अवर्षणग्रस्त परिस्थिती,शेतकऱ्यांची आर्थिक हलाखी,अश्या वेळीस मदतीस धावून आली ती सूक्ष्म सिंचन प्रणाली. ह्याच प्रणालीतील एक घटक म्हणजे तुषार सिंचन. पिकांना फवाऱ्यासारखे पाणी या पद्धतीद्वारे देता येते. ह्या प्रणालीतील अतिआधुनिक प्रकार म्हणजे पिकांना पावसासारखे फवारून पाणी देण्यासाठी विकसित केलेली तुषार सिंचन पद्धती- रेनगन.
या वर्षीच्या कमी पावसामुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता अनेक ठिकाणी कमी आहे. तेव्हा कमी पाण्यामध्ये पिकांचे व्यवस्थापन खालील प्रकारे केल्यास उत्पादनातील घट टाळता येते.
पाण्याचा ताण पडत असल्यास उभ्या ऊस पिकातील खालची पक्व झालेली तसेच वाळलेली पाने काढून ती आच्छादन म्हणून सरीत पसरावीत.
ठिबक सिंचनाची मुख्यतः ऑनलाईन पद्धत, इनलाईन पद्धत, मायक्रो स्प्रिंकलर्स आणि मायक्रो जेट्स असे प्रकार पडतात.
ठिबक सिंचन पद्धतीत, झाडांना पाणी देताना मुख्य लाइनमधून, उप लाइन किंवा पार्श्व लाइनच्या तंत्राने त्याच्या लांबीनुसार उत्सर्जन बिन्दुंचा उपयोग करुन पाणी वितरित करतात.
ठिबक सिंचनातून खते दिल्याने उसाच्या मुळांजवळ मूलद्रव्यांची उपलब्धता वाढते. खतांचा पीक वाढीसाठी अधिक कार्यक्षमतेने वापर होतो.
जास्त चिकनमाती असलेल्या जमिनी, उताराच्या अभाव आणि अवर्षण इत्यादीमुळे हळूहळू क्षारांचे प्रमाण वाढत जाऊन जमिनी क्षारयुक्त होतात.
तुषार सिंचन संचाची काळजी / देखभाल करण्यासंबंद्धीची माहिती मिळेल.
पिकांची जास्तीत जास्त उत्पादकता, पाण्याची आवश्यक मात्रा आवश्यक त्या वेळी दिल्यानेच मिळते. सध्याच्या काळात उपलब्ध पाण्याच्या योग्य वापरासाठी तुषार, ठिबक सिंचनाने पिकांना पाणी द्यावे.
अॅल्युमिनीअम अगर पीव्हीसी पाईपला जोडलेल्या स्प्रिंकलर नोझलद्वारे पाण्याच्या दाबाचा वापर करून पाणी पावसाप्रमाणे पिकावर सर्व ठिकाणी सारखे फवारले जाते.
पाइप्स जेथे जोडले जातात, त्या ठिकाणच्या रबरी सीलिंग रिंग खराब झालेल्या नाहीत किंवा त्या ठिकाणी गळती होत नाही याची पाहणी करावी.
फळबागांसाठी ऑनलाइन आणि इनलाइन ठिबक पद्धतीचा वापर योग्य पद्धतीने करावा.
फळबागेसाठी ठिबक सिंचन करताना नियोजन करण्यासंबंद्धीची माहिती देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्राच्या एकूण ३०७.६ लाख हेक्टर भूप्रदेशापैकी सुमारे २२५.७ लाख हेक्टर क्षेत्र एकूण पिकाखालील आहे.
पाण्याच्या बेहिशेबी, अवाजवी आणि अनुत्पादक वापराने शेतीपुढे पाण्याचे संकट उभे राहिले. पाण्यामुळे संकटात सापडलेल्या शेतीला आणि मानव जातीला वाचवले ते पाण्याच्या एका थेंबाने!
जनावरांच्या शेण आणि अन्य खताचे शेतीमध्ये मोठे महत्त्व आहे. शेतीला सेंद्रिय पदार्थ यातूनच उपलब्ध होत असतात. उसासारख्या नगदी पिकाच्या बाबतीत ही बाब तेवढीच महत्त्वाची आहे.