केळीचे खोड आणि अननसाच्या पानांना आतापर्यंत म्हणावे तसे आर्थिक मूल्य नव्हते, परंतु गेल्या काही वर्षांपासून केळी खोडापासून धागे वेगळे करणारी यंत्रे विकसित झाली, त्याचबरोबरीने विविध शोभेच्या वस्तू तयार करण्यासाठी केळी धाग्यांची मागणी वाढली, त्यामुळे केळी उत्पादक पट्ट्यात नवीन लघु उद्योगांची सुरवात होत आहे. येत्या काळात शोभेच्या वस्तूंच्या बरोबरीने या धाग्यांचा वापर वाहन उद्योगामध्ये होण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भात ब्राझीलमधील तज्ज्ञ संशोधन करीत आहेत. या संशोधनाबाबत माहिती देताना साओ पावलो स्टेट विद्यापीठातील तज्ज्ञ डॉ. अल्सिडीस लिओ म्हणाले, की केळी आणि अननसाच्या पानांचे आणि खोडांपासून निघणाऱ्या धाग्यांची ताणक्षमता चांगली आहे. त्याचबरोबरीने इतरही महत्त्वाचे गुणधर्म या धाग्यांमध्ये आहेत. या गुणधर्मांचा अभ्यास करून आम्ही वाहनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या
प्लॅस्टिकच्या निर्मितीमध्ये या धाग्यांचा वापर कशा पद्धतीने करता येईल याबाबत प्रयोग करीत आहोत. या धाग्यांपासून तयार होणारे प्लॅस्टिक हे नेहमीच्या प्लॅस्टिकपेक्षा 30 टक्क्यांनी हलके आहे, तसेच त्याची ताण सहन करण्याची क्षमताही चारपटीने जास्त आहे. हे लक्षात घेऊन धाग्यापासून तयार केलेल्या प्लॅस्टिकचा प्रायोगिक तत्त्वावरील वापर आम्ही गाडीच्या यंत्रणेमध्ये केला आहे. या प्रयोगाचे निष्कर्ष आशादायक आहेत.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
कृषी व पूरक उद्योगांच्या माध्यमातून ग्रामीण भागाती...
शेतीपूरक उद्योगांविषयीची माहिती येथे देण्यात आलेली...
औषधी वनस्पती प्रक्रिया ही औषधी वनस्पतींची किफायतशी...
शेतीवर पूर्णपणे विसंबावे अशी आजची स्थिती नाही. कार...