सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीकडे लक्ष द्यावे. सध्याच्या ढगाळ हवामानामुळे काही भागात तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसतो आहे. प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून उपाययोजना कराव्यात.
पूर्वहंगामी ऊस लागवडीत पिकाची वाढ होत असताना थंडीच्या कडाक्याने ग्रासल्याने विदर्भ, मराठवाड्यातील आणि विशेषतः अमरावती भागातील उसास फुटवा कमी आल्याचे निदर्शनास आले आहे.
अवकाळी पडलेल्या किंवा पडत असलेल्या पावसामुळे विविध भाज्या व फळबागामध्ये रोग किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यासाठी खालील उपाययोजनाचा अवलंब फायदेशीर ठरेल.
एखाद्या प्रदेशात दीर्घकाळ, सातत्याने सरासरीपेक्षा खूप कमी किंवा अजिबात पाऊस न पडणे म्हणजे अवर्षण होय.
उन्हाळ्यात विविध प्रकारची पिके घेतली जातात. उष्ण हवा, कोरडे हवामान, आणि सोसाट्याचा वर यामुळे पाण्याचे बाष्पीभवन जोरात होते
हवामानबदलास कारणीभूत ठरणारे एल निनो आणि ला निना या विषयीची माहिती येथे देण्यात आलेली आहे.
जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने हरितगृह वायूंचे प्रमाण कमी राखण्यासंदर्भात विविध कायदे, नियम आहेत.
वनस्पतींच्या प्रकारानुसार आणि त्यांच्या शरीराच्या सहनशक्तीनुसार कमाल आणि किमान तापमान सहन करण्याची त्यांची मर्यादा निश्चित आहे.
कृषी व्यवसायात अन्नधान्ये, जनावरांचा चारा, कापूस, तंबाखू यांसारखी व्यापारी पिके इत्यादींची लागवड, संरक्षण आणि संस्करण त्याचप्रमाणे गुराढोरांची पैदास आणि संगोपन यांचा मुख्यतः समावेश होतो.
शेती व हवामान यांच्या परस्पर संबंधांचे शास्त्र. हवामानाच्या शेतीवर परिणाम होतो ही गोष्ट मानवाला पुरातन काळापासून माहीत असली, तरी ह्यासंबंधी पद्धतशीर संशोधन काही प्रगत देशांतून विसाव्या शतकाच्या आरंभालाच सुरू झाले आहे.
शेतकर्याच्या उपयोगी पिक कृषी संदेश
हवामानातील बदलामुळे दुष्काळ,गारपीट, थंडी या रूपांनी शेतीसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. दुर्दैवाने कृषी संशोधनात हवामान बदलावर अजून विचार केला गेला नाही.
राज्याच्या बऱ्याच भागात आता थंडी सुरू झाली आहे, त्यामुळे तापमान कमी होत आहे. मागील मृगबाग लागवड केलेल्या केळी बागेची मुख्य वाढीची अवस्था आहे.
काही ठिकाणी तापमान पाच अंशापेक्षाही खाली उतरले आहे, अशा परिस्थितीचा फटका पिकांना बसतो आहे.
एकाच ठिकाणी ओलांड्यावरती जास्त फुटी फुटलेल्या असल्यास अशा फुटींच्या पुंजक्यांमध्ये आर्द्रता वाढते व आतमध्ये प्रकाश चांगल्या रीतीने पोचत नाही. अशा परिस्थितीमध्ये फुटींच्या आतल्या भागांमध्ये भुरी वेगाने वाढण्याची शक्यता असते.
आपत्तीच्या मालिकेत वीज कोसळणेही सामील आहे. दरवर्षी शेकडो जण यामुळे प्राणास मुकतात. लायटनिंग अरेस्टरची यंत्रणा हा धोका कमी करते. याकडे सर्वांनीच लक्ष देण्याची गरज आहे.
गेल्या काही वर्षांपासून वातावरणामध्ये सातत्याने बदल होत असून, तापमानातील बदलामुळे गहू पिकाच्या उत्पादनामध्ये घट होत आहे.
पुण्यातील एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील संशोधकांच्या गटाने गारपीटरोधक यंत्रणा विकसनाचे संशोधन पूर्ण केले आहे.
अशावेळी द्राक्षबागेमध्ये अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे येणाऱ्या अडचणींवर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
गारपीट आणि अवकाळी पावसाने नुकसान झाले असून, त्या तडाख्यातून कमी-अधिक प्रमाणात वाचलेल्या पिकांचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
जे गुणधर्म जमिनीची उत्पादन क्षमता ठरविण्यास कारणीभूत होतात ते लक्षात घेऊन त्यानुसार निरनिराळया गुणधर्माच्या क्षेत्राचे योजनाबध्द वर्गीकरण करणे यास जमिनीचे क्षमतेनुसार किंवा उपयोगितेनुसार वर्गीकरण असे म्हणतात
अहमदनगर जिल्हातील पाथर्डी तालुख्यातील जोहार्वाडी या गावात वाटर या संस्थेच्या माधमातून एक हवामान दर्शक यंत्र बसवण्यात आले आहे.
कोकणातील प्रामुख्याने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजूची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे आंबा पिकाला ऑक्टोबर महिन्यात पालवी येऊन नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मोहोर येण्यास सुरवात होते.
ढगाळ हवामानामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी थायोमेथोक्झाम 1 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
वाढते तापमान व अवर्षणात मक्यासारख्या पिकाच्या उत्पादनावर काय परिणाम होतात, यासंबंधी आफ्रिकेत सध्या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांच्या मदतीने चाचण्या सुरू आहेत.
अंजिराचे झाड फळांवर येण्याच्या बेतात असताना पाऊस पडला किंवा आकाश ढगाळलेले असेल तर ते वातावरण अंजीर फळांना हानिकारक ठरते.
कोकणातील आंबा आणि देशावरील ऊस, द्राक्ष, हळद, आले, डाळिंब, केळी याबरोबरच भाजीपाला पिकांनाही हे हवामान लाभदायक ठरणार आहे.
जानेवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत सर्वसाधारणपणे थंडी वाढत जाते, मात्र "थेन' वादळाचा परिणाम होऊन थंडीत घट झाली आहे. या घटलेल्या थंडीच्या परिणामाची पीकनिहाय चर्चा या लेखात केली आहे.
सध्या बागेत वेल वाढीच्या विविध अवस्था दिसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये बागायतदारांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
द्राक्ष बागेत सध्याच्या परिस्थितीमध्ये वातावरण चांगले असल्याचे दिसते.