অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कृषी विभाग- विस्तार (Extension) - मार्गदर्शिका २०१४-१५

कृषी विभाग- विस्तार (Extension) - मार्गदर्शिका २०१४-१५

  1. गतिमान वैरण विकास कार्यक्रम
  2. पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प
  3. गाजरगवत निर्मुलन मोहीम
  4. शेतकऱ्यांना शेतीसाठी अर्थसहाय्य देण्याची योजना वी.घ.यो
  5. आदिवासी उपाययोजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) अंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना शेतीसाठी अर्थसहाय्य देण्याची योजना
  6. व्यापारी पिके अंतर्गत सघन कापूस विकास कार्यक्रम
  7. भरडधान्य उत्पादन कार्यक्रम
  8. कडधान्य अभियान
  9. ऊस विकास कार्यक्रम
  10. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान - भात
  11. कृषी आणि सहकार विभाग
  12. तेल बी आणि तेल पाम उपक्रम
  13. ओनलाइन पी डी एम आय एस संगणक प्रणालीमध्ये कीड रोग
  14. गळीत धान्य व तेलताड अभियान- सुधारित भौतिक व आर्थिक कार्यक्रम
  15. भात उत्पादन कार्यक्रम
  16. राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत सघन कापूस विकास कार्यक्रम
  17. राष्ट्रीय कृषी योजने अंतर्गत उस विकास कार्यक्रम २०१४-१५ मार्गदर्शक सूचना
  18. विनाअनुदानित बीज प्रक्रिया मोहीम
  19. भरडधान्य पिके सन २०१४-१५ क्षेत्र,उत्पादन व उत्पादकतेचे लक्षांक
  20. प्रवर्तकाचे दीर्घ मुदतीचे (टी.ओ.एफ)प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याबाबत-तांत्रिक मार्गदर्शक सूचना

संचालक विस्तार (extension), कृषी विभाग, महाराष्ट्र शासन मार्गदर्शिका २०१४-१५

गतिमान वैरण विकास कार्यक्रम

चारा पिकाची उपलब्धता वाढवून गरज व उपलब्धता यातील तफावत कमी करणे, दुध देणाऱ्या जनावरांना चालू वर्षीचा संभाव्य दुष्काळ सदृश परिस्थिती लक्षात घेऊन ओला व सुका चारा उपलद्धतेच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी सदर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत गतिमान वैरण विकास कार्यक्रम २०१४-१५

पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प

शेतातील महत्वाच्या पिकांवर वारंवार, आकस्मिकरीत्या उद्भवणाऱ्या कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे होणारे नुकसान, उत्पादनात होणारी घट लक्षात घेऊन क्रॉप सआप चा हा अभिनव प्रकल्प हाती गेण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प

गाजरगवत निर्मुलन मोहीम

गाजरगवत या अनावश्यक तणामुळे शेती व्यवस्थापन व आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे गाजर गवताचे निर्मुलनासाठी व्यापक प्रमाणावर विनाअनुदनित स्वरुपात हि मोहीम हाती घेण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

विनाअनुदानित तत्वावरील गाजरगवत निर्मलम मोहीम -तांत्रिक मार्गदर्शक सूचना

शेतकऱ्यांना शेतीसाठी अर्थसहाय्य देण्याची योजना वी.घ.यो

यामध्ये अनुसूचित जाती उपाययोजना अंतर्गत अनुसूचित जाती/नवबौद्ध शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवून त्यांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्यास मदत करणे. शेतकऱ्यांना शेतीसाठी अर्थसहाय्य देण्याची योजना पूर्व तयारीचे दृष्टीने मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. अधिकमाहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

सन २०१-१५ मध्ये अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत अनुसूचित जाती/ नवबौद्ध शेतकऱ्यांना शेतीसाठी अर्थसहाय्य देण्याची योजना (वी.घ.यो)पूर्व तयारीचे दृष्टीने मार्गदर्शक सूचना

आदिवासी उपाययोजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) अंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना शेतीसाठी अर्थसहाय्य देण्याची योजना

यामध्ये लाभार्थी निवडीचे निकष, प्राधान्यक्रम, अनुदानाचे स्वरूप आणि पद्धतीनची माहिती येथे देण्यात आलेली आहे.
अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

सन २०१४-१५मध्ये आदिवासी उपाययोजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) अंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना शेतीसाठी अर्थ सहाय्य देण्याची योजना पूर्व तयारीचे दृष्टीने अंतरिम मार्गदर्शक सुचनाबाब

व्यापारी पिके अंतर्गत सघन कापूस विकास कार्यक्रम

या कार्यक्रमा अंतर्गत आद्य रेषीय प्रात्याक्षिके (देशी आणि अति लांब धाग्याच्या कापसाचे बिजोत्पादन, कापूस पिकात आंतरपिके- तूर, मुग, उडीद ई.) आणि देशी वाणाच्या कापसाची अतिघन लागवड पद्धत हे घटक राबविण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान -व्यापारी पिके अंतर्गत सघन कापूस विकास कार्यक्रम सन २०१४-१५ मध्ये राबविणेबाबतच्या मार्गदर्शक सूचनाबाबत

भरडधान्य उत्पादन कार्यक्रम

भरड धान्याचे उत्पादन व उत्पादकता वाढविणे, वीण वाणांच्या वापरावर भर देऊन बियाणे/ वाण बदलाच्या दारात वृद्धी करणे व शेतकर्यामध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्यांचा आर्थिक स्तर उंचावणे असा या अभियानाचा उद्देश आहे. अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत भरडधान्य उत्पादन कार्यक्रम अंतरिम मार्गदर्शक सूचना

कडधान्य अभियान

क्षेत्र विस्तार आणि सुधारित तंत्रज्ञानाद्वारे कडधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य सन २०१४-१५मार्गदर्शक सूचना (अंतरिम)

ऊस विकास कार्यक्रम

उस उत्पादकता वाढीतील उणीवा दूर करून विस्तार कार्यक्रमाच्या माध्यमातून दूर करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाय योजनांची माहिती येथे देण्यात आलेली आहे. याबाबतच्या सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक वर क्लीक करा.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजने अंतर्गत ऊस विकास कार्यक्रम मार्गदर्शक सूचना २०१४-१५

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान - भात

या अभियानाद्वारे क्षेत्र विस्तार व सुधारित तंत्रज्ञानाद्वारे देशपातळीवरील अन्न धान्याचे उत्पादन वाढविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. याबाबतच्या सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक वर क्लीक करा.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान भात सन २०१४-१५ अंतरिम मार्गदर्शक सूचना

कृषी आणि सहकार विभाग

या बिभागासंदर्भात अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लीक करा.

कृषी आणि सहकार विभाग कृषीमंत्रालय भारतसरकार

तेल बी आणि तेल पाम उपक्रम

या उपक्रमा अंतर्गत शेतकऱ्यांना स्वत:कडील/घरगुती तेलबियांचा उत्पादनात वाढ करून घरगुती वापर व प्रक्रिया उदद्योगांना चालना मिळणेसाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे. याबाबतच्या सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक वर क्लीक करा.

तेल बी आणि तेल पामचे राष्ट्रीय उपक्रम

ओनलाइन पी डी एम आय एस संगणक प्रणालीमध्ये कीड रोग

संगणक प्रणालीमध्ये पेस्ट डीसीस मोनीटरिंग इन्फोर्मेशन सिस्टीम द्वारे भरण्यात येत आहे. याबाबतच्या सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक वर क्लीक करा.

सन २०१४-१५ मध्ये ओनलाइन पी डी एम आय एस संगणक प्रणालीमध्ये कीड रोग अहवाल भरणेबाबत

गळीत धान्य व तेलताड अभियान- सुधारित भौतिक व आर्थिक कार्यक्रम

सुधारित भौतिक व आर्थिक लक्षांकाप्रमाणे प्रमाणित बियाणे उत्पादन (ग्रामबीजोत्पादन) या अभियानाच्या सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक वर क्लीक करा.

राष्ट्रीय गळीत धान्य व तेलताड अभियानसन २०१४-१५ अंतर्गत जिल्हानिहाय /बाबनिहाय सुधारित भौतिक व आर्थिक कार्यक्रमाबाबत

भात उत्पादन कार्यक्रम

या योजनेनुसार मंजूर लक्षांकास अनुसरून आयुक्तालय स्तत्रावरील बाबानिहाय लक्षांकानुसार दिलेल्या योजनेची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. याबाबतच्या सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक वर क्लीक करा.

राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत -भात उत्पादन कार्यक्रम

राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत सघन कापूस विकास कार्यक्रम

या कार्यक्रमा अंतर्गत आद्य रेषीय प्रात्याक्षिके (देशी आणि अति लांब धाग्याच्या कापसाचे बिजोत्पादन, कापूस पिकात आंतरपिके- तूर, मुग, उडीद ई.) आणि देशी वाणाच्या कापसाची अतिघन लागवड पद्धत हे घटक राबविण्यात येणार आहेत. याबाबतच्या सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक वर क्लीक करा

राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत सघन कापूस विकास कार्यक्रम सन २०१४-१५ मध्ये राबविण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचनाबाबत

राष्ट्रीय कृषी योजने अंतर्गत उस विकास कार्यक्रम २०१४-१५ मार्गदर्शक सूचना

उस उत्पादकता वाढीतील उणीवा दूर करून विस्तार कार्यक्रमाच्या माध्यमातून दूर करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाय योजनांची माहिती येथे देण्यात आलेली आहे. याबाबतच्या सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक वर क्लीक करा.

राष्ट्रीय कृषी योजने अंतर्गत उस विकास कार्यक्रम २०१४-१५ मार्गदर्शक सूचना

विनाअनुदानित बीज प्रक्रिया मोहीम

बीज प्रक्रिया मोहीमे अंतर्गत शेतकऱ्यांना स्वत:कडील/घरगुती वापरण्यात येणाऱ्या बियाण्यास बीज प्रक्रियाकरूनच पेरणी

करण्यात यावी हे मुख्य उद्दिष्ट आहे. याबाबतच्या सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक वर क्लीक करा.

विनाअनुदानित बीज प्रक्रिया मोहीम सन २०१४-१५ च्या मार्गदर्शक सूचना

भरडधान्य पिके सन २०१४-१५ क्षेत्र,उत्पादन व उत्पादकतेचे लक्षांक

सन २०१४-१५ या वर्षात भरडधान्य पिके, क्षेत्र, उत्पादन व उत्पादकतेचे ठरविलेल्या लक्षांकाची माहिती येथे देण्यात आलेली आहे. याबाबतच्या सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक वर क्लीक करा.

भरडधान्य पिके सन २०१४-१५ क्षेत्र,उत्पादन व उत्पादकतेचे लक्षांक

प्रवर्तकाचे दीर्घ मुदतीचे (टी.ओ.एफ)प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याबाबत-तांत्रिक मार्गदर्शक सूचना

बीज प्रक्रिया मोहीमे अंतर्गत शेतकऱ्यांना स्वत:कडील/घरगुती वापरण्यात येणाऱ्या बियाण्यास बीज प्रक्रियाकरूनच पेरणी करण्यात यावी हे मुख्य उद्दिष्ट आहे. याबाबतच्या सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक वर क्लीक करा.

प्रवर्तकाचे दीर्घ मुदतीचे (टी.ओ.एफ)प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याबाबत-तांत्रिक मार्गदर्शक सूचना

    --------------------------------------------------------------------------------------------------------

    संदर्भ : कृषी विभाग, महाराष्ट्र शासन



अंतिम सुधारित : 6/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate