी, नाचनी, मका या पिकांसाठी कडधान्यांमध्ये तुर, मुग, उडीद, गळीत धान्यांमध्ये भुईमूग़, सोयाबीन सूर्यफुल, तीळ, कारळा आणि नगदी पिकांमध्ये ऊस,कापूस,कांदा या पिकांसाठी राष्ट्रीय कृषी विमा लागु करण्यात आला आहे.

राष्ट्रीय कृषी विम्याचा लाभ

राष्ट्रीय कृषी विम्याला क्षेत्राची आणि रकमेची मर्यादा नाही. संबंधित शेतकरी त्याच्याकडे असलेल्या क्षेत्राच्या आधारे विमासंरक्षण घेऊ शकतो. प्रतिहेकटरी किमान विमा संरक्षण सरासरी उंबरठा उत्पन्न गुणिले किमान आधारभूत किंमत यांच्यापेक्षा १५०% पर्यंत रक्कमेवर कमाल विमा संरक्षण घेता येईल. पिकाप्रमाणे विमा हफ्त्याचे दर ठरविलेले असतात.हे हफ्ते भरून त्या त्या पिकांसाठी संरक्षण मिळविता येते. अल्प आणि अत्यल्प सुधारकांकडे १ हेक्टर क्षेत्र असण अपेक्षित असून १०% अनुदान देण्यात येतं. मका, कांदा, ऊस पिकांसाठी तालुकास्तर आणि इतरत्र पिकांसाठी महसूल मंडळ हे घटक ठरविण्यात आलेले आहेत. पीककापणी प्रयोगावर आधारित सरासरी उत्पन्न (उंबरठा उत्पन्न)त्या मंडळ / तालुक्याचे ठरविण्यात येतं.

विहित अर्ज़ भरून त्यासोबत ७/१२ चा उतारा आणि ८अ या कागदपत्रांची आवश्यकता असून, बँकेत खातं असण आवश्यक असतं. या विमासंरक्षणाचे अर्ज़ मुदत संपायच्या आत पाठवायचे असतात. त्या तारखा वेगवेगळ्या माध्यमांद्वारे घोषित केल्या जातात. अगर जि.म.सं. बैंका, राष्ट्रीयीकृत बैंका, वि.का,से. सोसायटया ,कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी, कृषी शासकीय कर्मचारी यांच्याकडूनही या बाबतीत मार्गदर्शन मिळू शकते.राष्ट्रीय कृषी विमा ही शेतकर्यांना दिलासा देणारी आहे.त्यामुळे परिस्थितिनुरूप त्याच्यात लवचिकपणा तर निश्चितच असला पाहिजे.शिवाय त्याच्यातील अडचणी क्लिष्टता कमी करुन अगदी तळागाळातल्या शेतकर्यांपर्यंत राष्ट्रीय कृषी विम्याचा लाभ मिळाला पाहिजे,तरच खरया अर्थाने उद्देश्य सफल होतील.

संदर्भ - प्रल्हाद यादव (कृषी प्रवचने)

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate