অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मशरूम लागवड आवश्यक बाबी

मशरूम लागवडीसाठी खालील बाबी आवश्यक आहेत.

१.       जागा

२.      पाणी

३.      कच्चा माल

४.     प्लास्टिक

५.     बियाणे

६.      वातावरण

७.     यंत्रसामुग्री

 

१.जागा :

मशरूम उत्पादनाकरीता जागा ही बंदिस्त स्वरुपाची लागते. झोपडी, बांबू हाऊस, मातीचे घर यांमध्ये मशरूम उत्त्पन्न अत्यंत उत्तम घेता येते.

२.पाणी :

पाणी ही अत्यंत महत्वाची बाब आहे. मशरूम उत्पादनाकरिता पाणी स्वच्छ व शुद्ध हवे.

३.कच्चा माल :

आळिंबी मशरूम करिता कच्चा माल म्हणजे शेतीमधील टाकाऊ घटक :

(१)    गव्हाचा भुसा, (२) कपाशीच्या काड्या, (३) भाताचा पेंढा, (४) गवत, (५) सोयाबीनचा

भुसा, (६) कडबा इत्यादी.

आळिंबी उत्पादन प्रामुख्याने कच्च्या मालावर अवलंबून असते. कच्च्या मालातील सेल्युलोज हा घटक आळिंबीचे महत्वाचे अन्न आहे. सेल्युलोज ज्या घटकात अधिक, त्यावर आळिंबीचे उत्त्पन्न अधिक येते.

 

धिंगरी आळिंबीचे निरनिराळ्या पालापाचोळ्यावर मिळणारे उत्पादन :

 

अ.नं.

घटक

(१ कि.ग्रॅ. वाळलेले)

उत्पादन

ताजे (ग्रॅम)

१.

कपाशीची पाने काड्या

८२०

२.

भाताचे काड

५६०

३.

गव्हाचे काड

५२०

४.

सोयाबीनची पाने / काड्या

५४०

५.

ज्वारीचा कडबा

४५०

६.

गवत

४४०

७.

सूर्यफुलाची ताटे

३५०

८.

बाजरीची पाने

३७०

९.

नारळाची पाने

३४०

१०.

उसाचे पाचट

३२०

घटक पदार्थ निवडताना सर्वात महत्वाची बाब म्हणजे घटक ( कच्चा माल) कोरडा हवा. तसेच तो नवीन काढणीचा हवा व तो पावसात भिजलेला नसावा. कच्चा माल साठविताना बंदिस्त  जागेचा वापर करावा.

४.प्लास्टिक :

आळिंबी उत्त्पादानाकरिता प्लॅस्टिक पॉलीप्रॅपिलीनचे वापरावे व जाडी (गेज) ८०-१०० वापरावा. प्लॅस्टिकचा आकार १८ बाय २२ इंच किवा २२ बाय २७ इंच असावा.

५.बियाणे :

आळिंबीच्या बियाणांस स्पॉन असे म्हणतात. गव्हाच्या दाण्यावर मशरूमच्या बिजाणूंची वाढ केली जाते. प्लॅस्टिकच्या पिशवीत ५०० ग्रॅम, १ कि.ग्रॅ. या मापात हे बियाणे उपलब्ध असते.

६.वातावरण :

मशरूमकरिता वातावरण हे अंधारमय हवे. वातावरणात आद्रता ७० ते ८०% , तापमान १८ ते २८ अंश सेल्सियस असावे. उत्तम उत्पादनाकरीता खेळती हवा असणे ही एक महत्वाची बाब आहे.

७.यंत्रसामग्री :

आळिंबी उत्पादनाकरीता खूप मोठी अवजड व महाग यंत्र किंवा साहित्य लागत नाही.

 

१.       ड्रम – (कच्चा माल भिजवण्यासाठी )

२.      हिटर – (पाणी गरम करण्या करिता )

३.      फोगर्स / ह्युमिडी फायर  - (वातावरण नियंत्रित)

४.     ड्रायर – आळिंबी वाळविण्याकरिता

५.     थर्मामीटर – तापमानाची नोंद ठेवण्याकरिता

६.      हेअर हायग्रोमीटर – आद्रता दर्शवण्याकरिता

 

स्त्रोत : वनराई संस्था

अंतिम सुधारित : 7/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate