অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लक्षात घ्या शेततळ्यातील तांत्रिक दोष

ज्या शेतकऱ्यांनी शेततळ्यांच्या मुखात उपचार केलेले नाहीत व शेताची मशागत ही पारंपारिक पद्धतीने म्हणजेच उताराला उभीच केली आहे. अशा शेततळ्यांची तूटफूट झाली. संरक्षित पाण्यासाठी शेततळ्याचे महत्त्व लक्षात घेऊ शेततळ्याचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.
जिरायती भागात काळ्या खोल जमिनीच्या प्रत्येक शेतात एकूण क्षेत्रफळाच्या 3 ते 4 टक्के क्षेत्रावर योग्य ठिकाणी शेततळे असलेच पाहिजे. ज्या शेतकऱ्यांकडे 20x20x3 मी. किंवा 30x3 मी. आकाराचे शेततळे पूर्णपणे भरलेले असेल त्या वेळी अनुक्रमे 750 ते 1950 घ.मी. पाणी उपलब्ध होऊ शकते. साधारणपणे 2.5 ते 6.5 हेक्‍टर क्षेत्रावर सूक्ष्म सिंचन पद्धतीने पाण्याचा वापर करून 30 मि.मी. खोलीचे एक संरक्षित ओलीत देणे शक्‍य आहे. बरेच शेतकरी मोठ्या प्रमाणात अलीकडे खरिपात संरक्षित ओलीत करीत आहेत. तसेच उशिरा येणाऱ्या पावसात शेततळे पुन्हा भरत असल्यामुळे पुढे हरभऱ्यासारख्या पिकालासुद्धा संरक्षित ओलीत करणे शक्‍य होते.
1) ज्या शेतकऱ्यांना शेततळे करावयाचे आहे, त्यांनी मूलस्थानी जलसंधारणाच्या विविध पद्धतींचा वापर करावा. काळ्या खोल जमिनीत शेततळ्यात येणाऱ्या गाळाचे प्रमाण कमी होते. 
2) खरिपात बऱ्याच वेळा दोन पावसांतील अंतर वाढल्याने किंवा एक पाऊस कमी पडल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. 
3) सूक्ष्म संचाद्वारा 30 मि.मी. खोलीचे ओलीत केल्यास काळ्या खोल जमिनीत पिकांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होते. मध्यम खोल व हलक्‍या जमिनीत पीकनिहाय वाढीच्या विविध अवस्थांत 60 मि.मी. जास्तीत जास्त पाण्याची गरज भासू शकते.

फांदेरी बंधारा आणि विटांचा सांडवा महत्त्वाचा

1) ज्या शेतकऱ्यांनी शेततळ्यात पाणी आत येण्याच्या तोंडामध्ये व तसेच खालच्या तोंडात काळ्या खोल जमिनीत फांदेरी बंधाऱ्यांचे आणि हलक्‍या मध्यम खोल जमिनीत दगड, विटांचा वापर करून सांडवा तयार केले आहे, त्या शेतकऱ्यांचे शेततळे सुरक्षित आहे. 
2) काही ठिकाणी तांत्रिक दोषांमुळे थोडी फार इजा झाल्याचे दिसून येते, परंतु फारसे नुकसान झाले नाही. विशेषकरून ज्या शेतांमध्ये उताराला आडवी किंवा समतल मशागत आणि पेरणी केलेली आहे, अशा शेतातील शेततळ्यात गाळ व माती वाहून येण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. 
3) शेततळ्याच्या मुखात फांदेरी सांडवा (काळ्या खोल जमिनीतील) व इतर जमिनीत दगड, विटांचा सांडवा बांधला त्या ठिकाणी कमी प्रमाणात गाळ जमा झालेला दिसतो. फांदेरी, बंधाऱ्याच्या वरच्या बाजूच्या खोलगट भागात गाळ साचलेला दिसून आला, म्हणजे त्या शेतात नैसर्गिक सपाटीकरणाची प्रक्रिया सुरू झाली असे म्हटले तरी चुकीचे होणार नाही.

खापर पाणपट्ट्यातील शेततळी


1) ज्या शेतकऱ्यांनी शेततळ्यांच्या मुखात उपचार केलेले नाहीत व शेताची मशागत ही पारंपरिक पद्धतीने म्हणजेच उताराला उभीच केली आहे. अशा शेततळ्यांची तूट-फूट झाली. 
2) शेततळ्याच्या वरच्या तोंडात खोद्रे पडून मोठ्या प्रमाणात शेततळ्यांमध्ये गाळ व माती साचली. परिणामी, पावसाळ्याच्या सुरवातीलाच शेततळ्यांची पाणीसाठवण क्षमता कमी झाली. 
3) काळ्या खोल जमिनीमधील- विशेषतः अमरावती, अकोला आणि साठवण क्षमता कमी झाली. काळ्या खोल जमिनीमधील- विशेषतः अमरावती, अकोला आणि अकोला जिल्ह्याच्या खापर पाणपट्ट्यातील शेततळ्याचे जास्त नुकसान होते. 
4) काही शेततळ्यांचा आकार डबक्‍यासारखा झाला आहे, अर्धेअधिक मातीने पहिल्या 1 ते 2 वर्षांतच भरले असल्याचे दिसून येते. परिणामी, या शेततळ्यांचे आयुष्य 3 ते 4 वर्षांपेक्षा जास्त राहणार नाहीच, परंतु पाणी साठवण क्षमता पहिल्या दोन वर्षांतच निम्म्याहून अधिक कमी झालेली दिसून येते. त्यामुळे ही शेततळी करून उपयोग झाला नाही.

शेततळ्यातील पाण्याचा निचरा

1) बहुतेक ठिकाणी शेततळे भरल्यानंतर जास्तीचे पाणी खालच्या तोंडातून मोकळे न वाहता ते शेततळ्याच्या वरच्या बाजूने शेतात मागे पसरलेले दिसते. याचा अर्थ असा, की शेततळ्याचे खालचे तोंड (बाहेर पाणी वाहून जाणारे) हे वरच्या तोंडापेक्षा उंच ठेवले गेले आहे. 
2) या तांत्रिक दोषामुळे पाणी शेतात मागे पसरलेले आहे. पाण्याखालील पीक सडून खराब होत असल्यामुळे शेतकरी चिंतित आहेत. 
3) शेततळ्यात पाणी आत येणाऱ्या तोंडापेक्षा पाणी बाहेर जाणारे तोंड हे किमान 5-6 इंच तरी खालील असावे.
डॉ. टाले: 9822723027
(लेखक जल व मृद्‌ संधारण अभियांत्रिकी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

 

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate