जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने हरितगृह वायूंचे प्रमाण कमी राखण्यासंदर्भात विविध कायदे, नियम आहेत. मात्र, या हरितगृह वायूंसाठी पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या काही घटकांचेही वातावरणातील ओझोनच्या थरावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.
लिड्स विद्यापीठातील पृथ्वी व पर्यावरण विद्यालयातील संशोधक डॉ. रायन होस्सायनी यांनी सांगितले, की अत्यंत कमी कालावधीच्या घटकांची (very short-lived substances-VSLS) निर्मिती ही नैसर्गिक आणि औद्योगिक स्रोतातून होते. त्यातील औद्योगिक स्रोतातून तयार होणाऱ्या घटकावर बंधने आणण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या निरीक्षण नियमावलीचा आधार घेतला जातो. पूर्वी ही रसायने अत्यंत कमी प्रमाणात ओझोनच्या थराला इजा पोचवत होती. मात्र, त्यांचे प्रमाण अत्यंत वेगाने वाढत असून, अशीच वाढ कायम राहिल्यास त्याचे ओझोनच्या थरावर नक्कीच विपरीत परिणाम होऊ शकतात.
लिड्स विद्यापीठामधील संशोधकांनी पर्यावरणाच्या त्रिमितीय संगणकीय प्रारूपांचा वापर केला आहे. त्यामध्ये गेल्या दोन दशकांतील VSLS चे प्रमाण वापरण्यात आले आहे. पर्यावरणातील डायक्लोरोमिथेन मानवनिर्मित VSLS चे प्रमाण वेगाने वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्याबद्दल माहिती देताना संशोधक मार्टीन चिपरफिल्ड म्हणाले, की पर्यावरणातील डायक्लोरोमिथेन या वायूंच्या प्रमाणातील बदलांचा व त्यामागील नेमक्या स्रोतांवर सातत्याने लक्ष ठेवले पाहिजे. सध्या क्लोरोफ्लोरोकार्बन च्या परिणामावर लक्ष ठेवण्यात येते. मात्र, ओझोन आणि वातावरणातील भविष्यातील अंदाजामध्ये अनिश्चितता निर्माण करण्याची ताकद वाढत्या डायक्लोरोमिथेनमध्ये आहे.
अमेरिकेतील राष्ट्रीय सागरी आणि वातावरणीय प्रशासन (NOAA) विभागातील डॉ. स्टिफन मॉन्टेझका यांनी सांगितले, की क्लोरोफ्लोरोकार्बनसारख्या वायूला पर्याय म्हणून ओझोनपूरक वायूमध्ये डायक्लोरोमिथेनचा वापर वाढत आहे. मात्र, त्यातील कमी कालावधीच्या रासायनिक घटकांचाही विपरीत परिणाम ओझोनच्या थरावर होत असल्याचे दिसून आल्याने काळजी वाढत आहे.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
हरितगृह प्रभावातील मिथेनचा सहभाग 18 टक्के असला तरी...
वाढत्या हवामानाचा परिणाम कुक्कुटपालनावर झालेला आढळ...
जगातलं अर्धं कार्बन उत्सर्जन हे आजच्या औद्योगिक शे...
उन्हाळ्यातील प्रखर सूर्यकिरणांमुळे व पिण्याच्या पा...