पूर्ण वाढलेले तुडतुडे करड्या रंगाचे, पाचराच्या आकाराचे 3 ते 5 मि.मी. लांब असतात. त्यांची पिल्ले काळसर तपकिरी रंगाची असतात. तुडतुडे कोवळी पालवी, मोहोर तसेच कोवळ्या फळांच्या देठातून रस शोषून घेतात. परिणामी मोहोर कमकुवत होतो व गळतो. तसेच छोटी फळे देखील गळतात. तुडतुड्याच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या चिकट पदार्थावर काळ्या बुरशीची वाढ होते. अधिक प्रादुर्भावामध्ये संपूर्ण झाड काळसर दिसते. तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या फवारणीसूचीचा अवलंब करावा. त्यातील
सध्या मोहोरावर फुलकिडींचा देखील प्रादुर्भाव दिसून येत आहे. फुलकिडीच्या पिवळ्या तसेच काळ्या प्रजाती आढळून येत आहेत. फुलकिडी आकाराने फारच लहान, 1 ते 1.5 मि.मी. लांब, निमुळत्या आकाराच्या असतात. त्या कोवळी पाने, मोहोरातील फुले व मोहोराचे दांडे तसेच लहान फळे खरवडतात. त्यामुळे तेथे करड्या रंगाचे चट्टे उठतात. पाने वरच्या बाजूला वळतात, मोहोर तांबूस होऊन गळतो. तर फळांवर करड्या रंगाचे चट्टे उठतात.
काजू पीक सध्या फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या सर्वच जातींना (वेंगुर्ला- 1 ते वेंगुर्ला- 8) मोहोर आलेला आहे. मात्र काही स्थानिक रोपांच्या लागवडीमध्ये काही ठिकाणी पालवी अवस्था, तर काही ठिकाणी मोहोर येण्यास सुरवात झाली आहे.
टी मॉस्किटोचा प्रादुर्भाव
या पालवी व मोहोरावर काजूवरील ढेकण्या (टी मॉस्कीटो)चा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. पूर्ण वाढलेले ढेकण्या तसेच त्यांची पिल्ले कोवळ्या पालवीतून, मोहोरातून तसेच कोवळ्या फळांमधून रस शोषून घेतात व त्या जागी विषारी द्रव सोडतात. त्यामुळे कोवळ्या पालवीवर व मोहोरावर काळे चट्टे उठतात. हे चट्टे वाढून पूर्ण पालवी व मोहोर सुकतो, जळल्यासारखा दिसतो. फळावर काळ्या रंगाचे खोलगट खड्डे उठतात. या किडीचे वेळीच नियंत्रण न केल्यास उत्पादनात घट संभवते.
फुलकिडीचा प्रादुर्भाव
काजू बागेत कोवळ्या पालवीवर व मोहोरावर फुलकिडीचा (थ्रिप्स) देखील प्रादुर्भाव दिसून येत आहे. फुलकिडी पिवळसर रंगाच्या, अतिशय सूक्ष्म आकाराच्या असतात. त्या कोवळी पालवी, कोवळा मोहोर तसेच कोवळी फळे खरवडतात. फळांवर करड्या रंगाचे चट्टे उठलेले दिसतात. काजू बिया खराब दिसतात, वेड्यावाकड्या वाढतात, तसेच उत्पादनात घट येते.
या दोन्ही किडींच्या नियंत्रणासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या फवारणी सुचीचा वापर करावा.
- मोहोर अवस्थेतील बागेमध्ये, प्रोफेनोफॉस 10 मि.लि. प्रति 10 लिटरप्रमाणे फवारणी करावी.
- फळधारणा सुरवात झालेल्या बागेमध्ये, लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ( 5 टक्के) 6 मि. लि. प्रति 10 लिटर.
संपर्क-
1) डॉ. बी. एन. सावंत, 9422436117
2) प्रा. ए. वाय. मुंज, 9422918452
(प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग.)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
ही गोष्ट आहे अकोल्याच्या ज्योतीताईंची...! अकोला जि...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...