करता येते. या तयार होणाऱ्या धाग्यात दीर्घकाळ टिकाऊ क्षमता आहे. त्यापासून उत्तम दर्जाचे कापड, तसेच दोरी, दोरखंड, शोभेच्या वस्तू, पिशवी, पायपोस, हात कागद, क्राफ्ट पेपर, टिश्यू पेपर, फिल्टर पेपर, नोटांसाठी कागद, पुठ्ठा, फाइलसाठी जाड कागद, सुटकेसेस, बुटांचे सोल इत्यादी निर्मिती शक्य होते. खोडाच्या आतील गाभ्याचा उपयोग भाजीसाठी, त्याचप्रमाणे कॅण्डी बनविणे, गुरांचा चारा, आतील गाभाऱ्यातील पाणी औषधी उपयोग, खोडाच्या पाण्याचा उपयोग रंगनिर्मितीकरिता, धागा काढणे, सेल्युलोजपासून पृष्ठनिर्मिती, तसेच खोडवा पिकास अन्नसाठा म्हणून उपयोग होतो. केळीचा घड काढल्यानंतर खोडापासून दांडा, पाने वेगळे करतात. नंतर खोड मशिन असलेल्या जागेवर आणतात. केळी खोडापासून धागा काढण्याची मशिन ही सिंगल फेज आणि एक ते दीड हॉर्सपॉवर मोटरवर चालणारी आहे. ही मशिन हाताळायला अ तिशय सोपी असते, त्यासाठी विशेष कौशल्याची गरज नाही. मशिनद्वारे सुरवातीस दिवसाला आठ ते दहा किलो धागा निघतो. अनुभवाअंती 15 ते 20 किलो धागा प्रति दिनी निघतो. केळीच्या खोडापासून धागा काढण्याकरिता खोडावरील वाळलेला भाग बाजूला काढावा. नंतर खोडाच्या लांबीनुसार एक मीटर लांबीचे एक किंवा दोन भाग पाडावे. आतील हिरव्या भागावर अडीच ते तीन इंच रुंदीच्या पट्ट्या निघतील, अशाप्रकारे चार ते सहा काप द्यावे. हेच काम अधिक कार्यक्षमतेने करावयाचे झाल्यास कृषी विज्ञान केंद्राद्वारा विकसित कटरद्वारे लवकर होते. यात दोन फूट लांब, तीन इंच रु ंदीच्या दोन धारदार पट्ट्या क्रॉसमध्ये जोडून त्यावर चारही बाजूंस हॅण्डल लावून खोडावर ठेवून दाबल्याने खोडाचे चार भागांत सहजरीतीने ते कापले जाते. नंतर खोडाच्या एक मीटर पट्ट्या सुट्या कराव्यात. अशाप्रकारे या पट्ट्या एका मागोमाग मशिनमध्ये ठेवून धागानिर्मिती केली जाते.
धागा काढून उर्वरित खोडाचा शिल्लक भाग खड्डा करून त्यात टाकावा. त्यावर शेण व माती टाकून उत्तम कंपोस्ट खत तयार होते; तसेच जळगाव, यावल भागांत सगळे खोड एकत्र आणून त्याचे बेड तयार करतात, त्यावर शेण, माती टाकून त्यापासून आठ-दहा महिन्यांत खत तयार होते. खोडापासून खत तयार होण्यास वेळ लागतो, खोड कापून बारीक तुकडे करावेत.
------------------------------------------------------------------------------------------
संपर्क- 02584-288439,288525
प्रा. सी. एच. पाटील,
कृषी विज्ञान केंद्र, पाल, जि. जळगाव
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
फक्त रासायनिक खते वापरल्यास जमिनीचे आरोग्य चांगले ...
ऊस पिकाच्या उगवण, फुटवे, कांडी सुटणे आणि जोमदार वा...
ऊस पिकामध्ये शेतकरी अधिक उत्पादन मिळवण्यासाठी नत्र...
वॉटरशेड ऑर्गनायझेशन टृस्ट प्रस्तुत कंपोस्ट खत हि ...