सजीव कुंपणासाठी घायपात, विलायती बाभूळ, निर्गुडी, करवंद, सागरगोटी, बांबू, मेहंदी, शिकेकाई, चिलार, या वनस्पतींची लागवड करावी. या सर्व प्रजाती या बहुपयोगी प्रकारच्या असून, त्यापासून कुंपणाव्यतिरिक्त आर्थिक मोबदला मिळतो.
या पद्धतीमध्ये कमी उताराच्या किंवा सपाट शेतात खड्डे किंवा सऱ्या काढून लागवड करतात.
या पद्धतीमध्ये सर्वसाधारण उताराच्या शेतात आडव्या पद्धतीने शेताच्या धुऱ्याच्या बाजूने नाली खोदून निघालेल्या मातीचा दोन ते अडीच फूट उंच बांध घालून बांधावर लागवड करावी. नालीमध्ये प्रत्येक दहा मीटरवर 70 सें.मी.चा भाग खोदकाम न करता तसाच राहू द्यावा, त्यामुळे पावसाचे पाणी नालीमध्ये जमा होईल व तेथेच मूलस्थानी जमिनीत मुरेल. त्यामुळे ओलावा जास्त दिवस टिकून राहील व सजीव कुंपणासाठी लावलेल्या झाडांची वाढ चांगली होईल.
सर्वप्रथम ज्या शेताला कुंपण घालायचे आहे, अशा शेतात शेताच्या सीमेची चुना टाकून आखणी करावी. शेताच्या भोवती ओळीत एक मीटर अंतरावर 1.5 x 1.5 x 1.5 फूट अंतरावर खड्डे तयार करावेत. खड्डे उन्हाळ्यात चांगले तापू द्यावेत. एक घमेले कुजलेले शेणखत, पालापाचोळा, शेतातील वरची माती याद्वारा खड्डे भरून घ्यावेत. दोन पाऊस पडल्यानंतर खड्ड्यांमध्ये रोपे लावावीत किंवा बिया टोकाव्यात, कलमे लावावीत. रोपांची लागवड झाल्यावर किंवा बिया, कलमे लागवड केल्यावर पुरेसे पाणी द्यावे. खड्ड्यांत रोपे किंवा बिया लावताना खड्ड्याच्या विरुद्ध व्यासावर दोन कोपऱ्यांत दोन झाडे लावावीत.
संपर्क- 0712- 2521276
अखिल भारतीय समन्वित कृषी वनशेती संशोधन केंद्र,
कृषी महाविद्यालय, नागपूर
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
सजीवापासून तयार केलेल्या व प्राणिशरीरात कृत्रिम री...
कुंपणाच्या कडेने ही झाडे लावतात. पाने गुरेढोरे खात...
जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने WOTR प्रस्तु...
शिकेकाई ही परिचित व उपयुक्त काटेरी वेल भारतात सर्...