অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बहुपयोगी आवळा व लिंबू

बहुपयोगी आवळा व लिंबू

आवळ्याला भारतीय संस्कृतीत खूप महत्च आहे. प्राचीन काळी ऋषी-मुनींच्या दीर्घायुष्याचे रहस्य आवळा होते. आवळा हे फळ बहुगुणी त्रिदोषशामक असे दिव्य औषध आहे. च्यवनप्राशसारख्या दिव्य रसायनामध्ये आवळा ह्याच मुख्य घटक आहे. 'वयस्थापक' म्हणजे म्ह्यतारपण येऊ न देणे ह्या आवळ्याचा एक प्रमुख गुणधर्म आहे.

आवळ्याचा आपल्या आहारात अनेक प्रकारांनी उपयोग केला जातो. ताज्या आवळ्याची जिरे, मीठ आणि मिरची घालून चटणी करतात. या चटणीने लाळेचे प्रमाण वाढून अन्नपचनास मदत होते. तसेच आवळ्याचे लोणचे, मोरावळा, सरबत, सुपारी आदी पदार्थ बनवता येतात. आवळ्याची बर्फी, पेढ़ा आणि गोड़ वड़याही उपयोगात आणल्या जातात.

आवळ्याचे औषधी गुणधर्म

 • रक्त संचारात कमजोरी व त्यामुळे शरीर सुस्त राहत असेल, तर आवळ्याच्या सेवनाने रक्त संचारात गती येते. या गुणधर्मामुळे तारुण्य टिकून राहण्यास मदत होते. वार्धक्य लवकर येत नाही. त्यामुळे आवळा ह्या आयुचर्धक असतो.
 • एका आवळ्यातील जीवनसत्च ४o संत्र्यांची बरोबरी करते. एक आवळा रोज खाल्ल्याने रक्तवाहिन्या मजबूत होतात.
 • आवळ्याच्या सेवनाने कफ, पित्त या दोषांचा नाश होतो. पोटविषयीच्या तक्रारी जसे अजीर्ण, बद्धकोष्ठ, अतिसार, अग्रिमांद्य या रोगांत आवळा  अमृतासारखें काम करती.
 • आवळा, बेहडा आणि हिरडा यापासून तयार झालेल्या त्रिफळाचे नित्य सेवन केले असता डोळे निकोंप राहतात.
 • नाकातून रक्तसाच होत असताना सुकलेल्या आवळ्याला तळून त्याच्या चूर्णाचा डोक्यावर लेप दिल्यास रक्त वाहणे थांबते.
 • ऊन लागल्यास आवळ्याचे सरबत प्यायलाचे बरे वाटते.
 • दातांचे रोग, हिरड्यांची कमजोरी आवळ खाल्ल्याने दूर होते.
 • आवळा आणि ब्राम्ही यांची चटणी खाल्ल्यास स्मरणशक्ती वाढते, मनोबल वाढ़ते.
 • नियमितपणे आवळा खाल्ल्यास रक्त शुद्ध होते, घाच लवकर भरतात, त्यामध्ये पस होत नाही.
 • आवळ्याचा रस अणि साखर खाल्ल्याने मूलदाह आणि योनिदाहात आराम मिळतो. तसेच मुतखडे विरघळतात.
 • लहान क्यापासून आवळा खाण्याची सक्य असल्यास वीर्यविकार होत नाहीत इंद्रिये संयमित होतात. मन जास्त उत्तेजित होत नाही.
 • आवळ्याच्या पाण्थाने स्नान केल्यास चर्मरोगावर उतार पडतो.

सौंदर्यवर्धक गुण

 • रक्तसंचार योग्य प्रमाणात होत असल्याने कांतीमध्ये निखार येतो. डोळे टपोरे व पाणीदार दिसतात.
 • आवळ्याचे चूर्ण भिजवून त्या पाण्याने केस धुतल्यास केसांची मुळे मजबूत, काळे, चमकदार व लांबसडक होतात.
 • हेच पाणी त्वचेला लावून अंघोळ केल्यास त्वचा उजळते.
 • दात चमकदार होतात. मधाबरोबर आवळ्याचे चूर्ण घेत राहिल्यास साचलेला मल बाहेर पडून पोट साफ होते. त्यामुळे चेह-यावर साचलेला मल बाहेर पडून पोट साफ होते. त्यामुळे चेह-यावर तजेलदारपणा येतो. कोणताही पदार्थ केल्यास त्यातील पाँट्रिक तत्चे नष्ट होत नाहीत. याची किंमतही अत्यल्प असते. असा ह्या बहुगुणी आवळा आपल्या दैनंदिन जीवनात आहाराचा एक घटक म्हणून उपयोगात आणला गेला पाहिजे.

आवळ्याचे विविध पदार्थ

आवळा कॅन्डी (प्रक्रियायुक्त पदार्थ)

 • आवळा फोडी करण्यासाठी आवळा उकळत्या पाण्यात 10 ते १२ मिनिटे उकळून थंड झाल्यानंतर हाताने आवळ्यापासून बी वेगळे करून फोड़ी करूनि ध्यान्थात.
 • संपूर्ण आवळा फळे / फोडी पाकविण्यासाठी पहिल्या दिवशी (२४ तासांसाठी) ५० टक्के साखर असलेला पाक तयार करावा. त्यात १ टक्के सायट्रिक आम्ल मिसळावे. तयार झालेल्या पाकात आवळा फळे अथवा फोडी पाकविण्यासाठी ठेवाव्यात.
 • एक किलो आवळा फळे अथवा फोडी पाकविण्यासाठी ६oo मिलिं. पाकाची आवश्यकता असते. ५० टक्के साखर असलेला ६०० मिलेि. पाक तयार करण्यासाठी ३0 ग्रॅम साखर व ३00 मिलेि. पाणी घेऊन एकजीव द्रावण तयार करावे.
 • दुस-या दिवशी अथवा पुढच्या २४ तासांसाठी ६० टक्के (एकतारी) साखरेचा पाक तयार करुन आवळा फळे पाकवावीत. तिस-या दिवशी ७० टक्के (दोनतारी) साखरेचा पाक तयार करून फोडी पाकवावी. ७० टक्के साखरेच्या पाकात ४ ते ५ दिवस आवळा फोडी पाकवून नंतर फोडी पाकापासून वेगळ्या करून झटपट पाण्यात धुऊन सावलीत ३ ते ४ दिवस सुकवावीत.
 • तयार झालेली आवळा कॅन्डी प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून हवाबंद करून थंड व कोरड्या जागेत साठवावी.

आवळा सरबत

 • शिल्लक साखरेच्या पाकामध्ये पिकलेले आवळे स्वच्छ पाण्याने धुऊन लहान तुकडे करावेत. आवळा तुकडे मिक्सरमधून एक किलो २५० मिलेि. पाणी घालून पेस्ट तयार करा. त्यानंतर तो लगदा स्वच्छ मलमल कापडाच्या साहाय्याने गाळून घ्यावा व तो त्या पाकात मिसळून पाकला दोन उकळ्या आणाव्यात.
 • एक चिमूटभर सोडीयम बेन्झोऐट व १० मिलेि. व्हिनेगरमध्ये मिसळून रसात घालावा व निर्जतुक बॉटलमध्ये थंड झाल्यानंतर भरून ठेवावा.
 • हे सरबत रोज सकाळी घेतल्यास दिक्सभर ताजेतवाने वाटते व पित्ताचे विकार दूर होऊन पोट स्वच्छ करते. तसेच, आवळ्यापासून बनलेली कॅन्डी ही लहान मुलांना आवडीचे पाँट्रिक चॉकलेट आहे. त्याने मुलांची त्वचा निरोगी राहून उंची वाढण्यास मदत होते व प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. हे वर्षभर टिकणारे व लहान मुलांना आवडणारे असल्याने कॅन्डी ही वर्षभर टिकत असल्याने घरामध्ये साठवून  ठेवायला हरकत नाही.


आवळा मुखवास

 • गाळलेल्या रसातून निघालेल्या चौथ्याला पिठीसाखर व विलायची पावडर लावाची व सावलीमध्ये सुकवावे. सहज पोंटिक मुखवास तयार होईल. वरील प्रक्रियेतून कुठलाही शिल्लक पदार्थ वाया जाणार नाही.

लिंबाचे औषधी उपयोग

 • लिंबू हे पाचक, नेत्र सतेज करणारे, उत्साहवर्धक, रुचकर व वायुहरक आहे.
 • उलटी, कंठरोग, कॉलरा, आमवात, रक्तवात व कृमींचा नाश करणारे आहे.  मलेरिया, कॉलरा, घटसर्प, टायफाईड, निमोनिया, फ्लू तसेच स्वाइन फ्लूसारख्या रोगांवर गुणकारी.
 • वनस्पतिजन्य विष पोटात गेल्यास गेल्यास लिंबाचा रस गुणकारी आहे.
 • लिंबाच्या रसात जंतुनाशकता व रोगप्रतिकारकता वाढविण्याची क्षमता असल्याने पावसाळयात नेहमी वापर करावा.
 • लिंबातील विपुल जीवनसत्चामुळे रक्तपित्तावर नियंत्रण आणते. रुस गुणकारी आहे.
 • केसातील कोंडा व केसगळती थांबविण्यासाठी तसेच चेहरा व शरीराच्या अंतर्बाह्य स्वच्छतेसाठी लिंबू व आवळा मिश्रण उत्कृष्ट आहे.
 • दाताच्या व ह्यडांच्या मजबुतीसाठी व संधिवातावर लिंबूरस गुणकारी आहे. दाढेची सूज, घसा व तोंडाच्या विकारावर तसेच स्कर्व्हीसारख्या आजारावर लिंबूरस गुणकारी आहे.
 • लिंबूरस अपचन, हृदयातील धड़धड़ व उच रक्तदाब कमी करणारा आहे.
 • मूत्रपिंड, मूत्राशय व यकृताच्या विकारांवर लिंबूस गुणकारी आहे.
 • मध व लिंबाच्या स्साने बद्धकोष्ठता दूर होते.
 • स्थूलपणा दूर करण्यासाठी लिंबू + मध + पाणी नियमितपणे घेतल्यास फायदा होती.

स्कॅश

साहित्य : १ लिटर फळाचा स्स (100 लिंबे), २ केिली साखर, १ लिटर पाणी पोटेंशिअम मेटाबायसल्फाईड अर्धा चमचा (३ ग्रेम) (सोड़ीयम बेन्झोऐट)

कृती

 • फळांना चांगले स्वच्छ धुऊन साफ करून स्स काढावा. लिटरच्या मापाने मोजून वेगळा ठेवावा. रसानुसार साखर व पाणी घ्यावे. त्याचा गाळून घ्यावी.
 • गाळल्यावर त्या पाकाला थंड करावे व थंड पाकात फळांचा रुस मिसळावा व सोड़ीयम बेन्झोऐट मिसळून तयार रसामध्ये टाकचे व ताबडतोब बॉटलमध्ये १ इंच कमी ठेवून भरावे.

लिंबाचे तिखट लोणचे

साहित्य : लिंबाच्या फोडी १.५ केिली, मेथी २० ग्रॅम, हिंग पावडर ५o ग्रॅम, हळद पूड ३० ग्रॅम, लाल तिखट ५० ग्रॅम, मोहरी पावडर १० ग्रॅम, मीठ २५० ग्रॅम, गोडेतेल १५० ग्रॅम

कृती:

 • लिंबाच्या आठ फोडी करून त्यांना अर्धे मीठ व हळद, तिखट पूर्ण चोळून ठेवावे.
 • दुस-या लहान पातेल्यात फोडणीपुरते तेल काढून बाकीचे तेल गरम करून थंड होण्यास ठेवावे.
 • लहान पातेल्यातील तेल गरम करून त्यात मेथी, हिंग, मोहरीची पूडु
 • शिल्लक राहिलेले मीठ टाकून एकजीव करावे. मिश्रण मोठ्या तोंडाच्या बरणीत भरावे व वरून थंड झालेले तेल ओतावे. बरणी हाताने हलवून आतील संपूर्ण हवा बाहेर जाईल, याची दक्षता घेऊन झाकण लावावे.

लेिंबाचे गोड़ लोणचें

साहित्य: लिंबू २५, साखर १.५ किलो, लाल तिखट, अर्थी वाटी मीठ, पाकाकरिता ३ वाट्या पाणी, १०० ग्रॅम आले, ५० ग्रॅम मनुका.

कृती :

 • मीठ लाकून आठ दिवस भरणीत भरून ठेवावे. भरणीत भरल्यानंतर दिक्सातून एकदा व्यवस्थित हलवावे.
 • लिंबाचा उग्र वास व कडूसर चव जाते. आठ दिवसांनंतर साखरेचा तीनतारी पाक करावा.
 • मीठ लाचलेल्या फोड़ी गरम पाकात घालून अकड़ी आणाची.
 • तिखट, लिंबाचे तुकडे, आल्याचे कप, मनुका घालून लोणचे एकजीव करून रुंद तोंडाच्या बरणीत भरून ठेवावे

लिंबाचे मसाला लोणचे

साहित्य :

लिंबू 1 किलो (२० ते २५ नग), गूळ अर्धा किलो, तेल ५ ग्रॅम, हिंग ५ ग्रेम, मीठ २५0 ग्रेम, सोप पावड़र १५ ग्रेम, धने पावड़र १५ ग्रेम, मेथीपूड अर्धा चमचा, हळद५ ग्रॅम, तिखट ५० ग्रॅम, लोणचे मसाला २० TH.

कृती: लिंबाच्या फोडी करून किलोसाठी १५० ग्रॅम मीठ घालावे. हे मिश्रण एक बरणीत मुरवावे. १५ दिवस ते १ महिन्यानंतर पातेल्यात थोडे तेल टाकून मोहरी, हिंग, मेथीपूड टाकावी. गॅसवर ठेवून बाकी सर्व मसाले एकदाच त्या पातेल्यात टाकावे. त्याचबरोबर गूळ बारीक करून टाकावा. गरम लोणच्यामध्ये गूळ टाकून एकत्र करून बरणीत भरून ठेवावा.


 

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

 © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate