सुधारित गुऱ्हाळाबाबत माहिती
- ऊसतोडणीनंतर 6 ते 12 तासांच्या आत उसाचे गाळप करावे; अन्यथा चोथ्याचे प्रमाण वाढते, रसाची प्रत खालावते, रसाचा उताराही कमी मिळतो. गुळाच्या प्रतीवर अनिष्ट परिणाम होतो.
- ऊसगाळपासाठी आडव्या तीन लाट्यांचा, स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने गिअर बॉक्स असलेल्या चरकाची निवड करावी.
- गुऱ्हाळासाठी चरकाची गाळपक्षमता 65 ते 70 टक्क्यांपर्यंत असावी. गाळप वाढल्यास सूक्ष्म कचऱ्याचे प्रमाण वाढते, रसातील सुक्रोजचे प्रमाण वाढते; परंतु खनिजे आणि ग्लुकोजचे प्रमाण कमी होते, त्यामुळे गुळाचे औषधी महत्त्व कमी होते.
- उसाच्या रसात फिनॉलिक द्रव्य असतात. या द्रव्यांचा लोखंडाशी संबंध आल्यास त्याचा गुळाच्या रंगावर विपरीत परिणाम होतो म्हणून रसाचा लोखंडाशी संपर्क टाळावा.
- स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण वातावरणात गूळ तयार करण्यासाठी स्टेनलेस स्टील चरकाचा वापर करावा.
- द्विस्तरीय पद्धतीच्या गाळणीतून रस चांगला गाळून घेऊन "फूड ग्रेड'चे प्लॅस्टिक अथवा स्टीलच्या नळीतून मंदानात घ्यावा. मंदानातील स्वच्छ रस पंपाच्या साह्याने प्लॅस्टिकच्या अथवा स्टीलच्या साठवण हौदात स्थिरीकरणासाठी ठेवावा.
- हौदातून स्वच्छ रस नायलॉनच्या गाळणीतून गाळून तो काहिलीत पुढील प्रक्रियेसाठी घ्यावा.
- रस उकळण्यासाठी सुधारित काहिलीचा वापर करावा. या काहिलीच्या वापरामुळे गूळ प्रक्रियेसाठी साधारणपणे 16 टक्के कमी कालावधी लागतो. इंधनामध्ये 15 टक्क्यांची बचत होते.
- रस उकळण्यासाठी कोल्हापूर पद्धतीचे चिमणी चुलाण वापरावे. चुलाणावरून काहील उतरण्यासाठी "फ्रेम-चाके-रूळ' यांचा समावेश असलेली यांत्रिक पद्धत वापरावी.
संपर्क - 0231-2651445
प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.