অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेती मित्र पक्षी - छोटा खाटीक

इंग्रजी नाव - Bay Backed Shrike 
स्थानिक नावे - कुरबुडा काच्या (नाशिक), चश्‍मीश (सिंधुदुर्ग), भेरा, लुटारा इ. 
शास्त्रीय नाव - Lanius Vittatus (Linnaeus, 1758). 
संस्कृत नाव - भारत पत्रवर्णक लटूषक इ. 
वैशिष्ट्ये - खाटीक प्रजातीमधील हा सर्वांत लहान पक्षी असून याची चोच बाकदार असते. डोक्‍याचा रंग पांढरा व राखी असतो. चोच, डोळे व कपाळ यांना जोडणारी एक काळी पट्टी असते. तांबूस किरमिजी पाठ व खालील भाग पांढरा असतो. शेपटी काळी पांढरी असते. नर- मादी दिसायला सारखेच असतात. 
आढळ - पूर्णपणे वाळवंट व घनदाट जंगलामध्ये आढळत नाहीत. गवताळ भाग, पानगळीची शुष्क झुडपी जंगले, काटेरी कुंपण, बोरीबाभळीची झुडपे, बांबूची बेटे, आडव्या काटेरी फांद्या, सावरीची झाडे अथवा विजेच्या तारांवर बसलेले आढळतात. 
विणीचा हंगाम - फेब्रुवारी ते सप्टेंबर या काळात वीण होत असून घरटे वाटीच्या आकाराचे गवत, काटे, पंख व कोष्टकांचा वापर करून काटेरी झाडांवर बांधलेले असते. त्यामध्ये तीन ते पाच हिरवट अंडी घातलेली असतात.

शेतीविषयक उपयुक्तता

  • खाटीक पक्षी उंदीर, बेडूक, पाली, सरडे, मोठे कीटक, आळ्या, गोगलगायीचे शंख मोठ्या प्रमाणात खातो. हे यांचे खाद्य असते.
  • पिकांची पाने खाऊन पोसलेल्या मोठ्या आळ्या खातो. त्यामुळे पिकांचे विविध प्रकारच्या अळ्यांकडून होणारे नुकसान कमी होते.
  • उभ्या पिकांचे सर्वाधिक नुकसान करणाऱ्या टोळ या कीटकांना खातो. त्यामुळे संपूर्ण पीक फस्त करणाऱ्या टोळधाडीपासून पिकांचे संरक्षण होते.

संरक्षणासाठी आपण काय करू शकतो

मुख्यतः हा पक्षी काटेरी झाडांवर दिसून येत असल्यामुळे आपल्या शेतीशेजारी व शेताच्या बांधावर असलेली काटेरी झाडे तोडू नयेत. बोर, साधी बाभूळ, रामकाठी, तरवड, कडुलिंब यांसारखी झाडे शेती परिसरात असणे अत्यावश्‍यक आहे.

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate