1) चुल्हाण्यासंदर्भात सुधारणा करण्यासाठी फायर ब्रिक्स (विटा) आणि फायर क्ले यांचा बांधकामासाठी वापर करावा.
2) चुल्हाण बांधकामाभोवती जाड वाळू आणि पांढरी माती यांच्या मिश्रणाचा जाड थर द्यावा. त्यामुळे चुल्हाण्यात तयार झालेले उष्ण तापमान बराच काळ टिकून राहील, उष्णता वाया जाणार नाही, उष्णतेचा कार्यक्षम वापर होईल, तसेच चुल्हाण्याचे आयुष्यही वाढण्यास मदत होईल.
3) चिमणीची (धुराडे) उंची कमी असल्यास ती वाढवून 16 फुटांपर्यंत करावी. या सुधारणांमुळे चुल्हाण एकसारख्या औष्णिक क्षमतेने काम करीत राहील.
4) काहील यांत्रिक पद्धतीने चुल्हाण्यावरून वाफ्यापर्यंत नेण्याची यंत्रणा गुऱ्हाळ घरात बसवावी. या यंत्रणेमुळे कमी श्रमांत, कमी मनुष्यबळात अगदी सहजतेने काहील ढकलत नेता येते. गुऱ्हाळमालकांनी अशी यंत्रणा गुऱ्हाळ सुरू करण्यापूर्वी बसवून घ्यावी.
5) नवीन गिअरबॉक्स जोडलेला चरक गुऱ्हाळ घरात असावा.
6) गुऱ्हाळघरात रसाचा सामूतपासणी यंत्र, गूळ आणि काकवी यांची स्थिती ओळखण्यासाठी इलेक्ट्रॉनिक थर्मामीटर, मोजपात्र ही उपकरणे असावीत.
प्रा. प्रज्ञनाभ, लातूर., सुरेश केसरकर, गारगोटी, जि. कोल्हापूर
संपर्क - 0231 - 2651445
प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर
स्त्रोत- अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
ऊस तोडणीनंतर 6 ते 12 तासांच्या आत उसाचे गाळप करावे...
वेलंग (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील प्रयोगशील शे...
टसर कोषाचे उत्पादन हे अतिशय कष्टाचे आणि जोखमीचे का...
खड्डा पद्धतीने गांडूळ खत तयार करताना साधारणपणे 2.5...