गेल्या काही वर्षांपासून वातावरणामध्ये सातत्याने बदल होत असून, तापमानातील बदलामुळे गहू पिकाच्या उत्पादनामध्ये घट होत आहे. या बदलाला सामोरे जाण्यासाठी करनाल (हरियाना) येथील गहू संशोधन संचालनालयामध्ये संशोधनाची दिशा ठरविण्यात आली आहे. या ठिकाणी गहू लागवड ते काढणीपर्यंत विविध टप्प्यांसाठी संशोधन करण्यात येत आहे. त्याचा लाभ गहू पिकांचे शाश्वत उत्पादन मिळविण्यासाठी होणार आहे.
साधारणपणे जगभरात 200 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर गहू पिकाची लागवड असते. त्यातून एकूण अन्न उत्पादनाच्या 21 टक्के इतका अन्नपुरवठा लोकांना होतो. अवेळी पाऊस, तापमानातील अकस्मात बदल, हंगामामध्ये बदल होत असल्याने विविध प्रकारच्या समस्या गहूसारख्या हंगामी पिकामध्ये निर्माण होत आहेत. भारतातील गंगा नदीच्या परिसरातील पठारी भाग या ठिकाणी सध्या अनुकूल, अधिक उत्पादनक्षम, ओलिताचे, कमी पर्जन्यमान असलेले वातावरण आहे. या भागातून जागतिक गहू उत्पादनाच्या 15 टक्के गहू उत्पादन होते.
जागतिक तापमानामध्ये होत असलेल्या बदलामुळे जगातील काही भागांमध्ये उत्पादन घटत आहे; तर काही भागांमध्ये हवामान गहू पिकासाठी अनुकूल होत आहे. तरीही या विभागामध्ये पुढील चार दशकांतील हवामानाचा विचार करता अधिक उष्ण, ओलिताखालील, कमी कालावधीचा रब्बी हंगाम असलेला भाग अशी विभागणी करावी लागणार आहे. त्यानुसार भारतातील संशोधन करण्याची आवश्यकता आहे. या प्रत्येक विभागानुसार, योग्य ताण सहनशील जातींची निर्मिती, लागवडीच्या योग्य पद्धती यावर सखोल अभ्यास होण्याची गरज आहे; अन्यथा हंगामामध्ये होत असलेल्या बदलामुळे गहू उत्पादनात घट होत जाऊ शकते. वाढत्या लोकसंख्येच्या अन्नविषयक गरजा पूर्ण करणे शक्य होणार नाही. सध्या समन्वित गहू व बार्ली सुधारणा कार्यक्रम राबविला जात असून, वातावरण बदलाला योग्य प्रकारे सहन करू शकतील, अशा प्रजातींची ओळख पटवली जात आहे. त्याचप्रमाणे गहू लागवड व व्यवस्थापनाच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात येत आहेत.
गहू पिकाच्या लागवड पद्धतीमध्ये बदल किंवा सुधारणा करण्यासाठी गहू संचालनालयाच्या संचालिका इंदू शर्मा आणि शास्त्रज्ञ आर. के. शर्मा, आर. एस. चोकर यांच्या नेतृत्वाखाली संशोधन केले जात आहे. सध्या खालील महत्त्वाच्या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
संपर्क - 0184-2267307
(गहू संशोधन संचालनालय, करनाल, हरियाना.)
स्त्रोत: अग्रोवन:
अंतिम सुधारित : 10/7/2020
हवामानामध्ये आपल्याला आवश्यक तसे बदल घडविणे शक्य ...
गारपीट आणि अवकाळी पावसाने नुकसान झाले असून, त्या त...
हवामानातील बदलामुळे दुष्काळ,गारपीट, थंडी या रूपांन...
हवामानाच्या परिस्थितीत सध्या सातत्याने बदल जाणवत आ...