অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेतकरी उत्पादक संस्थांचे संवर्धन

राज्यातील अनेक जिल्ह्यांत कृषिक्षेत्राशी संबधित विविध उपक्रमांतर्गत शेतक-यांचे विशेषत: लहान उत्पादक शेतक-यांचे संघटन सेवा यांमधून शेतक-यांचे उत्पन्न वाढविणे आणि त्यायोगे त्यांच्या शाश्वत शेती आधारित उपजीविकेचे बळकटीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कृतीतून शेतक-यांना सक्षम करण्याबरोबच पीक तंत्रज्ञान विस्तार करणे, निविष्ठा पुरवठा व कर्ज उपलब्धता यासाठी शेतकरी उत्पादक संस्था या दर मिळविण्यासाठी बाजारात एकत्रित विक्री करीत आहेत. उत्पादक संस्थांमधील सदस्य शेतक-यांना विशेषत: लहान शेतक-यांना संघटित करून, उत्पादन, उत्पादकता वाढवून थेट नफा वाढविणे ही उद्दिष्टे साध्य करायची आहेत.

शेतक-यांना अनौपचारिक गटात एकत्र आणणे आणि उत्पादन प्रक्रिया, बाजारातील प्रवेश तसेच बाजारातील वाटाघाटी यांसाठी शेतक-यांना उत्पादित कंपनीमध्ये संघटित करणे आवश्यक आहे. उत्पादक कंपनीचे महत्वाचे उद्देश म्हणजे गावपातळीवर १५-२o शेतक-यांचा एक गट तयार करणे ज्याला आपण शेतकरी स्वयंसहायता गट म्हणतो त्यांची बांधणी करुन शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये त्यांना नियोजन व अंमलबजावणी करणे शक्य होईल.

अधिक पीक उत्पादकता गाठण्यासाठी सर्वोत्तम शेती पद्धतीच्या माध्यमातून शेतक-यांची क्षमता विकसित करणे, सधन शेती उत्पादनासाठी गुणवत्तापूर्वक कृषि निविष्ठा आणि कृषि सेवांच्या पुरवठा करणे, रास्त आणि किफायतशीर बाजारभाव मिळविण्यासाठी बाजारप्रवेशासाठी मदत करणे ज्यामध्ये बाजारमाध्यमातून उत्पादक गटांना बाजाराच्या संधीशी जोडणे या बाबींचा समावेश आहे. याशिवाय, उत्पादक संस्थांच्या निर्मितीसाठी काही मार्गदर्शक तत्वे ठरविण्यात आलेली आहेत. ती पुढीलप्रमाणे आहेत.

शाश्वत विकासासाठी मार्गदर्शक तत्त्वे

शेतकरी उत्पादक संस्था या स्वयंसहायता, स्वत:ची जबाबदारी, लोकशाही, समता, समभाग आणि ऐक्य या नैतिक मूल्यांवर आधारित आहेत. शेतकरी उत्पादक संस्थांमधील सदस्यांनी प्रामाणिकपणा, खुलेपणा, सामाजिक जबाबदारी आणि इतरांची काळजी घेणे या नैतिक मूल्यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे.

तत्व १ : ऐच्छिक आणि खुले सदस्यत्व : शेतकरी उत्पादक संस्था या सेवाभावी संस्था आहेत. संस्थेचे सदस्यत्व सर्व व्यक्तींना खुले सामाजिक, वांशिक व राजकीय किंवा धार्मिक भेदभाव न करता पकृतेने जबाबदारी स्वीकारण्यास तयार असणे आवश्यक आहे.

तत्त्व २ : शेतकरी सदस्यांद्वारे लोकशाही पद्धतीने नियंत्रण : शेतकरी उत्पादक संस्था या लोकशाही पद्धतीने शेतकरी सदस्यांद्वारे नियंत्रित केल्या जाणा-या संस्था आहेत. या संस्था धोरणे ठरविण्यात आणि निर्णय घेण्याकरिता सक्रिय सहभाग देणा-या असाव्यात. उत्पादक संस्था या त्यांची धोरणे ठरविण्यासाठी सक्षम असून महिला आणि पुरुष सदस्य प्रतिनिधी हे सामूहिकरीत्या संस्थेला जबाबदार आहेत. प्राथमिक शेतकरी उत्पादक संस्थांमध्ये शेतकरी सदस्यांना समान मतदानाचा अधिकार (एक सदस्य-एक मत) असून, लोकशाही पद्धतीने त्याचे आयोजन केले जाते.

तत्त्व ३ : शेतकरी सदस्यांद्वारे आर्थिक भागीदारी : उत्पादक कंपनीचे सदस्य हे समानतेच्या तत्त्वावर आधारित भांडवलात सहभाग देतात. या भांडवलाचा किमान काही भाग हा उत्पादक कंपनीची समाईक संपत्ती असून सदस्यत्व मिळविण्यासाठी शेतकरी जमा करत असलेल्या भागभांडवलावर त्यांना मिळणारी भरपाई ही सहसा मर्यादित असते. शेतकरी सदस्य हे विविध प्रयोजनांसाठी अतिरिक्त त्याचा काही भाग शेतकरी उत्पादक कंपनीच्या शेतकरी सदस्यांना देणे आणि शेतकरी सदस्यांनी अनुमती दिलेल्या कार्यक्रमासाठी उपयोगात आणणे आवश्यक आहे.

तत्व ४ : स्वावलंबन आणि स्वातंत्र्य : उत्पादक कंपन्या या स्वायत व स्वतंत्र संस्था आहेत. या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी इतर संस्थांबरोबर (शासकीय संस्थामच्या समावेशासह) काही करार केल्यास किंवा बाह्य स्रोताद्वारे भांडवल उभारणी केली असल्यास उत्पादक कंपनीच्या शेतकरी सदस्यांचे त्यावर नियंत्रण असते आणि कंपनीची स्वायत्तता राखण्यासाठी तसेच कंपनीच्या अष्टीशी ते सुसंगत असते.

तत्त्व ५ : शिक्षण, प्रशिक्षण आणि माहिती : उत्पादक संस्था त्यांच्या कंपनीचे संचालक, शेतकरी सदस्य, व्यवस्थापक व कर्मचारी यांना प्रशिक्षणाद्वारे सक्षम करून कंपनीच्या विकासासाठी प्रभावी योगदान देऊ शकतात. विशेषत: तरुण शेतक-यांना उत्पादक कंपनीचे स्वरुप व फायदे यांबाबत माहिती देण्याचा समावेश होतो.

तत्त्व ६ : शेतकरी उत्पादक कंपनीचे आपापसातील सहकार्य : शेतकरी उत्पादक कंपन्या या आपल्या सदस्यांना प्रभावीपणे सेवा देऊन आणि स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एकत्र काम करून उत्पादक कंपनी उभारण्याची चळवळ अधिक मजबूत करू शकतात.

तत्व ७ : सामाजिक हित : शेतकरी उत्पादक संस्थेच्या सदस्यांच्या स्थायी विकासासाठी सदस्यांनी मंजूर केलेली धोरणे राबविण्याचे काम कस्फ शकतात,

संस्थांचे संवर्धन आणि विकास प्रक्रिया

शेतकरी उत्पादक संस्थांचे संवर्धन आणि विकास प्रक्रिया थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे.

  1. शेतकरी समूहाची ओळख निर्माण करणे : उत्पादक संस्थांनी राज्य शासनाच्या संबंधित विभागाच्या सल्ल्याने समूह क्षेत्राची निवड करणे आवश्यक आहे. तथापि, तालुक्यामधील सलगता असलेल्या गावातील सुमारे ८00 ते १,000 शेतक-यांचा समूह तयार होईल, याची खात्री करावी.
  2. निदानाचा अभ्यास : उत्पादक संस्थांनी निवडलेल्या समूह क्षेत्राचा निदान अभ्यास करावा. या निदान अभ्यासात समूह क्षेत्रातील शेतकरी व शेती परिस्थितीचे प्राथमिक मूल्यमापन करण्यात यावे. या अभ्यासामुळे विशेष प्रकल्प अंमलबजावणीसंदर्भात करायचे संभाव्य व अपेक्षित बदल समजून घेण्यासाठी मदत होते.
  3. व्यवहार्यता विश्लेषण : शेतकरी उत्पादक संस्था स्थापन करण्यासाठी व्यवहार्यता विश्लेषण आणि मूल्यमापन करणे आवश्यक आहे. सर्वसाधारण व्यवहार्यता विश्लेषणात वित्तीय, तांत्रिक, कायदेविषयक, राजकीय सामाजिक व सांस्कृतिक, पर्यावरणविषयक व आर्थिक संसाधनांच्या व्यवहार्यतेचा समावेश होतो. यामुळे ठराविक संवर्धन करण्यासाठी औचित्य प्राप्त होते.
  4. आधार रेषा मूल्यमापन : आधार रेखा मूल्यांकनामुळे अल्प, अत्यल्प शेतकरी यांची सध्याच्या परिस्थितीची आकडेवारी मिळण्यास मदत होते. आधारभूत मूल्यांकनामध्ये विविध घटकांच्या समावेश करून त्या आधारस्तंभ विकास आणि व्यवसाय आराखडा तयार करण्यासाठी संभाव्य बदलांची निवड करणे आणि भविष्यात परिणाम निर्देशक आधारित बदल करू शकणारी पायाभूत आकडेवारी प्रस्थापित करून त्याआधारे योजनाच्या योगदानामुळे झालेल्या बदलांचे मोजमाप समजून घेणे आवश्यक ठरते.
  5. व्यवसाय नियोजन : व्यवसाय नियोजन ही एक प्रक्रिया आहे, ज्याद्वारे एका उदयोन्मुख उत्पादक कंपनीच्या धोरणात्मक आणि परिचालन करण्यायोग्य बाबींना त्यातून आकार दिला जातो. आधाररेखा मूल्यांकन ही महत्वाची माहिती असते. ज्या पातळीवरून शेतकरी सदस्यांची उत्पादने आणि सेवा विकसित करायच्या आहेत, ती समजून घेणे आणि अधिक महत्वाचे. म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनीच्या भविष्यातील विकासाच सामूहिक चित्र उभे करणे आवश्यक असते. विविध साधनांचा वापर करून आणि सामुदायिक प्रतिबिंबे असलेला विविध मुद्द्यांवर आधारलेला पद्धतशीर व्यवसाय आराखडा विकसित करणे आवश्यक असते. सविस्तर व्यवसाय विकास आराखडा तयार करण्यासाठी महत्वाची बाब म्हणजे उत्पादक कंपनीच्या कमीत कमी १व टक्के शेतकरी सदस्य यांना स्पष्ट दृष्टी देणे आवश्यक असते.
  6. शेतक-यांचे संघटन करणे : व्यवसाय नियोजनाच्या माध्यमातून निवड केलेल्या शेतकरी गटांच्या मदतीने आणि स्थापित केलेल्या उत्कृष्ट उदाहरणातून शेतकरी गटाची निर्मिती करणे आणि त्यांचे शेतकरी उत्पादक संघात रुपांतर करणे आवश्यक असते. शेतक-यांचे अशा प्रकारे संघटन करण्यासाठी विविध संपर्क साधनांचा- जसे माहितीपत्रके, माहितीपट, पोस्टर, नियमित गाव-पातळीवर बैठका यांद्वारे प्रवर्तक शेतकरी सदस्यांचा योग्य दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक असते. कृषि विभागाच्या माध्यमातून ज्या शेतक-यांना प्रशिक्षण आणि अभ्यास माहिती मिळालेली आहे, असे प्रवर्तक शेतकरी सदस्य हे शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी उत्सुक असतात.
  7. संघटित करणे आणि औपचारिक रूप देणे : शेतकरी स्वयंसहाय्यता गट हे शेतकरी समूहाच्या एकत्रीकरणातून पुढे शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये समाविष्ट होतात. सामान्यतः ५o-७0 शेतकरी उत्पादक गट एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करतात. कंपनी कायद्याखालील उत्पादक कंपनीच्या तरतुदीनुसार शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी करण्यात येते. तथापि, या ठिकाणी हे स्पष्ट संस्थांची औपचारिक नोंदणी करण्याचे लक्ष्य साध्य करणे एवढेच नसून, शेतकरी उत्पादक कंपनीने जे अंतिम स्वरूप धारण केलेले आहे, त्यामध्ये शेतकरी स्वयं-सहाय्यता गटाच्या सदस्यांनी योग्य वेळी निर्णय घेणे आवश्यक असते. परंतु, येथे विशेष करून निदर्शनास आणण्यात येते, की कोणत्याही परिस्थितीत शेतकरी उत्पादक कंपनीच्या नोंदणीसाठी घाई करण्यात येऊ नये आणि अशी कुठलीही वेळ नसते, की ज्या वेळी संस्था नोंदणी झालीच पाहिजे. शेतकरी उत्पादक गटांनी सुमारे १८ ते २४ महिन्यांच्या कालावधीत स्थिर होऊन शेतकरी गटाच्या एकत्रीकरणाचे परिणाम समजून घेणे आवश्यक असते.
  8. संसाधन एकत्रित करणे : उत्पादक कंपनीचे कामकाज सुरू करण्यापूर्वी संचालक मंडळाच्या मदतीने सर्व संसाधनांची जुळवाजुळव करावी. व्यवसाय आराखड्यानुसार विविध संस्थांशी संपर्क साधून संसाधनांची निर्मिती करणे आवश्यक असते.
  9. व्यवस्थापन प्रणालीचा विकास : शेतकरी उत्पादक कंपनीने व्यवस्थापन प्रणालीचा विकास केला पाहिजे. व्यवस्थापन प्रणालीही आर्थिक सेवा, निविष्ठा आणि परिणाम आधारित व्यवस्थापन सेवेच्या गरजांविषयी अडचणी सोडविण्यास सक्षम असावी. वित्त, मानव संसाधन विकास, खरेदी आणि गुणवत्ता व्यवस्थापन, विपणन, अंतर्गत लेखा क्षेत्राशी संबंधित व्यवस्थापन प्रणाली विकसित करणे आवश्यक असते. त्यासाठी मानक कार्यप्रणाली निर्माण करणे आवश्यक असते.
  10. व्यवसाय सुरू करणे : व्यवसाय सुरू करणे म्हणजे संबंधित वित्तीय कार्यक्रम हाती घेणे आवश्यक असते. व्यावसायेिक कामकाज
  11. सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीच्या नियामक मंडळ आणि कार्यरत मनुष्यबळ या दोन्ही घटकांना काळजीपूर्वक प्रशिक्षित देणे आवश्यक असते.
  12. मूल्यमापन व लेखापरीक्षण : शेतकरी उत्पादक कंपनीने शेतकरी सदस्य, संचालक मंडळ आणि सेवा पुरवठादार संचालित विविध घटक यांच्या कामगिरीचे सतत मूल्यांकन केले पाहिजे. आंतरिक प्रक्रिया आणि लेखा परीक्षण यातील पारदर्शकता आणि त्यांचे उत्तरदायित्व राखण्यासाठी मदत करावी. शेतकरी उत्पादक कंपनीच्या विकासासाठी संस्थात्मक प्रणाली ही महत्वाची बाब आहे.

शेतकरी उत्पादक कंपनीचे सेवा प्रारूप

शेतकरी उत्पादक कंपनीने आपल्या सदस्यांना विविध सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक असते. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपल्या शेतकरी सदस्यांना निविष्ठा उपलब्ध करून देणे, उत्पादित मालाची विक्री करणे बाब तांत्रिक सेवा पुरविणे महत्वाचे आहे. मागणी आणि पुरवठा यांतील ताळमेळ घालण्यासाठी शेतकरी, प्रक्रियादार, व्यापारी आणि किरकोळ विक्रेते यांतील समन्वयक म्हणून काम करू शकतात. त्याचप्रमाणे, व्यावसायिक सेवाविकास करण्यासाठी बाजार माहिती आणि वाहतूक अशा सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शेतकरी सदस्यांच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी नवीन सेवा जोडण्यावर भर देणे आवश्यक आहे. या सेवांमध्ये आर्थिक, व्यावसायेिक इत्यादी सेवांचा समावेश होतो.

  1. आर्थिक सेवा : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपल्या शेतकरी सदस्यांना पीक कर्ज, पाइपलाइन, ट्रॅक्टर, पंपसेट खरेदी करणे, विहीर खोदण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू शकतात.
  2. निविष्ठा पुरवठा सेवा : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपल्या सदस्य शेतक-यांना कमी खर्चात आणि दर्जेदार निविष्ठा पुरवठा करावा. यामध्ये रासायनिक खते, कीटकनाशके, बियाणे, फवारणी यंत्रे, सिंचनासाठीच्या साधनांचा समावेश आहे.
  3. खरेदी आणि पॅकेजिंग सेवा : शेतकरी उत्पादक कंपन्या आपल्या शेतकरी सदस्यांकडून कृषि उत्पादन खरेदी करणे आणि त्यासाठी साठवण, मूल्यवर्धन आणि पॅकेजिंग करणे यांबाबत सेवा व सुविधा निर्माण करू शकतात.
  4. विपणन सेवा : शेतकरी उत्पादक कंपन्यांनीही आपल्या शेतकरी सदस्यांचे कृषि उत्पादन खरेदी करून त्याची थेट विक्री करून देणे आवश्यक आहे. यामुळे शेतकरी सदस्यांच्या वेळ, विक्रीचा खर्च, वजनात होणारे नुकसान, अडचणीत कृषि उत्पादनाची विक्री, किंमतीतील चढउतार, वाहतूक, गुणवत्ता व देखभाल यांत होणा-या खर्चात बचत करणे शक्य होईल.
  5. विमासेवा : शेतकरी उत्पादक कंपनी या आपल्या शेतकरी सदस्यांना पीक विमा आणि जीवन विमा अशा विविध विमा सेवा उपलब्ध करुन देऊ शकतात.
  6. तांत्रिक सेवा : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपल्या शेतकरी कृषि उत्पादन आणि काढणी पश्चात तंत्रज्ञानातील माहिती व कौशल्य आणि मूल्यवर्धनासाठी प्रक्रियांबाबत प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
  7. सेवा नेटवर्किंग : माहितीचा स्रोत निर्माण करणे, ज्यामध्ये उत्पादनाचा तपशील, बाजारभाव आणि इतर व्यवसाय सेवा या ग्रामीण भागातील शेतक-यांना उपलब्ध करून देणे. आर्थिक संस्था व बँका यांच्याशी समन्वय साधणे त्याचबरोबर उत्पादक, प्रक्रियादार, व्यापारी, ग्राहक आणि शासकीय कार्यालयाने यांच्याशी समन्वय साधणे यांबाबत कार्यवाही करणे आवश्यक आहे.


स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

 

अंतिम सुधारित : 8/2/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate