सध्या सर्वत्र थंडीचा कडाका जाणवत आहे. काही ठिकाणी तापमान पाच अं शापेक्षाही खाली उतरले आहे, अशा परिस्थितीचा फटका पिकांना बसतो आहे. परदेशातही थंडीचे चित्र वेगळे नाही. तुर्कस्तानचेच पाहा, तेथे थंडीतील गार वाऱ्याचा फटका केळी, तसेच लिंबूवर्गीय फळपिकांना बसला आहे, त्यामुळे उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे.
तुर्कस्तानातील अलान्या येथे तर जोरदार पाऊस व सरासरी तापमानापेक्षा तापमान खाली जाणारे हवामान जाणवत आहे. अलान्या केळी उत्पादक संघटनेचे हेस्येन ग्ने म्हणाले, की या भागातील 50 टक्के केळींना प्रतिकूल हवामानाचा फटका बसला आहे. येत्या 10 ते 15 दिवसांत तापमान सर्वसाधारण पातळीपर्यंत येईल असा अं दाज आहे. अध्यक्ष म्हणाले, की प्रत्येक केळी उत्पादकाला दरवर्षी काही ना काही अडचणींना सामोरे जावे लागत असून, त्यांनी हवामानाच्या अंदाजावर सातत्याने लक्ष ठेवायला हवे. केळींच्या बरोबरीने तुर्कस्तानातील लिंबूवर्गीय फळांनाही थंडीचा फ टका बसला असून, त्यांची गुणवत्ता व पर्यायाने दरही घसरले आहेत. थंडीपासून आमच्या मालाचे संरक्षण करण्यासाठी आम्हाला सरकारने साठवणुकीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. थंडीमुळे आमच्या लिंबांचा दर्जा घसरू लागला आहे, अशी प्रतिक्रिया एका शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.
अर्जेंटिना वा अन्य देशांबरोबर आम्ही स्पर्धा करू शकत नाही, असेही त्याने सां गितले. तुर्कस्तानातील एक दशलक्ष टन लिंबूवर्गीय उत्पादनापैकी सात लाख 50 हजार टन उत्पादन केवळ मर्सिन व अडाना या भागात होते. कोलंबियातही हिवाळ्यामुळे केळी निर्यातीवर परिणाम झाला आहे. कोलंबिया केळी उत्पादक सं घटनेचे अध्यक्ष रोर्बेटो होयोस म्हणाले, की देशातील काही केळी पट्ट्यामध्ये पाऊस झाल्याने केळी पिकाचे नुकसान झाले आहे. अर्थात या नुकसानीची तीव्रता अद्याप कळलेली नाही. हिवाळी तापमानाचा परिणाम तेथील वाहतूक व्यवस्थेवर, तसेच निर्यातीत गुंतलेल्या कर्मचाऱ्यांवरही झाला असल्याने निर्यात तूर्त तरी थां बलेली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
क्रेनमध्ये भारतीय केळ्यांची आयात सुरू झाली आहे. अर्कादिया ही या देशातील फ ळे व भाजीपाला व्यापार क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. या कंपनीमार्फत भारतीय केळी छोट्या प्रमाणात देशात जूनमध्ये पोचली. आता हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात केळ्यांची आयात होऊ लागली आहे. इक्युडोर हा देशही आघाडीचा केळी उत्पादक आहे. या देशाच्या तुलनेत भारतीय केळ्यांचा आकार लहान असतो, मात्र भारतीय केळ्यांचा स्वाद व गोडी अधिक असल्याचे संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर इक्युडोरच्या तुलनेत भारतीय केळ्यांची किंमत 20 टक्क्यांपेक्षा कमी असते. या सर्व गोष्टी पाहता भारतीय केळ्यांना युक्रेनच्या बाजारपेठेत इक्युडोरच्या तुलनेत चांगला वाव असल्याचे सिद्ध होत आहे.
पेरू देशातील छोट्या उत्पादकांच्या संघटनेला दक्षिण कोरियाची बाजारपेठ आश्वासक वाटली आहे. या देशात सेंद्रिय केळ्यांची निर्यात ते करतात. मोठ्या उत्पादकांना व्यापार किंवा निर्यातीची संधी अनेकवेळा चालून येते. त्या तुलनेत छोटे उत्पादक मागे पडतात, अशा शेतकऱ्यांना व्यापारी संधी मिळवून देण्यासाठी प्रोनॅट्यूर संस्थेतर्फे उत्तेजन दिले जाते.
फिलिपिन्स देशानेही सेंद्रिय शेतीचे महत्त्व चांगलेच ओळखले आहे. तेथील शेतकरी रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत. गेल्या पाच वर्षांच्या सेंद्रिय शेतीच्या अनुभवातून त्यांना एक गोष्ट समजली आहे, ती म्हणजे जमिनीचा पुरेपूर उपयोग झाल्याने उत्पादन व त्याची गुणवत्ताही वाढली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांना शेती पद्धतीत बदल करण्याची गरज भासलेली नाही. केवळ निविष्ठांच्या वापरात बदल करावा लागला आहे. तेथील सरकारही देशातील नागरिक आरोग्याच्या दृष्टीने अधिकाधिक सुरक्षित कसे राहतील यासाठी प्रयत्नशील आहे.
(वृत्तसंस्था)
स्त्रोत: अग्रोवन १० जाने २०११
अंतिम सुधारित : 10/7/2020
अंजीर फळांचा टिकाऊपणा जास्त वाढविण्याकडे विशेष लक्...
या विभागात अंजीर या फळ पिकाविषयी माहिती दिली आहे.
मध्यम, ओलावा टिकवून ठेवणारी; परंतु पाण्याचा निचरा ...
द्राक्षास सर्वाधिक दर मुंबई बाजारपेठेत डिसेंबरमध्य...