অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

साकोलीच्या कृषी विज्ञान केंद्राचे विविध उपक्रम

साकोलीच्या कृषी विज्ञान केंद्राचे विविध उपक्रम

भारत सरकारच्या धोरणाप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात एक कृषि विज्ञान केंद्र कार्यरत आहे. त्यानुसार भंडारा जिल्ह्यासाठी साकोली येथे दि. १६ मार्च २००२ पासून कृषि विज्ञान केंद्र सुरु झालेले आहे.

उद्दिष्ट्ये

  1. भंडारा जिल्ह्यातील शेतकरी, युवक, ग्रामीण महिला तसेच विस्तार कर्मचा-यांना शास्त्रीय व तांत्रिक प्रशिक्षण देणे.
  2. उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर होत नसल्यास त्यामधील त्रुटी दूर करणे.
  3. प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे शेतक-यांचे व शेतीवर अवलंबून असणा-यांचे जीवनमान सुधारणे.
  4. शेतक-यांच्या शेतावर प्रथमश्रेषीय पीक प्रात्यक्षिकाद्वारे सुधारित तंत्रज्ञान पोहचविणे.

संपूर्ण भंडारा जिल्हा कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्षेत्र आहे. या जिल्ह्यात ७ तालुके येतात. पर्जन्यमानाचा विचार करता अधिक पर्जन्यमानाच्या क्षेत्रामध्ये याचा समावेश होतो.

कृषि विज्ञान केंद्र हे भंडारा जिल्ह्यातील शेतक-यांना पुढील बाबतीत मार्गदर्शन उपलब्ध करुन देत आहे.

गांडूळखत

कृषि विज्ञान केंद्र साकोली येथे उपलब्ध संसाधनांचा वापर करुन गांडूळखत तयार करण्याची प्रात्यक्षिके व प्रशिक्षणाची सोय उपलब्ध आहे. शेतक-यांकडे उपलब्ध संसाधने वापरुन गवताची झोपडी किंवा झोपडी तयार करुन त्यावर सावलीकरिता गवत किंवा धानाचा तणस वापरुन सभोवताली तुरीच्या काड्यांची ताटी करुन झोपडीमध्ये अंधार करणे व त्यात कमी खर्चात शेतक-यांनी गांडूळखत तयार करावे, यासंदर्भात मार्गदर्शन केले जाते. या प्राप्त्याक्षिकांद्वारे वर्षभर तयार केलेले गांडूळखत प्रक्षेत्रावरील प्राप्त्याक्षिकांसाठी वापरले जाते.


मधमाशापालन

मधमाशापालन प्रत्याक्षिकांतर्गत सातेरी मधमाशा पेट्यांमध्ये पाळल्या जातात तसेच वर्षभर गरजू ग्रामीण युवक, युवती व शेतक-यांना प्रशिक्षण व प्रत्यक्ष हाताळणीद्वारे प्रशिक्षण दिले जाते. मधमाशापालन हा उत्तम पूक व्यवसाय या भागात होऊ शकतो, भंडारा जिल्हा हा जंगलाने व्याप्त असल्यामुळे जंगलात उपलब्ध फुलोन्याची या व्यवसायास मदत मिळते. या केंद्राकडे ६ पेट्यांमध्ये सातेरी मधमाशा पाळलेल्या असून त्यांचा उपयोग पैदासीकरिता केला जातो. मधमाशांमुळे पिकांच्या उत्पादनात ३० ते ४० टक्के वाढ होते व पूरक व्यवसायामधून आर्थिक उत्पन्न सुध्दा मिळते.

उस्मानाबादी शेळीपालन

या केंद्रावर शेळीपालनाचे प्राप्त्याक्षिक घेण्यात येत असून त्यामध्येउस्मानाबादी या वाणाच्या /जातीच्या शेळ्या उपलब्ध आहेत. 'धान शेतीला पूरक व्यवसाय शेळीपालन' याविषयी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दिले जाते. उस्मानाबादी जातीच्या शेळ्या व बोकडाची पैदास करण्याकरीता त्यांची शेतक-यांना विक्री केली जाते. भंडारा जिल्हा हा भात पिकविणारा जिल्हा असून शेळीपालन करण्यास सुध्दा चांगला वाव आहे. याकरीता ग्रामीण युवक व युवतींना प्रोत्साहित करण्यात येत आहे.

युरिया डिएपी ब्रिकेटर

धान हे भंडारा जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे व या पिकात अन्नद्रव्ये व्यवस्थापनावरील खर्च कमी करण्याकरीता प्रशिक्षण व प्राप्त्याक्षिक दिले जाते. कृषि विज्ञान केंद्र, साकोली (भंडारा) येथे युरिया डिएपी ब्रिकेटर मशीन उपलब्ध असून या मशीनद्वारे शेतक-यांना युरिया डिएपी ब्रिकेट तयार करुन देण्यात येतात व सोबतच युरिया डिएपी ब्रिकेट वापराचे फायदे, खर्चात बचत व चारसुत्री भात शेतीचे मार्गदर्शन केले जाते तसेच शेतक-यांच्या शेतावर प्रात्यक्षिके घेण्यात येतात. युरिया डिएपी बिकेट वापरामुळे अन्नद्रव्यांचा -हास कमी होतो व अन्नद्रव्ये हळूहळू पिकाला उपलब्ध होत राहतात.

बीजोत्पादन

कृषि विज्ञान केंद्र साकोली क्षेत्रावर ८.0 हेक्टर क्षेत्रावर धान पिकाचे विविध सुधारित वाणाचे बीजोत्पादन घेतले जाते. या प्रक्षेत्रावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला यांनी विकसित केलेले विविध वाण जसे साकोली-६) साकोली-७ व ८, पेिडीकेव्ही-खमंग, सिंदेवाही२oo१, पेिकेव्ही-एचएमटी, पेिडीकेव्ही-किसान इत्यादी वाणांचे सत्यप्रत बियाणे शेतक-यांना उपलब्ध करून दिले जाते. तसेच 'महार्बीज'ला प्रमाणित बियाणे पुरविले जाते. सर्व प्रात्यक्षिके शेतक-यांना पाहणीकरिता उपलॐ 3संक्ष.

पिकेही मिनी डाळ मेिल

कृषि विज्ञान केंद्र, साकोली केंद्रावर पिकेही मिनी डाळ मिल उपलब्ध असून सदर यंत्राची प्रात्यक्षिके येथे दिली जातात व शेतक-यांना मूल्यवर्धनाचे फायदे सांगून प्रशिक्षण दिले जाते तसेच उद्योजकता विकासाकरीता प्रोत्साहित केले जाते. गूळ बनविण्यासाठी येथे छोटी प्रात्यक्षिके आयोजित करून त्याद्वारे उसापासून गूळ तयार करणे व विक्री करणे याबाबत शेतक-यांना प्रशिक्षण दिले जाते.

नर्सरी/रोपवाटिका

गिरीपुष्प या हिरवळीच्या खताकरीता वापरण्यात येणा-या वनस्पतीच्या रोपांची रोपवाटिका येथे उपलब्ध असून दरवर्षी गिरीपुष्य या वनस्पतीची रॉपे तयार करून शेतक-यांना उपलब्ध करून दिंर्ली जातात. दरवर्षी मागणीनुसार ५000 ते १0,000 रोपे तयार करून शेतक-यांना देवून त्याच्या वापराबाबत मार्गदर्शन केले जाते.

फिरती माती परीक्षण प्रयोगशाळा

कृषि विज्ञान केंद्र, साकोली येथे मानव विकास मिशन अंतर्गत दोन फेिरट्या माती परीक्षण प्रयोगशाळा उपलब्ध आहेत. या प्रयोगशाळाद्वारे भंडारा जिल्ह्यातील वेिवेिश्ध खेडेगावात जाऊन शेतक-यांच्या बांधावरून मातीचे नमुने गोळा करून ते तपासणी करून जमिनीची आरोग्यपत्रिका शेतक-यांना पुरविली जाते व त्याआधारे अन्नद्रव्ये व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करून शेतक-यांच्या शेतावर प्राद्याक्षिकांद्वारे माती परीक्षणाचे महत्व व फायदे पट्वून दिले जातात. यामुळे शेतक-यामध्ये माती


परीक्षणावर आधारित अन्नद्रव्ये व्यवस्थापन करून खर्चात बचत व लुंपादनात वार्झीबाबत जागरूकता येत आहे.

अवजारे बँक


कृषि विज्ञान केंद्र, साकोली येथें धान शेतीस आवश्यक अवजारे शेतक-यांकरीता उपलब्ध आहेत. रोटोव्हेटर, बीबीएफ प्लॅन्टर, सिड ड्रील, राईस ग्रेन प्लॅन्टर, सिड काम फर्टिलायझर ड्रिल, धान रोवणी यंत्र, पेंडल श्रेसर, रेन गन, ऊस लागवड़ यंत्र, धान कापर्णी यंत्र, पॉवर पेंडीं विड़र, कोनोविडर ड्रम सीडर युरिया डीएपी बिकेट अपली केटर हि अवजारे शेतक-यांचे शेतावर प्राक्ष्यक्षिके व प्रशिक्षणादरम्यान शेतक-यांना वापरण्यास प्रोत्साहित करून जागरूकता निर्माण केली जाते. कृषि विज्ञान केंद्राने शेतक-यांच्या शेतावर प्रयोग घेण्यास सुरुवात केल्यापासून या भागात १ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र धान सिड़कम फर्टिलायजर सिड़ ड्रेिलने पेरणी केली जाते. यामुळे हेक्टरी ९,000 ते १o,000 पर्यंत खर्चात बचत झाल्यामुळे शेतक-यांनी स्वतः या मशीन खरेदी केल्या असून ते स्वतः वापरून भाडेतत्वावर इतरांना उपलब्ध करून देत आहेत.


लाईट ट्रेप

कृषि विज्ञान केंद्रावर दोन ठिकाणी लाईट ट्रॅप लावलेले असून त्यामधील निरीक्षणावरून भविष्यात येणा-या किंडींचा अंदाज येतो व त्यानुसार शेतक-यांना जागरूक केले जाते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतक-यांचा फवारणीवरील खर्च कमी करण्यास व उत्पादन वळवेिण्यास मदत मिळत आहे.

संदेश सेवा

कृषि विज्ञान केंद्र साकोलीद्वारे भंडारा जिल्ह्यातील शेतक-यांचे गरजेनुसार व जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार हवामान विषयक, कोड व रोग व्यवस्थापन, पीक विमा, विविध विषयांची जागरूकता, पशुविज्ञान, चारा बाजारपेठ इ. विविध विषयांवर संदेश पाठविले जातात. भंडारा जिल्ह्यातील ५,000 शेतक-यांना नाबार्डच्या मदतीने ७५ ते १00 संदेश पाठवेिण्याचे कार्य या केंद्राकडून करण्यात आले. शेतकरी स्वत:हुन हवामान विषयक माहिती घेऊनच धान कापणीसारखी कामे हाती घेतात. या सेवेमुळे शेतक-यांचे आर्थिक नुकसान टळले आहे.

फेसबुक व व्हॉटसअॅप सेवा

शेतक-यांना सोशल मिडियाचा वापर करून फेसबुक व व्हॉट्सअॅपद्वारे विविध माहिती पुरविली जाते. विविध संदेश शेतक-यांना दिले जातात व यशोगाथा शेअर केल्या जातात. कृषि विज्ञान केंद्र, साकोली या नावाने फेसबुक पेज उपलब्ध असून १५oo पेक्षा जास्त शेतकरी व युवक यांनी पेज लाईक केलेले आहे. व्हॉट्सअॅपद्वारे २ooo पेक्षा जास्त शेतकरी कृषेि विज्ञान केंद्राशी जोंड़ले गें.ले आहेत.

अॅझोला उत्पादन

अॅझोल उत्पादनाविषयी प्रात्याक्षिक व प्रशिक्षण कृषि विज्ञान केंद्र साकोली येथे देण्यात येते. अॅझोला हे हिरवळीचे खत, जिवाणू खत तसेच जनावरांचा चारा म्हणून उपयोगात येते. अॅझोलाविषयी तंत्रज्ञान व फायदे शेतक-यांपर्यंत पोहोचवण्याकरिता प्रयत्न सुरु आहेत. अॅझोला युनेिटच्या माध्यमातून शेतक-यांनी कमी खर्चात व घरच्याघरी उत्तम प्रतीचा हिरवा चारा तयार करून प्रथिनेयुक्त सुग्रीसवरील खर्च कमी करता येतो व अॅझोला धान पिकामध्ये हिरवळीचे खत म्हणून सुध्दा वापरला जातो. अशाप्रकारे हिरवा चारा तयार करण्याचे तंत्र उपलब्ध झाले आहे.

प्रशिक्षण सभागृह

कृषि विज्ञान केंद्र, साकोली येथे ७५ प्रशिक्षणार्थीना बसता येईल असे सर्व सुविधांसह प्रशिक्षण सभागृह उपलब्ध आहे. त्यामध्ये एलसीडी व इतर सर्व सुविधाद्वारे शेतकरी व ग्रामीण युवक यांना गरजेनुसार प्रशिक्षण दिले जाते. या केंद्राकडे विविध विषयांच्या सिड़ी उपलब्ध आहेत त्यांचा उपयोग जिल्ह्यातील कृषि विस्तार कार्यकर्ते शेतक-यांना मार्गदर्शन करण्यासाठी करतात

पोस्टर प्रदर्शन व चार्टद्वारे मार्गदर्शन

प्रशिक्षण सभागृह व समोरच्या हॉलमध्ये विविध प्रकारचे तंत्रज्ञान शेतक-यांना दाखविण्याकरीता मॉडेल. पोस्टर व चार्टच्या स्वरूपात प्रदर्शित केलेले आहेत. शेतकरी कृषि विज्ञान केंद्रामध्ये प्रवेश केल्याबरोबर त्यांना पोस्टर व चार्टद्वारे माहिती प्राप्त होते. तदअनुषंगाने शासनाच्या विविध योजना, पिंकांचे व्यवस्थापन, कोड/रोग, पशुपालन, विविध अवजारे इत्यादि विषयी मार्गदर्शन होते.


रेडिओ व दूरदर्शन तसेच वर्तमानपत्राद्वारे मार्गदर्शन

कृषि विज्ञान केंद्र साकोलीमध्ये उपलब्ध शास्त्रज्ञांकडून वर्तमानपत्र, रेडिओ, आकाशवाणी व दूरदर्शनद्वारे शेतक-यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. विविध विषयांवर शास्त्रीय माहिती या माध्यमाद्वारे शेतक-यांना पुरविली जाते. भंडारा जिल्ह्यातील महत्वाची पिके त्यावर येणारे कोड/रोग व व्यवस्थापन याबाबत वेळोवेळी रेडिओ, दूरदर्शन व वर्तमानपत्र यामधून माहिती पुरविली जाते.

जिवाणूखते व बुरशीनाशकांची उपलब्धता

कृषि विज्ञान केंद्र साकोलीद्वारे शेतक-यांना पिकानुसार व गरजेनुसार जिवाणूखते व बुरशीनाशके उपलब्ध करून दिली जातात. कृषेि महाविद्यालय, नागपूरमधून जिवाणूखते व बुरशीनाशके खरेदी करून'ना नफा ना तोटा' तत्वावर शेतक-यांना गावात उपलब्ध केली जातात. शेतक-यांना उत्तम दर्जाची जिवाणू खते त्यांच्या गावात व नजिकच्या केंद्रावर उपलब्ध झाल्यामुळे व शेतक-यांना लाभ दिसून आल्यामुळे शेतकरी जिवाणूखते वापराबाबत जागरूक झाले असून ते स्वतः जिवाणू खते तयार करून त्याचा वापर करीत आहेत.


टोल फ्री फोन नंबर-१८00२३३५९४६

कृषि विज्ञान केंद्र साकोलीकडे जुलै २०१0 पासून टोल फ्री फोन नंबरवर शेतक-यांना सुविधा पुरविणे सुरू आहे. शेतकरी या टोल फ्री नंबरवर सकाळी १g ते संध्याकाळी ५.३0 पर्यंत फोन करून शास्त्रज्ञांशी चर्चा करून त्यांच्या समस्या सोडवतात व मार्गदर्शन घेतात. कोड व रोग, बियाणे, हवामानाचा अंदाज, अशा अनेक विषयांवर शेतकरी विचारणा करून माहिती घेतात. या सेवेमुळे शेतक-यांना त्यांच्या बांधावरूनच फोनद्वारे निःशुल्क समस्या सोडविता येतात. दरवर्षी ५ooo पेक्षा जास्त शेतकरी या टोल फ्री सेवेचा लाभ घेतात. या विविध माध्यमांमधून कृषि विज्ञान केंद्र, साकोलीने (भंडारा) शेतक-यांमध्ये विश्वास निर्माण केला असून केंद्राचे कार्य आत्मियतेने सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात पीक बदल फार मोठ्या प्रमाणात होत आहेत.


स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 8/2/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate