लोहाची कमतरता सर्वप्रथम कोवळ्या पानांवर दिसून येते. पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो; मात्र शिरा हिरव्या राहतात. लोहाची कमतरता असताना नत्र देऊनही पानांना हिरवा रंग येत नाही, शिरादेखील पिवळ्या पडतात, संपूर्ण पाने फिकट पिवळी व पांढरी होऊन गळून पडतात. पीक नियमित फुलोऱ्यात येत नाही. फळांचा आकार लहान होतो. नवीन फांद्या वाकड्या होतात.
जस्ताच्या कमतरतेमुळे पाने लहान, अरुंद व निमूळती होतात. शेंड्याची वाढ मर्यादित होऊन पर्णगुच्छात रूपांतरित होते. पानांत हरितद्रव्याचा अभाव दिसतो. जुन्या पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो. पानांच्या पृष्ठभागावर साखर साचते, पाने ठिकठिकाणी जळतात व भरपूर पानगळ होते. झाडाला फुलोरा कमी प्रमाणात येतो. फळांचा आकार लहान होतो, पीक फुलावर येण्यास उशीर होतो.
तांबे या अन्नद्रव्याची कमतरता नवीन पानांत आढळते. प्रथम कोवळी पाने गर्द हिरवी पडतात व नंतर फिकट पिवळी होऊन गळून पडतात. पाने देठाजवळ वाकतात. पाने पिवळी होऊन दुमडतात व वाटोळी होतात. खोडे वेडीवाकडी होतात. फुले न उमलताच फुलगळ होते. पिकातील प्रथिनांचे प्रमाण घटते. कणसात समाधानकारक दाणे भरत नाहीत. फळझाडांमध्ये शेंड्याकडील नवीन पानांचा नाश होऊन शेंडे गळून पडतात.
मॅंगेनिज अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे नवीन पानांच्या शिरा हिरव्या राहतात, शिरांमधील भाग पिवळा पडतो. त्या ठिकाणी करपल्याचे डाग पडतात, पान जाळीदार दिसते.
कोवळी मुळे व शेंडे सडतात. नवीन पालवी वाळून मुख्य शेंडा मरतो व त्यामुळे बगल डोळे फुटतात. आखूड कांड्याच्या फांद्या फुटतात. पाने पिवळी पडून जाड, खरखरीत व कडक होतात. पानांचा आकार बेढब होतो. खोडावर भेगा पडून ते ठिसूळ होते. परागीभवन व फलन यामध्ये अडथळा येतो, त्यामुळे कच्ची फळे गळून पडतात. फळे वेड्यावाकड्या आकाराची होतात.
तळाकडील जुन्या व त्यांच्यावरील लगतच्या पानांवर आढळतात. पाने पिवळी होऊन त्यावर तपकिरी ठिपके पडतात व पाने रंगीबेरंगी होतात. कमतरता तीव्र स्वरूपात असल्यास पानांच्या कडा गुंडाळल्या जाऊन पाने वाळून जातात. झाडाला फुलोरा अतिशय कमी प्रमाणात येतो. फळांमध्ये बिया कमी निर्माण होतात.
संपर्क - डॉ. कौसडीकर - 9423142210.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.
स्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
नत्र - झाडाची खालची पाने पिवळी होतात, मुळांची व झा...
औषधिक्रियाविज्ञान : अन्नद्रव्याखेरीज इतर बाह्य पदा...
सेंद्रीय व जैविक खतांमुळे रासायनिक खतांची कार्यक्ष...
माती परीक्षण अहवालानुसारच सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या...