गावातील एकूण लागवडीलायक क्षेत्रातून प्रत्येक 10 हेक्टरला एक या प्रमाणात माती नमुन्याची तपासणी केली जाते. या नमुन्यांच्या तपासणी अहवालांवरून पार्कर गुणक या सुत्राचा वापर करून सुपिकता निर्देशांक तयार करण्यात येतो. या निर्देशांकाचे फायदे खालील प्रमाणे आहे-
1.ज्या शेतक-यांनी मातीचा नमुना काढला नाही त्या शेतक-यास गावाचा सुपिकता निर्देशांकावरून ढोबळमानाने खताची मात्रा ठरविण्यास मदत होते.
2.सुपिकता निर्देशांक फलकाद्वारे गावातील जमिनीत उपलब्ध असलेल्या प्रमुख अन्नद्रव्यांचे (नत्र,स्फुरद आणि पालाश) त्याचप्रमाणे सुक्ष्म अन्नद्रव्यांचे सरासरी प्रमाण कळते.
3.गावातील जमिनीत उपलब्ध असलेल्या प्रमुख अन्नद्रव्यांचे प्रमाण व कृषि विद्यापीठाची शिफारस यावरून गावातील प्रमुख पिकांना द्यावयाच्या खताच्या मात्रा कळतात.
4.गावातील जमिनीत सुक्ष्म अन्नद्रव्यांची (जस्त,लोह,मंगल,तांबे) कमतरता समजते.
5.कमतरता असलेल्या जमिनीत, ज्या सुक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आढळलेली आहे, त्या सुक्ष्म मुलद्रव्ययुक्त खताचा वापर करण्याची शिफारस करणे शक्य होते.
6.खतमात्रांनुसार पिकांना आवश्यक असणा-या अन्नद्रव्यांचे प्रमाण निश्चित करता येते. आपल्या क्षेत्रासाठी किती खत आणणे आवश्यक आहे,त्याचे नियोजन करता येते.
7.बाजारामध्ये अनेक प्रकारची खते उपलब्ध आहेत. त्यांच्या किंमती व त्यामधील अन्नद्रव्यांचे प्रमाण वेगवेगळे आहे. यामुळे खतांचा अवाजवी वापर टाळून जमिनीचे आरोग्य राखण्यास मदत होते.
8.अनावश्यक खतांवरील खर्चात बचत झाल्याने उत्पादन खर्च कमी होतो.
स्रोत-
माहितीपत्रक प्रवरा अग्रो बायोटेक,गाव. चिखली ता. संगमनेर जि. अहमदनगर
फोन. 02425-260400,260401
माहितीदाता- हिमांशु खोले
अंतिम सुधारित : 7/22/2020
फक्त रासायनिक खते वापरल्यास जमिनीचे आरोग्य चांगले ...
आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा विविध स्रोत वापरून क...
विदर्भ, शेतक-यांच्या आत्महत्यांचा प्रदेश, पण त्याच...
जमिनीतील मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे ...