অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रेशीम व्यवसायाची वाटचाल व भविष्यातील संधी

रेशीम व्यवसायाची वाटचाल व भविष्यातील संधी

रेशीम शेती उद्योग हा कृपिंवर आधारीत व रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला ग्रामीण भागाचा कायापालट करणारा शेतीपूक व्यवसाय आहे. महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती व हवामान रेशीम शेती उद्योगास अत्यंत अनुकूल असून उत्पादनाची शाश्वती व धोक्यापासून हमी असणारा तसेच सध्याच्या परिस्थितींतील शेतक-याच्या आत्महत्या रोखण्याची क्षमता असणारा उद्योग होय. पावसाची अनियमितता, निसर्गाचा लहरीपणा, वेळेत उपलब्ध होऊ न शकणारा मजूरवर्ग, बेभरवशाची बाजारपेठ आणि कच्च्यामालाची अनिश्चितता या सर्व बाबींमुळे शेतीच्या उत्पादनावर जेवढा खर्च होतो, तेवढे उत्पन्नही मिळत नाही. पर्यायाने, फक्त शेतीवर अवलंबून राहणे शेतक-यास दुरापास्त झालेले आहे. त्यामुळे सदरील बार्बींचा सर्वकष विचार करून शेतकरी बांधवाना शेतीवर आधारीत पूरक उद्योग करणे ही काळाची गरज आहे. रेशीम शेती हा एक सर्वोत्कृष्ट पूरक उद्योग म्हणून पुढील बाबी विचारात घेता शेतक-यांस एक वरदान ठरणारा आहे.

तुती लागवड व कीटक संगोपनाद्वारे कोष निर्मिती व विक्रीद्वारे हमखास उत्पादन घेता येऊ शकते. महाराष्ट्रात ह्या उद्योग अधिक फायदेशीर ठरत आहें. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड़ा व विंदर्भ विभागात मोठ्या प्रमाणात तुती लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. रोजगाराची प्रचंड क्षमता असलेल्या या उद्योगामुळे ग्रामीण विकासात याचे मोठे योगदान आहे. यशस्वी रेशीम शेती उद्योगासाठी तुतीची लागवड व कोट्क संगोपन व्यवस्थापन शास्त्रीय दृष्टिकोनातून होणे गरजेचे आहे. रेशीम शेती उद्योगाला संपूर्ण महाराष्ट्रात भरपूर वाव आहे. रेशीम शेती उद्योगातील निर्मित कोषापासून रेशीम धागा व त्यापासून वस्त्र तयार करतात.

रेशीम वस्त्राला देशात आणि आपल्या राज्यात प्रचंड मागणी आहे. ती मागणी दरवर्षी १६ ते 20 टक्क्यांनी वाढ्त आहे. स्वयंरोजगार निर्मितीची प्रचंड ताकद या रेशीम शेतीत आहे. तुती लागवडीद्वारे पर्यावरणाचे रक्षण, रेशम कोटक संगीपन, धागा व वस्त्र निर्मितीं, स्वयरोजगार निर्मिती तसेंच ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणारे स्थलांतर रेशीम शेती उद्योगामुळे थाबवता येतें. महाराष्ट्रात एक एकरातील तुती लागवडीद्वारे वर्षभरात लक्षाधीश झालेल्या शेतक-यांची नोंद आहे.

महाराष्ट्रातील विदर्भामध्ये गडचिरोली, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर या चार जिल्ह्यात जंगलातील ऐन/अर्जुन वृक्षांवर टसर रेशीम उद्योगालाही प्रचंड वाव आहे. विशेषतः विंदर्भात 'सिल्क आणि मिल्क' ही संकल्पना एकत्रितपणे राबविल्यास एका एकरातील तुती लागवडीपासून दर महिन्याला कोष विक्रीपासून मिळणारा पैसा व एका गायीपासून मिळणा-या दुधाचा दररोजचा पैसा तसेच तुर्तीच्या फांद्या व पाला दुधाळ जनावरांना, गायीला खाद्य म्हणून दिल्यामुळे ३० टक्के खाद्यातील बचत आणि दर्जेदार दूध उत्पादन या जमेच्या बाजू आहेत. विदर्भातील अमरावती-बडनेरा महामार्गावरील राज्य रेशीम पार्कमध्ये तुर्तीची लागवड, रेशीम कीटकांचे संगोपन तसेच धागा निर्मिती या सर्व बार्बी एकत्रिपणे पहायला मिळतात. राज्यात १८ जिल्ह्यात तुती रेशीम तर गडचिरोली/भंडारा/गोंदीया/ चंद्रपूर या ४ जिल्ह्यात टसर रेशींमशेती योजनेस प्रोत्साहन दिले जाते. रेशीम

विभागाचे राज्य संचालनालय नागपूर येथे असून एकूण २२ जिल्ह्यात रेशीम उद्योग राबविंला जातो. रेशीम शेती योजनेसंबंधी तांत्रिक माहिती रेशीम विंभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. वेबसाईटचा पत्ता mahasiilk .maharashtra .gov .in असा आहे.

हवामान

राज्यातील सर्व जिल्ह्यातील हवामान कमी / अधिक प्रमाणात तुती लागवड़ीकरिता पोषक असून, रेशम कोटक संगोपनाकरिता लागणारे २५ ते २८ अंश सेंन्सियस तापमान व ६५ ते ८५ टक्कें आर्द्रता राज्यात मिळू शकते.

रेशीम शेती उद्योगच का?

 1. पाण्याचा निचरा होणा-या कोणत्याही जमिनींच्या प्रकारात (पाण्याची सोय असणा-या) रेशीम उद्योगाची सुरुवात करता येते.
 2. एकदा तुर्तीची लागवड केल्यानंतर तुर्तीपाल्याचा कीटक संगोपनास १g ते १५ वर्षापर्यंत उपयोग होत असल्याने दरवर्षीचा लागवड खर्च पुन्हा-पुन्हा करावा लागत नाही.
 3. अल्प भांडवलाची गुंतवणूक करून दरमहा पगारासारखे उत्पन्न मिळवून देणारा हा उद्योग आहे.
 4. घरातील वृध्द, लहान मुलै, स्त्रिया, अपंग व्यक्ती देखील कीटक संगोपन काम करू ३ाकxतात.
 5. इतर बागायती पिकांपेक्षा तुतीबाग जोपासण्याकरिता १/३ पाणी लागते.
 6. कक्ष्यामालाच्या उपलब्धतेची शाश्वती व तयार होणा-या पक्क्या मालाच्या खरेदींची हमी असणारा एकमेव उद्योग आहे.
 7. एक एकर तुती लागवडीवर संगोपनाच्या वेळी किंड्यांनी खाऊन शिक्षक राहिलेला तुतीपाला आणि विटेवर दोन दुभत्या जनावरांचे पालनपोषण व दुधाच्या वाढीस उपयोग होऊ शकतो.
 8. रेशीम अळ्यांच्या विंछेचा उपयोग बायॉगॅससाठी केला जातो.
 9. एक एकर रेशीम शेती उद्योगापासून वार्षिक रू.५० ते ६५ हजार निव्वळ उत्पन्न मिळू शकते.
 10. रेशीम शेती उद्योगामुळे ग्रामीण भागात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या रोजगार उपलब्ध होत असल्याने शहराकडे होणारे स्थलांतर रोखण्यात मदत होते.
 1. तुतीची लागवड करून पानांची / तुतीच्या फांद्या कीटक संगोपनासाठी अथवा कोटक संगीपन केंद्रांना विक्रों करता येतील.
 2. संगोपनासाठी निरोगी अंडीपुंज तयार करून विक्री करणे.
 3. सामुदायेिक चॉकी कैिटकअळ्यांचे संगोपन करून अन्य रेशीम कीटक संगोपन करणा-या शेतक-यांना वेिक्री करणे.
 4. केवळ प्रौढ वयाच्या अळ्यांचे संगोपन करून कोषनिर्मिती करणे.
 5. कोष खरेदी करून त्यापासून धागा गुंडाळण्याची प्रक्रिया करणे.
 6. रेशीम धाग्यापासून हातमाग व यंत्रमागावर वस्त्र विणणे.
 7. रेशीम वस्त्रावर रंगाई व छपाई काम करणे.
 8. रेशीम वस्त्रांच्या वस्तू तयार करणे. पैठणीसारख्या रेशीम वस्त्रांची विक्री व व्यवस्थापन करणे.
 9. रेशीम निर्मितीसाठी लागणारी साधने निर्माण करणे. जसे संगोपन साहित्य, कोष प्रक्रिया साहित्याचे उत्पादन व दुरुस्ती करणे इत्यादी प्रकारचे विविध कामकाज खाजगीस्त्यिा व सामूहिकपणे करता येतील.
 10. रेशीम व्यवस्थापनातील कौशल्य विकास व गुणवत्ता वाढविण्याकरिता स8ा व मार्गदर्शन केंद्र चालविणे. भारत हा जगातील दुस-या क्रमांकाचा रेशीम उत्पादक देश आहे. जगातील सर्व प्रकारची म्हणजेच तुती, ट्सर, एरी तर मुगा रेशीमचे उत्पादन फक्त भारतात होते.

सन २०१४-१५ मध्ये भारतात तुती रेशीम (२१,३९० मे.छन) ७४.५१  टक्के, टसर (२,४३४) ८.४८टक्के , एरी (४,७२६ मे.टन १६४६टक्के  आणि मुगा (१५८ मेट्न) 0.५५ टक्के असे एकूण उत्पादन (२८,७0८ मेटन) एवढे होते. त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा २२१ मेटन एवढा आहे.

राज्यातील रेशीम उद्योगाचा आढावा

देशात रेशीम उत्पादन १५ व्या शतकापासून घेतले जात असले तरी सन १९४९ मध्ये केंद्रीय रेशीम मंडळाची भारत सरकारने स्थापना केल्यानंतर नियोजन पद्धतीने रेशीम उत्पादन, वेिस्तार वेिकास आणि संशोधनाची वाटचाल सुरू झाली. आज जवळजवळ ८0.0३ लाख लोकांना देशात प्रत्यक्ष रोजगार याद्वारे मिळत आहे.

देशात रेशीम उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असले तरी ६ ते ७ हजार मेटन रेशीम धागा इतर देशातून आयात केला जातो. त्यावर प्रक्रिया करून पुन्हा दर्जेदार रेशमी वस्त्रे जवळजवळ शंभर देशांना निर्यात केली जातात. सन २०१४-१५ मध्ये देशातून रु. २८२९.८७ कोटीची वस्त्रे निर्यात करण्यात आली. (ड़िजीसीआयएस, कलकत्ता, एप्रैिल-20१५) यामध्ये प्रामुख्याने नैसर्गिक रेशम धागे, वस्वे, रेडिमेड गारमेंटस, सिल्क कारपेटस आणि रेशीम वेस्टचा समावेश होतो.

अ.क्र.वर्षतुती लागवडीखालील क्षेत्र (एकर)कोषधागा निर्मिती (मे.टन)
उत्पादन (मे.टन)उत्पादकता (कि.ग्रॅ)/एकर/वर्ष )
२००४-०५४१६३.७५373.8०८९.७८४६.७३
२००५-०६३५३८.००४२५.८८१२०.३७५३.२४
२००६-०७६६७७.००७६७.५०१३२.८३९५.७४
२००७-०८१०२८०.००११८३.७०११५.१४१४७.९६
२००८-०९१०८६४.००१५९३.२०१४६.६५१९९.१५
२००९-१०९३५९.००१७४३.८०१८६.९६२१८.७२
२०१०-११७३३५.२५१५६३.५०२१६.९४१९८.७७
२०११-१२५८१५.००१२२७.८१२११.११५३.४
२०१२-१३४३८६.१०७००.००१५९.६८७.५
१०२०१३-१४३७२०.२५७६०.९७२०४.५६१११.५२

राज्यातील टसर रेशीम उत्पादनाची सध्यस्थिती

अ.क्र.तपशीलवर्ष
२००९-१०२०१०-११२०११-१२२०१२-१३२०१३-१४
टसर खाद्य झाडांचा वापर (हेक्टर)१८८६६१८८६६६०१५८७८८६४९१
अंडीपुंज (संख्या)५५८०००५७५०००८३६८६३९४६५७५६३८४१६
कोष उत्पादन (संख्या -लाखात )२००.००१६८.६१३०८.६५२४३.८३१८७.१६
टसर धागा निर्मिती (कि.ग्रॅ)८४६०.००६७४४.12340.००९७५३.२१०१९९.४६
रोजगार निर्मिती (मनुष्यदिन)१२६९०००१०११०००१८५१९००१४६२९८०१५२९९१८

 

राज्यातील तुती रेशीम उत्पादनाची सध्यस्थिती

अ.क्र.तपशीलवर्ष
२००९-१०२०१०-११२०११-१२२०१२-१३२०१३-१४
शेतकरी / लाभार्थी संख्या)६३०५४८९२४००४३२१८३०५७
तुती लागवडीखालील क्षेत्र (एकर)९३५९७३२६५८१६.००४३८३3720.25
अंडीपुंज वाटप (लाखांत)३६.८१३०.५९२२.८५१२.६८१३.५३
कोष उत्पादन (संख्या लाखात )१७४४.००१५९०.१८१२२७.८०७००.०३७६०.९६
रेशीम उत्पादन (मे. टन)१८.००२१४153.4०८८११२
रोजगार निर्मिती - (लाखांत)४६.९८३६.७८२९.०८२१.९३१८.६

रेशीम उद्योगासाठी शासनामार्फत सोई / सवलती

 1. एक एकर क्षेत्रासाठी बेणे / रोपे सवलतीच्या दरात पुरविले जाते.
 2. तुतीची लागवड केलेल्या शेतक-यांना लागवडीपासून कीटकसंगोपनापर्यंत पूर्ण प्रशिक्षण विद्यावेतनासह दिले जाते.
 3. रेशीम अंडीपूंज सवलत दरात पुरविली जातात.
 4. शेतक-यांनी तयार केलेले कोष वाजवीदराने खरेदी करण्यात येतात किंवा खाजगी बाजारपेठेत वाढीव दराने विक्री करता येते.
 5. विनामूल्य तांत्रिक मार्गदर्शन वेळोवेळी केले जाते.
 6. मनरेगा योजनेंतर्गत प्रति एकर अनुदान दिले जाते.
 7. रेशीम उद्योग करण्यासाठी शेतक-यांना बँकेकडून कर्ज मिळण्यासाठी बँकेला शिफारस करण्यात येते.
 8. ठिबक सिंचन संच शेतक-यांना सबसिडीवर दिले जातात.
 9. कीटक संगोपनगृह बांधणीसाठी अनुदान दिले जाते. आत्महत्याग्रस्त भागातील शेतक-यांना हा उद्योग म्हणजे ख-या अर्थाने संजीवनीच आहे.

राज्यातील असंख्य शेतक-यांचे कुटुंब रेशीम कीटकांच्या संगोपनात व्यस्त राहिल्यामुळे काही गावे व्यसनमुक्त व तंटामुक्त झालेली भेदभाव विसरून एकत्रितपणे सशक्त समाजव्यवस्था निर्माण करण्याची ताकद रेशीम शेती उद्योगात आहे. विशेषत: महिलांचे योगदान यामध्ये ८o टक्के आहे. घरातील ७० वर्षांच्या आजी व १० वर्षांचा नातू या उद्योगात योगदान देऊ शकतो. एवढेच नव्हे तर महिला बचत गट एकत्रितपणे येऊन शासनाच्या प्रशिक्षण, यंत्रसामुग्री तसेच वित्तीय सहभागाद्वारे कोषापासून धागा, वस्त्र निर्मिती याही क्षेत्रात येऊ शकतात. महिलांना प्रशिक्षण देऊन कोषापासून हार, गुच्छ इ. तयार करून त्यापासूनही रोजगार मिळू शकतो. एकंदरीत 'करा रेशीम शेती तुम्ही, सोबत आहोतच आम्ही' व 'करा रेशीम शेती तुम्ही , पिकवा मातीतून मोती '  रेशीम उद्योग सुरू करण्यासाठी आमच्या शुभेच्छा!


स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate