शेतीमालाची निर्यात एका देशातून दुसऱ्या देशात करताना शेतीमालाद्वारे किडी व रोगांचा प्रसार होऊ नये म्हणून सन 1951 मध्ये "आ ंतरराष्ट्रीय पीक संरक्षण करार' करण्यात आलेला आहे. या करारानुसार सर्व सदस्य देशांना शेतीमालाची आयात आणि निर्यात करताना फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र देणे बं धनकारक करण्यात आलेले आहे. सदरचे प्रमाणपत्र असल्याशिवाय शेतीमालाची आयात किंवा निर्यात करता येत नाही. जागतिक व्यापार संघटनेद्वारे कृषिविषयक वि विध करार करण्यात आलेले आहेत, यामध्ये सॅनिटरी आणि फायटोसॅनिटरी करार महत्त्वाचा आहे.
पीक उत्पादनाच्यादृष्टीने असंतुलित रासायनिक खतांचा वापर आणि रासायनिक कीडनाशकांच्या अतिवापरामुळे पिकांमध्ये रसायनांचा उर्वरित अंश सापडत आहे. रसायनांचा उर्वरित अंश आणि हेवी मेटलचा मानवाच्या आरोग्यावर होणारा अनिष्ट परिणाम लक्षात घेऊन सेंद्रिय प्रमाणीकरणास महत्त्व प्राप्त झालेले आहे. सेंद्रिय प्रमाणीकरणाचे काम हे "अपेडा'च्या मार्गदर्शक सूचनांनुसार व त्यांच्यामार्फत अधिसूचित एजन्सीद्वारे करण्यात येते.
युरोपियन संघांमधील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन तेथील ग्राहकांना शेतीमालाच्या गुणवत्ता व सुरक्षिततेबाबत हमी देण्याबाबत "युरेपगॅप' प्रमाणीकरणाची पद्धत विकसित केलेली आहे. आता त्यांनी युरेपगॅपचे रूपा ंतर ग्लोबल गॅप प्रमाणीकरणामध्ये केले आहे. यामध्ये फळे व भाजीपाल्याचे प्र माणीकरण केले जाते. विशेषतः युरोपियन देशांतील शेतीमाल आयातदारांकडून ग् लोबलगॅप प्रमाणीकरणाची मागणी केली जाते.
नियंत्रित शेतीद्वारे फुलांचे उत्पादन करताना पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करणे, फुलशेती उद्योगामध्ये सुधारणा करणे, पर्यावरण, सामाजिक सुरक्षितता, गुणवत्ता, विपणन इ.करिता फुलांचे उत्पादन व विक्रीकरिता "एमपीएस फ्लोरी मार्क'ला निर्यातीमध्ये महत्त्व आहे.
भाजीपाला पिकांची प्रतवारी आणि विपणन नियम 2004 नुसार डायरेक्टोरेट मार्केटिंग ऍण्ड इन्स्पेक्शन, कृषी मंत्रालय, भारत सरकारद्वारे ऍगमार्क प्रमाणीकरण केले जाते. सध्या युरोपियन देशांना द्राक्ष निर्यातीकरिता ऍगमार्क प्रमाणीकरण बंधनकारक आहे.
पिकांवरील किडी आणि रोग, तसेच तण निय ंत्रणाकरिता वापरण्यात येणाऱ्या कीडनाशकांच्या अति वापरामुळे, शेतीमालामधील उर्वरित अंशामुळे मानवाच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत असल्याचे आढळून येत आहे. शेतीमालाची निर्यात युरोपियन देशांना करण्यापूर्वी उर्वरित अंश तपासणी करून घेणे आवश्यक झालेले आहे. युरोपियन देशांना द्राक्ष निर्यातीकरिता कीडनाशक उर्वरित अंशाची हमी देण्यासाठी "रेसिड्यू मॉनिटरिंग प्लॅन'ची "अपेडा'च्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइनद्वारे अंमलबजावणी करण्यात येत आहे. यासाठी राज्य शासनाच्या पुणे येथील प्रयोगशाळेत उर्वरित अंश तपासणीच्या सुविधा निर्माण केल्या आहेत.
ज्या ठिकाणी शेतीमालाचे ग्रेडिंग, पॅकिंग, प्री-कुलिंग केले जाते, ती जागा स्वच्छ आणि सुरक्षित असणे आवश्यक आहे, त्याकरिता "अपेडा'द्वारे पॅकिंग हाऊस ऍक्रिडेशन करून घेणे आवश्यक आहे. सध्या युरोपीय देशांना द्राक्ष निर्यात करताना "अपेडा ऍक्रिडेशन पॅक हाऊस'मधून पॅकिंग, ग्रेडिंग केल्यास द्राक्षास निर्यातीसाठी परवानगी दिली जाते.
अन्नप्रक्रिया करताना अनेक वेळा निष्काळजीपणामुळे दर वर्षी अन्नाद्वारे विषबाधेची प्रकरणे आढळून येत आहेत, ग्राहकाच्या आरोग्याच्या सुर क्षिततेच्या दृष्टिकोनातून स्वच्छ व सुरक्षित कृषिप्रक्रिया माल उत्पादन व विक्रीकरिता हॅसेप प्रमाणीकरण आवश्यक आहे.
संपर्क : गोविंद हांडे, कीड - रोगमुक्त प्रमाणीकरण अधिकारी, कृषी प्रक्रिया व व्यापारक्षम शेती विभाग, कृषी विभाग, पुणे
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
सेंद्रिय व हिरवळीच्या खतांच्या कमी वापरामुळे जमिनी...
जमिनीच्या पृष्टभागावर पिकांच्या बुंध्याभोवती सेंद्...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
उगम ग्रामीण विकास संस्थेमार्फत हिंगोली शहरात जिल्ह...