অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हवामानबदलाचे शेतीवरील परिणाम व पर्यायी व्यवस्थापन

पृथ्वीभोवती असलेल्या हवेचे तापमान सन १९५५ सालानंतर ०.५ अंश सें. ने वाढल्याचे आय.पी.सी.सी. या आंतरराष्ट्रीय संस्थेचे शास्त्रज्ञ श्री. अलगोर व श्री. पर्चारी यांनी दाखवून दिले. सन १९९८ साल हे २oव्या शतकातील सर्वात उष्ण वर्ष असल्याचे त्यांनी दाखवून दिले. तसेच सन १९९८ सालापासून जागतिक तापमान वेगाने वाढत असल्याचे त्यांनी सिद्ध केले.

तापमान वाढीची प्रमुख कारणे

अ) श्रीं. अलगोर व श्री. पचौरी याना हुवेंतील कार्बनडाय ऑक्साइड, मेिथेन आणि नायट्रस ऑक्साइड या वायूचे (हरितगृहू वायू) वाढते प्रमाण हेच तापमान वाढीचे मुख्य कारण असल्याचे त्यांना दिसून आले.

ब) तर जगातील अमेरिकेच्या, युरोप आणि ऑस्ट्रेलियातील प्रमुख शास्त्रज्ञांचे मतानुसार एल.निनो हे दुसरे कारण असल्याचे दिसून येते. एल. निनो म्हणजे अमेरिकेच्या पूर्व किंनायालगतचे प्रशांत महासागराचे विषववृतीय भागातील समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान २ ते ५ अंश सें. ने वाढणे, त्यामुळे त्या भागात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होते आणि त्यामुळे हिंदी महासागर व बंगालच्या उपसागरावरील तयार होणारे बाष्पवारे तिकडे वाहून जाणे आणि भारतात दुष्काळ पडणे हे होय. हवेत २१ टक्के ऑक्सिजन व ७८ टक्के नायट्रोजन मिळून एकूण ९९ टक्के प्रमाण या दोनच वायूचे असून उरलेल्या १ टक्क्यात कार्बनडाय ऑक्साइड 0.o३ टक्के तसेच मिथेन व नायट्रस ऑक्साइड व इतर वायू अत्यल्प प्रमाणात आहेत

हवामानबदल

वाढती वाहनांची संख्या, वाढती कारखानदारी, वाढत्या एअर्कंडीशन इमारती या सातत्याने कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन वाढवीत आहेत. जनावरांचे रवंथ करण्यामधून मिथेन वायुचे उत्सर्जन वाढत आहे. भात खाचरात होणारा अतिरिक्त नायट्रोजन खतांचा वापर नायट्रस ऑक्साइड्चे प्रमाण वाढवत आहे. त्यामुळेच एका बाजूस वायूप्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. तर दुस-या बाजूस कार्बन डाय ऑक्साइड वापरणारी वने व वनस्पती मोठ्चा प्रमाणावर नष्ट होत आहेत.

आशिया खंडातील ६0 दशलक्ष हेक्टर जंगल, आफ्रिका खंडातील ५५ दशलक्ष हेक्टर जंगल आणि लॅटिन अमेरिकेतील ८५ दशलक्ष हेक्टर जंगल मानवाने आजपर्यंत नष्ट केली आहेत. म्हणजेंच कार्बन डाय ऑक्साइड वापरणारी यत्रणा मानवाने नष्ट केली आहे. त्यामुळे हवेत कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण वाढत आहे. सूर्यप्रकाशापासून मिळणारी ऊर्जा व उष्णता कार्बन डाय ऑक्साइड वायू धरून ठेवतो. त्यामुळे पृथ्वीच्या वातावरणाचे तापमान वाढत आहे. त्यामुळेच त्याला जागतिक तापमान वाढ असे नामकरण केले आहे. जेंव्हा हवेचे तापमान वाढते तेव्हा हवेचा दाब कमी होतो. वारा जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे वाहतो, तेंव्हा बाष्प घेऊन येतो आणि जेथे हवेचे दाब कमी


असतील तेथे झानिर्मिती होऊन पाऊस आणि अतिवृष्टी होते. तर जेथे तापमान सरासरीपेक्षा कमी राहते तेथे हवेचे दाब वाढतात आणि दुष्काळी परिस्थितों ओढ़वातें. यासच आपण हुवामान बदल असें संबोधितों. काहीं भागात अवकाळी आणि अवेळी होणारा पाऊस आणि त्यातून होणारे शेतीचे नुकसान हे नेहमीचेच झाले आहे. काही कालावधीत उदा. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिन्यात होणारी गारपीट आणि पाऊस यामुळेही नुकसान होत आहे. हवामान बदलामुळे खरिपात होणारे पावसातील मोठे खंड, खरीप पेरणीवर परिणाम करतात आणि दुबार पेरणीची वेळ येते. उन्हाळी हंगामातील गारपिटींमुळे फळबागांचे व भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान होत आहे.

ऋतुचक्रावर परिणाम

डॉ. साबळे मॉडेलनुसार मार्च, एप्रिल, व मे महिन्यात

  1. सरासरीपेक्षा कमाल तापमान कमी राहणे.
  2. सरासरीपेक्षा सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी राहणे,
  3. सरासरीपेक्षा वा-याचा वेग कमी राहणे. ही प्रमुख कारणे असल्याचे दिसून आले.

ऋतुचक्रावर परिणाम होऊन पावसाळ्यात दुष्काळ किंवा अतिवृष्टी आणि महापूर, हिंवाळ्यात ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस तर उन्हाळ्यात गारपीट यामुळे ऋतुचक्राच्या बदलास प्रभावित करणारी परिस्थिती सातत्याने निर्माण होण्यामुळे त्या त्या हंगामातील पिके आणि पीक पद्धती धोक्यात आली आहे. अज्ञसुरक्षा अडचणीत आली आहे. कांदा, डाळी आणि विशेषतः तूरडाळीचे भाव भडकत आहेत. एका बाजूस शेती आणि शेतक-यांचे नुकसान होत असताना दुस-या बाजूस ग्राहकही महागाईच्या झळ सोसत आहेत.

दुष्काळाचे क्षेत्र विस्तारतेय

जगभर पाण्याचा प्रश्न भेडसावत असून महाराष्ट्रात दुष्काळाचे क्षेत्र विस्तारत आहे. या प्रश्नांचा ढोबळमानाने अभ्यास पुढील प्रमाणे आहे.

सन १९७२ साली भारतात व महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला, त्यावेळी महाराष्ट्रात १२ जिल्ह्यातील ८४ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाले. सन १९८६ मध्ये महाराष्ट्रात १४ जिल्हे दुष्काळी आणि ११४ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले. सन २००३ मध्ये १४ जिल्हे दुष्काळी तर ११८ तालुके दुष्काळग्रस्त होते. सन २०१२ मध्ये १८ जिल्हे दुष्काळी तर १२३ तालुके दुष्काळग्रस्त होते. तर २०१५ मध्ये २८ जिल्हे दुष्काळी आणि १३६ तालुके दुष्काळग्रस्त ठरले. एकूणच दुष्काळाची व्याप्ती एका बाजूस विस्तारत असून दुष्काळी विभाग मराठवाड्याच्या दिशेने विस्तारत असल्याचे स्पष्ट चित्र आहे.

गारपिटग्रस्त क्षेत्र विस्तारतेय

गारपीट ही उन्हाळी हंगामातील हवामान बदलाचीच नांदी असून मराठवाडा आणि विदर्भात सन २०१४ च्या फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यात प्रचंड गारपिटीने नुकसान झाले. जनावरांचीही हानी झाली. सन २०१५ च्या मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात गारपीट झाली. यातून गारपिटग्रस्त क्षेत्राचा गारपिटीचा कालावधीही वाढतोय आणि गारपिटग्रस्त क्षेत्रही वाढत आहे असे दिसून येते. याचे गंभीर परिणाम शेती क्षेत्रावर होत आहेत.

शेती क्षेत्रातील प्रमुख नुकसानीच्या बाबी

  1. पिकांच्या उत्पादकतेत घट होत असून शेती अशाश्वत झाली आहे.
  2. जनावरांसाठी चान्याचा प्रश्न निर्माण होत आहे. परिणामतः दुग्धव्यवसाय अडचणीत आहे.
  3. पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. शेतीस अपुरा पाणीपुरवठा उपलब्ध होत आहे. त्यातून उत्पादकता घटत आहे.
  4. गारपिट आणि अवेळी पावसामुळे उभ्यापिकांचे नुकसान होत आहे.
  5. खरिपात दुबार पेरणीची वेळ येत असून मोसमी पावसातील अनिश्चीततेमुळे व पुरेशा ओलाव्याअभावी रब्बीचे क्षेत्रही कमी होत आहे.

हवामान बदलाचे भविष्यातील परिणाम

सर्वात मोठा हवामान बदलाचा परिणाम शेतीक्षेत्रावर होत असून त्यात सातत्याने या पुढे वाढ होत असल्याचे संकेत मिळत आहेत. या पुढे हे परिणाम गंभीर समस्या निर्माण करतील. त्यातून शेतीक्षेत्र पुरते अडचणीत येऊन शेतकरीवर्गाची आर्थिक स्थिती बिघडेल. विशेषतः कोरडवाहू भागात हे परिणाम आणखी भिषण रूप धारण करतील. त्यातून अत्रसुरक्षा धोक्यात येईल आणि अन्नधान्य दुस-या देशातून आयातीसाठी हात पसरणे भाग पडेल. तेव्हा अन्नधान्यात स्वयंपूर्ण झालेल्या देशास दुस-या देशावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ शकते. त्यासाठी हवामान बदलाच्या अनुषंगाने शेती मधुन शाश्वत उत्पन्नासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. हवामान बदलाच्या काळात शेती उत्पादन शाश्वत करण्यासाठी उपाय

पर्यायी शेती व्यवस्थापन

  1. पीक पद्धतीत बदल : कापूस पिकाचे क्षेत्र कमी करून तिथे तूर, सोयाबीन, मका, घेवडा, मिरची या पिकांचा पीक पद्धतीत समावेश करावा. महाराष्ट्र राज्यात कापूस पिकाखालील क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. त्यास कारणही तसेच आहे. बी.टी. कपाशीचे बियाणे निर्मित करून शेतक-यांना उत्पादन वाढेल अशी माहिती दिल्याने क्षेत्रात वाढ होत आहे. प्रत्यक्षात कापूस पिकाचा कालावधी ७ ते ७.५ महिन्याचा तर मान्सूनचा कालावधी ४ महिन्यांचा असल्याने पाऊसमान आणि कपाशीचा कालावधी जुळत नसल्याने कपाशीच्या क्षेत्रात होणारी वाढही गंभीर समस्या निर्माण करीत आहे. कपाशीचे ९४ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. कपाशीच्या वाढीच्या काळात गरजेनुसार पाणीपुरवठा न झाल्याने कपाशीची महाराष्ट्रातील सरासरी उत्पादकता केवळ २.९३ किंटल प्रती हेक्टर आहे. त्यामुळे उत्पादनाचा खर्च अधिक आणि उत्पादकता अतिशय कमी असल्यामुळे खर्चापेक्षा उत्पन्न कमी झाल्याने कपाशी लागवड करणारे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहेत तसेच ते कर्जबाजारी होत आहेत. तेव्हा कपाशीखालील ४0 लाख हेक्टर क्षेत्रांपैकी २0 ते ३o लाख हेक्टर क्षेत्र कमी करून तेथे तूर, सोयाबीन, मका, घेवडा, मिरची या पिकांची लागवड करुन शाश्वत शेती उत्पादन साधण्याची गरज आहे. जेथे अत्यंत भारी काळ्या जमिनी आहेत तेथे व बागायत क्षेत्रात कपाशी लागवड करणे हिताचे आहे. त्यासाठी शेतकरीवर्गास सातत्याने प्रशिक्षित करणे गरजे आहे. तसेच तूर, घेवडा, मका, मिरची, सोयाबीन या पिकांचे उन्नत वाण उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
  2. रुंद-वरंबा व सरी पद्धत वापरणे : मुलस्थानी जलसंधारणाचे उपाय म्हणून रुंद-वरंबा व सरी पद्धतीचा वापर वाढवणे गरजेचे असून सोयाबीन व घेवडा या दोन्ही पिकांची पेरणी रुंद-वरंब्यावर करण्यासाठी शेतक-यांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. त्यामुळे हेक्टरी उत्पादकता वाढू शकेल.
  3. रब्बी ज्वारीसाठी बंदिस्त वाफे : पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी मोठ्या आकाराचे वाफे तयार करावेत. जमिनीच्या उतारानुसार वाफ्याचा आकार ठेवावा. वाफे तयार करताना सारा यंत्राने सारे करून त्यामध्ये नांगराने योग्य अंतरावर दंड व पाट टाकल्यास कमी खर्चात बंदिस्त वाफे तयार करता येतात व पावसाचे पाणी वाफ्यात मुरते. योग्य ओलीवर पेरणी केल्यास पुन्हा होणा-या पावसाचे पाणी वाफ्यात मुरते आणि ज्वारीचे वाढीसाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे हेक्टरी ३० टक्के उत्पादन वाढते. ही मुलस्थानी जलसंधारणाची पद्धत रब्बी ज्वारीसाठी वापरणे आवश्यक आहे.
  4. बागायत क्षेत्रात गव्हाचे पिकाचे क्षेत्र कमी करून बागायत रब्बी ज्वारीची पेरणी करून पीक पद्धतीत बदल करावा : हवामान बदलाने जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यातच थंडीचा चांगला कालावधी मिळत आहे. नोव्हेंबर महिन्यात गव्हाची पेरणी केल्यास आणि नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात थंडी न मिळाल्यास गव्हाचे पीक, त्याच्या अवस्था लवकर गव्हाची उत्पादकता कमी होते. शिवाय गव्हाचे पीक गारपिटीत सापडते. त्याऐवजी ऑक्टोबर महिन्यातच बागायत रब्बी ज्वारीची पेरणी केल्यास फेब्रुवारी अखेरपर्यंत रब्बी ज्वारीचे पीक निघते. गारपिटीत सापडत नाही. शिवाय कडबा जनावरांना उपयुक्त ठरतो. जनावरांचा चान्याचा प्रश्न मिटतो . घरच्या माणसांसाठी उत्तम धान्यउत्पादन होते. त्याशिवाय रब्बी ज्वारीचे भाव वाढलेले असल्याने आर्थिक फायदा अधिक होतो.
  5. रब्बी हंगामात हरभरा पिकाखाली क्षेत्रात वाढ करणे : हरभरा हे कमी पावसावर व कमी पाण्यावर येणारे पीक आहे. जेथे २ पाणी उपलब्ध असतील तेथे बागायत हरभन्याची लागवड करावी. तर कोरडवाहू
  6. हरभ-याची लागवड ऑक्टोबर महिन्यात करून सारे पाडावेत. त्या सा-यांमध्ये पावसाचे पाणी मुरेल आणि हरभन्याची उत्पादकता वाढेल.
  7. सुक्ष्म सिंचन पध्दतीचा अवलंब : पाण्यात बचत करण्यासाठी ठिबक सिंचन वापरल्यास ५० टक्के पाणी वापरात बचत होऊ शकते. त्यामुळे सध्याच्या बागायत क्षेत्रात दुप्पटीने वाढ करणे शक्य आहे. त्यासाठी बंद पाइपने पाणीपुरवठा योजना राबविणे गरजेचे आहे. ठिबक सिंचन पद्धतीने कमी पाण्यात द्रवरूप खते दिल्याने अधिक व चांगल्या प्रतीचे सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास कमी पाण्यात अधिक उत्पादन काढणे शक्य होईल व ५० टक्के पाणी बचत करणे शक्य होईल.
  8. संरक्षित शेतीचा अवलंब करणे : पॉलिहाऊस मध्ये ढोबळी मिरची, जरबेरा, कानेंशन, गुलाब, टोमॅटो इत्यादी पिकांच्या लागवडीवर भर द्यावा. प्रत्येक शेतक-याने कमीतकमी १० गुंठे क्षेत्रावर पॉलिहाऊची उभारणी करून ठिबकद्वारे पाणीपुरवठा व द्रवरूप खते देऊन उत्तम प्रतीचा शेतीमाल तयार करून उत्पादन व उत्पादकता वाढवावी.
  9. अांतरपीक पद्धतीचा अवलंब करणे : एकपिक पद्धतीपेक्षा आंतरपीक पद्धती निश्चितपणे फायद्याची आहे. मुख्य पिकाशिवाय आंतरपिकाचे उत्पादन बोनस मिळते. कोरडवाहू क्षेत्रात बाजरी + तूर (२:१), सोयाबीन + तुर, कपाशी + मूग किंवा उडीद अशी आंतरपिके घेणे फायद्याचे ठरते. तसेच बागायती क्षेत्रात ऊस + बटाटा किंवा भुईमूग, ऊस + हरभरा, ऊस + कांदा, ऊस + फुलकोबी किंवा कोबी, अशा प्रकारे अनेक आंतरपिके जिरायत आणि बागायत क्षेत्रात घेणे शक्य आहे.
  10. आच्छादनांचा वापर करणे : कोरडवाहू क्षेत्रात ५ टन आच्छादनांचा वापर करून बाष्पीयभवनाचा वेग रोखता येणे शक्य आहे. तसेच उन्हाळी हंगामात फळबागांमध्ये आच्छादन गरजेचे आहे.
  11. प्रकाश परिवर्तकांचा वापर करणे : केओलीनची ८ टक्के फवारणी करून प्रकाश परिवर्तन करून बाष्पीभवनाचा वेग कमी करता येतो. फळपिकांसाठी पाणीटंचाईच्या काळात ही पद्धत वापरावी.
  12. जलयुक्त शिवार अभियान महाराष्ट्राला वरदान ठरेल : महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार अभियानाद्वारे दरवर्षी ५ooo गावात साखळी बंधारे व तळी तयार करून पाणी समस्या सोडवण्याचे अभियान सुरू केले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात जलसंधारण व पाणीसाठी होऊन भूगर्भातील पाणीपातळी वाढून कोरडवाहू भागातील पिण्याच्या पाण्याचे आणि जनावरांच्या चान्याचे प्रश्न मिटतील. हे अभियान चळवळ म्हणून सुरू बंधारे बांधून पाणी आडवणे या काळात गरजेचे आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटून शेतीसाठीही पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे या कामात लोकसहभाग आहे.
  13. कोरडवाहू भागातील तळ्यामधील पाण्याचे बाष्पीभवन रोखणे : पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी वेगवेगळी द्रव्ये उपलब्ध असून त्यावर प्रयोग घेऊन तशा शिफारशी करणे गरजेचे आहे.
  14. पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथ्यावरील पावसाचे पाणी तेथेच साठवणे आणि गरजेनुसार नदीपात्रात सोडणे :

पश्चिम महाराष्ट्राच्या घाट माथ्यावर ४000 ते ६000 मिलिमीटर पाऊस होतो. सध्या डोंगर माथ्यावर पवनचक्क्या बसवून विंडमिलद्वारे वीजनिर्मिती केली जात आहे. तळी तयार केल्यास आणि गरजेनुसार ते पाणी नदीपात्रात सोडल्यास पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल.


स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate