मशरूम ही बुरशी गटातील वनस्पती आहे. मशरूमला मराठीत ‘आळिंबी’ असे म्हटले जाते. पावसाळ्यात निसर्गात ही वनस्पती आपल्याला आढळते. ग्रामीण भागात कुत्र्याची छत्री, भूछत्र, तेकोडे, धिंगरी या नावाने ओळखली जाते.
निसर्गात अनेक मुशरूम आढळतात. परंतु त्यात काही विषारी देखील असतात. मशरूम जगात १२,००० हून अधिक जाती आहेत. आज जागतिक मशरूम उत्पादन ८.४९५ दशलक्ष मॅट्रिक टन आहे. त्यापैकी ५५% युरोप, २७% उत्तर अमेरिका व १४% पूर्व आशिया खंडात घेतले जाते. मशरूमची लागवड प्रामुख्याने पूर्व आशिया, तैवान, चीन, कोरिया, इंडोनेशिया या देशांत केली जाते. जर्मनीमध्ये मशरूमचे सर्वात अधिक सेवन केले जाते.
भारतामध्ये बटन (Agaricus bisporus), शिंपला (pleurotus sp.), धानपेढ्यांवरील (Volvariella volvacea) या जातीच्या मशरूमची लागवड केली जाते.
बटन मशरूमची लागवड मोठ्या प्रमाणात हिमाचल प्रदेश, आसाम, पंजाब या प्रदेशात केली जाते. बटन मशरूमची लागवड कंपोस्ट खतांवर केली जाते. दीर्घ मुदतीची पद्दत (२६-२८ दिवस) किंवा कमी मुदतीच्या पद्दतीने (१६ ते १८ दिवस) कंपोस्ट तयार केले जाते. ते पिशव्यांमध्ये भरून त्यांचे निर्जंतुकीकरण केले जाते. कंपोस्टच्या वजनाच्या ५% ते १०% या प्रमाणात बी पेरले जाते. १२-१५ दिवसाने बुरशीची वाढ झाल्यावर दीड इंच जाडीचा कंपोस्ट खात, माती, वाळू यांच्या निर्जंतुक मिश्रणाचा थर द्यावा लागतो व उत्त्पादनाकरिता तापमान १२ अंश सेल्सिअस लागते.
नैसर्गिक वातावरणात (तापमान २० अंश ते ३० अंश सेल्सिअस व आद्रता ८०-८५%) या मशरूमची लागवड ८-१० महिने करता येते.
संपूर्ण भारतात या मशरूमची लागवड करतात. धिंगरी मशरूमची लागवड बटन मशरूमपेक्षा अल्पखर्चिक व किफायतशीर आहे. अत्यंत अल्प जागेत अधिक पैसे खर्च न करता उत्तम उत्त्पन्न देणारी जात म्हणून शिंपला मशरूमचा उल्लेख केला जातो.
धिंगरी मशरूमच्या उत्त्पन्नाकरिता अल्प पाणी लागते. ही अत्यंत महत्वाची बाब आहे. २०० लि. पाणी असतानासुद्धा आपण धिंगरी आळंबीचे उत्पादन घेऊ शकतो.
स्त्रोत : वनराई संस्था
अंतिम सुधारित : 6/5/2020
बिहारमध्ये अळिंबी शेतीलाही मोठी चालना मिळाली आहे. ...
आळिंबीचे अर्थशास्त्र हा एक महत्वाचा विषय आहे. आळिं...
भूछत्रे : (इं. मशरूम,टोडस्टूल; हिं. कुकुरमत्ता, धि...
या भागात ऑईस्टर मशरूमच्या उत्पादनाविषयी माहिती दि...