অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

किफायतशीर दुग्धव्यवसायाची गुरुकिल्ली

प्रस्तावना

दुग्धप्राचीन काळापासून भारतामध्ये लहानमोठ्या प्रमाणात दुग्धव्यवसाय म्हणजेच दही, दुध, तूप आणि लोणी या दुग्धपदार्थांचा व्यवसाय केला जात आहे. स्वातंत्र्यानंतर शेतीपूरक व्यवसाय म्हणून 'धवलक्रांती' च्या माध्यमातून दुध व्यवसायाला चालना देण्यात आली. यासाठी सहकारी दुग्ध व्यावसायिक संस्था, संकरित गायींचे पैदास, शासकीय दुध वितरण व खरेदी व्यवस्था इत्यार्दी बाबींचा संशोधन व वेिकास करण्यात आला. याद्वारे दुध उत्पादन व प्रक्रिया उद्योग सहकारी संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले. अलीकडच्या काळात दुधाचा महापूर योजनेप्रमाणे आपण दुध उत्पादनात लक्षणीय प्रगती करून जगात आघाडी घेतली. दरम्यान या व्यवसायातील अनियंत्रित वाढीमुळे अथवा व्यवस्था अपुरी पडल्यामुळे काही मुलभूत बाबींकडे दुर्लक्ष झाले.

खाजगी अथवा सहकारी संस्था यामध्ये प्रत्यक्ष दुध उत्पादन करणा-या शेतक-यांना त्यांच्या उत्पादन खर्चाच्या प्रमाणात दर देणे ब-याच कारणामुळे शक्य होत नाही आपारदर्शकता इ. कारणाप्रमाणेच वाढणारी महागाईमुळे पशुखाद्यावरील खर्च वाढणे देखील शेतक-याच्या दृष्टीने त्रासदायक होत आहे. गायींचे संकरिकरणाबाबतचे धोरण योग्य व सक्तींने न राबवण्यामुळे चुकीचे आणि अनियंत्रित संकरीकरण (Cross Breeding) होऊन  संकरित गायींची दूध उत्पादनक्षमता कमी होतोना दिसून येत आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर दुधव्यवसाय अधिक किफायतशीर कसा होईल, या दृष्टीने दुग्धव्यावसायिकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. आपणास कोणताही व्यवसाय किंफायतशीर व यशस्वी करण्यासाठी दोन मुख्य बाबींचा विचार करावा लागतो.

  1. ज्या वस्तुचे आपण उत्पादन करणार आहोत त्याची विक्रीव्यवस्था.
  2. कमीतकमी खर्चात दर्जेदार उत्पादन.

ब-याच वेळा दुध उत्पादक शेतकरी दुग्धव्यवसाय सुरू करताना या मुख्य अंगाचा सखोल व गांभिर्याने अभ्यास न करता व्यवसाय सुरू करतात. मग पारंपरिक व्यवसाय म्हणून याकडे बघितल्याने व मुलभूत नियम न लावता व्यवसाय सुरू केल्यावर व्यवसाय किंफायतशीर कसा होणार? पहिल्या बार्बीचा आज गांभिर्याने विंचार व्हायला हवा. स्थानिक विक्रीचे प्रचलित पर्याय म्हणजे दूध संकलन करणा-या संस्थांना दूध विक्री करणे होय. या संस्थांचे दर सर्व भागात सारखे नाहीत. त्यांची दूधाची प्रतवारी करण्याच्या पद्धती, साधने भिन्न आहेत. या सर्वांमध्ये सध्या ग्रामीण भागातील संकरित गायीच्या दुधाला सरासरी दर हा २० ते २२ रु. प्रती लैिटर मेिळतो. मग या दरात आपला व्यवसाय आपल्या अपेक्षेप्रमाणे किंफायतशीर होणार आहे का? याचा विचार करावा. अथवा इतर पर्यायी विक्री व्यवस्था होऊ शकते का? याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आज शहरीकरणाचा वेग प्रचंड आहे. औद्योगिकीकरणामुळे जीवनमान उंचावले आहे. अशा छोट्या मोठ्या शहरामध्ये दर्जेदार भेसळविरहीत दूध सहज उपलब्ध होत नाही, हे सत्य आहे.

केमिकलयुक्त दूध निर्मितीच्या घट्नांनी अजूनच ग्राहकांच्या मनात दूध आणि दूग्धजन्य पदार्थांच्या सेवनाबाबत संभ्रम आहे. अशा वेळी जर आपण या छोट्या मोठ्या शहरी संकुले/ वसाहतींमध्ये आपणास जेवढे दर्जेदार, निर्भळ , आरोग्यदायी दुध उत्पादन (germ free) करणे शक्य आहे , तेवढेच ग्राहक (बाजारपेठ) शोधले तर प्रचलेित विक्री पद्धतीत मिळणा-या दरापेक्षा किमान दुप्पट दर सहज मिळू शकतो, याची मला खात्री आहे. अशाप्रकारची सुटूढ विक्रीव्यवस्था, बाजारपेठ मिळविण्यासाठी व्यक्तिशः किंवा छोटचा गटाने प्रयत्न करणें आवश्यक आहे. यामध्ये आधुनिक विकी तंत्राचा योग्य वापर केला पाहिजे. यामध्ये डोअर टू डोअर सव्र्हे, आपल्या स्वच्छ निर्भळ , आरोग्यदायी  (Pathogen free) दुध उत्पादनाच्या  निर्मितीची संपूर्ण व्हिडीओ क्लीप तयार करून ग्राहकांना दाखवणे, दूध वा दुग्धजन्य पदार्थाच्या दर्जाबाबत (गुणवत्ता) कुठलीही तडजोड न करणे या गोष्टी केल्यास यामध्ये यश निश्चित मिळते. ग्राहक 'ऑरगॅनिक' खाद्य पदार्थांच्या वापराबाबत अधिक जागरुक होत आहेत. याचा देखील आपल्या व्यवसायात आपण वापर करावा. उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत प्रमाणिकरण करून घेणे देखील सध्या खूप अवघड राहिले नाही. त्यासाठी आपलेसातत्य आवश्यक आहे .

"Food Safety and Standards Authority of India" (fssai) या संस्थेचे मानांकन अतिशय उपयुक्त आहे. त्या सोबतच आपल्या फार्मच्या व्यवस्थापन पद्धतीचे आपण |80 प्रमाणिकरण देखील करून घेऊ शकतो. आपल्या उत्पादनाचे बेंडिंग करताना मात्र गुणनियंत्रण (Quality contrul) खूप महत्वाचे आहे. आज स्पर्धेच्या युगात ग्राहक सतर्क आहेत. त्यामुळे उत्पादनाच्या दर्जाबाबत तडजोड परवडणारी नसते. दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती किचकट वाटत असली तरी त्यामुळे मिळणारी मूल्यवृद्धी व नफा याचा विचार केल्यास त्याचबरोबर बाजारपेठेतील संधी लक्षात घेता त्यामध्ये स्वतः दुग्धउत्पादकांनी उतरणे ही काळाची गरज आहे.

यानंतर दुसरी मुख्य बाब म्हणजे कमीतकमी खर्चात दर्जेदार तसेच उपलब्ध बाजारपेठेच्या मागणीप्रमाणे (गायीचे/ म्हशींचे/ देशी गायीचे) दूध तयार करणे म्हणजेच किफायतशीर दुधव्यवसाय होय.

दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की, आज ९९ टक्के दुध उत्पादकांना त्यांनी तयार केलेल्या उत्पादनाची म्हणजेच दुधाची उत्पादन किमत  (Production Cost) काढलेली नसते. अशा पद्धतीने व्यवसायाच्या मुलभूत तत्वालाच छेद दिल्यामुळे किफायतशीर दुग्धव्यवसाय करण्यास अडचणी येत आहेत. ज्यावेळी दुग्धव्यावसायेिक तयार होणा-या प्रत्येक लष्ट्र दुधाची उत्पादन fřHKT (Per unit Production Cost) काढण्यास सक्षम होईल , त्याचवेळी तो कमीतकमी खर्चात दर्जेदार दूध उत्पादन घेऊ शकतो. कारण अनावश्यक बाबींवर होणारा खर्च कपात करण्यास असणारा वाव, उत्पादन वाढविण्यास असणारा वाव या सर्व गोष्टींवर तो चिंतन/अभ्यास करू शकतो. यासाठी काही महत्वाच्या बाबी थोडक्यात पाहू..

उत्कृष्ट जनावरांची निवड व नियंत्रित प्रजनन व्यवस्था

आपण खरेदी केलेल्या गायीने कुठल्याही आजारांना सहजासहजी बळी न पडता तिच्या पूर्ण क्षमतेने दूध दिले पाहिजे. त्यासाठी जनावर खरेदी करताना अत्यंत काळजीपूर्वक खरेदी करावे. निरोगी सशक्त जनावरांची लक्षणे आपणास माहेित पाहिजे. कसेच्या ठेवणीच्या निरीक्षणाने आपणास गायीच्या दूध उत्पादन क्षमतेचा अंदाज बांधता येऊ येतो. यासाठी शक्यतो अनुभवी पशुवैद्यकांची सुरुवातीला मदत घ्यावी. त्याचबरोबर याबाबत शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यावे. गायीच्या मागील पिढीची दूध उत्पादनक्षमता समजली तर खूपच फायदेशीर ठरते. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये अशी जनावरे उपलब्ध होणे फारच कठीण आहे. पूर्वी नमूद केल्याप्रमाणे आज बाजारात उपलब्ध सर्वच वीर्यमात्राच्या वळूची देखील मागील पिढीची दूध उत्पादनक्षमता माहिती नसते.

फक्त आपल्याला त्या वळुन्या स्क्तातील विदेशी जातीच्या स्क्तातील गुणसुत्रांचे प्रमाण माहित असते. म्हणजे १00 टक्के, ७५ टक्के वगैरे. परंतु प्रत्यक्षात मागील पिढीची दूध देण्याची क्षमता आपणास माहित असणे आवश्यक आहे. म्हणूनच आपण नियंत्रित प्रजनन करून आपल्या दूध देणा-या गायींची दूध उत्पादनक्षमता वाढविणे व्यवसाय किफायतशीर करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. जर आपणास शाश्वत छयवसायाकडे वाटचाल करायची असेल तर आपल्याकडील गायी पुढील पिढीतील तयार होणा-या गायींची संपूर्ण माहिती आपणांकडे असणे आवश्यक आहे. त्यासाठी नोंदी ठेवणे गरजेचे आहे. बाजारात सध्या ब-याच कंपन्यांची छोटी मोठी सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. खुशी प्रकाशनाची लहान व्यवसायांसाठी सोप्या पद्धतीची नोंदवही देखील उपयुक्त आहे.

जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन

उत्पादन घेतले तरच व्यवसाय किफायतशीर होणार आहे. हे आपण पाहिले. त्यासाठी जनावरांचे आरोग्य व्यवस्थित राहणे आवश्यक आहे. जनावरांच्या शरीराला पोषणासाठी, दूध उत्पादन करण्यासाठी, गर्भाच्या वार्झीसाठी आवश्यक तेवढा आहार व पाणी उपलब्ध करून दिले तर शक्यतो जनावर आजारी पड़त नाहीं व त्याच्या कमाल क्षमतेने उत्पादन देते. त्यासाठी आहार व्यवस्थापन सखोल असावे. जादाचा एक केिलो चारा देखेिल दिला नाही पाहिजे व कमीदेखील दिला नाही पाहिजे. कारण कमी दिल्यास किंमान उत्पादन मिळणार नाही. तर जास्त दिला तर उत्पादन खर्चात १ किलोमुळे १.५0 ते २.00/- रुपये वाढ होणार आहे. त्यामुळे आवश्यक तेवढा समतोल आहार द्यावा. क्षारांची योग्य मात्रा द्यावी. महागड्या पशुखाद्यावरील खर्च कमी करण्यासाठी द्विदल हिरव्या चान्याचा (लुसर्ण, चवळी, बरर्सीम इ.) कमाल मयादेिपर्यंत वापर करावा. जनावरांना निवारा हा स्वच्छ म्हणजे हवा. तीव्र वातावरणातील (उदा. पाऊस, ऊन) बदलापासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने बांधला पाहिजे. त्यावर अधिक भांडवली गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही. उपलब्ध जागेप्रमाणे गोठ्चाची रचना करावी. परंतु जनावरांच्या आरोग्याला पोषक अशीच रचना हूर्वी.

गोठ्य़ातील स्वच्छता आपल्याला जनावराच्या उपचारावर होणा-या खर्चापासून वाचू शकते. त्याचबरोबर आजारपणा दरम्यान घटणा-या दूध उत्पन्नाचा तोटा टाळू शकतो. गोचीडताप, दगडी, परोपजीवी संक्रमण इ. आजार गोठ्यावर होऊ नये यासाठी स्वच्छता आवश्यक आहे. नियमित लसीकरण, शेणनमुने तपासून गरजेप्रमाणे जंतनिर्मुलन जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापनेचा अविभाज्य भाग आहे. त्याप्रमाणे जनावरांची स्वच्छता महत्वाची आहे. तेवढ्याच प्रमाणात गोठ्यात काम करणा-या प्रत्येक व्यक्तिची वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता महत्वाची आहे. आजार पसरविणा-या जंतुचे दूधातील प्रमाण कमी ठेवणे फक्त सामाजिक बाजूनेच नव्हे तर आपल्या नाशवंत दुधाची साठवणक्षमता वाढविण्यास गरजेचे आहे. त्याचबरोबर पूर्वी सांगितल्याप्रमाणे आपण याद्वारे ग्राहकांना अतिशय उंच दर्जाचे उत्पादन बाजारपेठेत उपलब्ध करुन देऊन व्यवसाय अधिक किफायतशीर करणार आहोत.

परिसर स्वच्छतेमुळे शेजारील लोकांना त्रास होणार नाही, त्याचबरोबर व्यवसायामध्ये शेजारील चांगले संबंध महत्वाचे असतात. त्यासाठी मलमुत्राचे योग्य व्यवस्थापन केले तर आपण उत्पन्नाचे अधिकचे स्रोत निर्माण करून प्रतिप्लेिटर दूध निर्मिती खर्च कमी करून शकतो. गोमुत्रापासून आरोग्यदायी औषधे, उच दर्जाचे शेणखत व कंपोस्ट यासाठी देखील मोठा वाव आहे. शहरामधील असणा-या परसबागांमध्ये, शोभेच्या झाडांसाठी महाबळेश्वर सारख्या ठिकाणी स्ट्रॉबेरी उत्पादकासाठी, छोट्या पॅकिंगमध्ये कंपोस्ट उपलब्ध करून त्यापासून उत्पन्न सुध्दा मिळू शकते. वेळोवेळी जनावरांची प्रत्यक्ष दूध उत्पादनक्षमता तपासून योग्य वेळी अधिकची जनावरे ताबडतोब विक्री करण्याचा निर्णय घेता आला पाहिजे. कारण अतिरिक्त जनावरांच्या खर्च आपल्या दूधाच्या उत्पादनखर्चात वाढ करत असती. अशाप्रकारे जरी शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय करत असलो तरी देखील व्यवसायाच्या मुलभूत तत्वाचे पालन केले तर दुग्ध व्यवसाय किफायतशीर होईल.


स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 8/9/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate