सिंचनाच्या पाण्याचे परीक्षण समस्येचे योग्य निदान करणे महत्त्वाचे आहे. पाण्याची गुणवत्ता सिंचनासाठी योग्य नसल्यास शास्त्रीय उपाययोजनांचा अवलंब करावा. सिंचनाच्या पाण्याच्या योग्य व्यवस्थापनामुळे जमिनीचे आरोग्य टिकवता येते. पाण्याचा कार्यक्षम वापर करून उत्पादनात वाढ मिळेल.
1) क्षारयुक्त पाण्याचा सिंचनासाठी वापर केल्यास पाण्यातील विद्राव्य क्षार जमिनीत शोषले जाऊन त्यांचे प्रमाण वाढत जाते. जास्त चिकणमाती असलेल्या जमिनी, उताराच्या अभाव आणि अवर्षण इत्यादीमुळे हळूहळू क्षारांचे प्रमाण वाढत जाऊन जमिनी क्षारयुक्त होतात. अशा क्षारयुक्त जमिनीत पाणी आणि अन्नद्रव्ये यांचे पिकाकडून शोषण होत नाही.
2) क्षारांचा मुळांवर विषारी परिणाम होतो. पिकांची वाढ खुंटते, बियाण्याची उगवण कमी होते, मुळांची टोके मरतात आणि त्याचा आतील परिणाम पिकांवर दिसून येतो. अशा जमिनीत अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी होऊन सुपीकता घटते.
3) उष्ण हवामानाच्या प्रदेशात कमी पावसाच्या परिस्थितीत जमिनीतील क्षार धुऊन जाण्याचे प्रमाण कमी होऊन ते साचत जातात आणि परिणाम हळूहळू ही गंभीर समस्या उत्पन्न होते.
4) शहरातील सांडपाण्याचा सतत सिंचनासाठी वापर धोक्याचा ठरू शकतो. विशेषतः भाजीपाला पिकांसाठी शहरालगतच्या शेतीमध्ये या सांडपाण्याचा सिंचनासाठी वापर होताना दिसून येतो. या पाण्याचा दीर्घकाळ वापर केल्यास जमिनीत जडधातू साचून ते पिकांवाटे मानवी आहारातून प्रवेश करू शकतात, त्यामुळे या सांडपाण्याचा वावर प्रक्रिया करूनच सुरक्षित पद्धतीने करावा लागेल.
4) सिंचनाचे पाणी विम्लयुक्त असल्यास अशा पाण्यात क्षार कमी असून, सोडियमचे प्रमाण जास्त असते. अशा पाण्याचा दीर्घकाळ वापर केल्यास कॅल्शियम, मॅग्नेशिअमचे कार्बोनेट तयार होऊन ते अचल राहतात. मातीच्या कणांवरील सोडियमचे प्रमाण वाढते, त्यामुळे जमिनीच्या भौतिक गुणधर्मावर अनिष्ट परिणाम होतो.
5) विनिमययुक्त सोडियमचे प्रमाण वाढून जमिनीची संरचना बदलते. जमिनीच्या पृष्ठभागावर पाणी पिकांना प्राणवायू उपलब्ध होऊ देत नाही. जमिनी चोपण होऊन त्यांचा सामू वाढतच जातो.
6) पीक वाढीसाठी आवश्यक अशा नत्र, जस्त, लोह यांची उपलब्धता कमी होते.
डॉ. विलास खर्चे, डॉ. आर. एन. काटकर
(लेखक मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे कार्यरत आहेत)
----------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
आल्याचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठ...
या पध्दतीचा उपयोग केवळ पाळणा लांबवण्यासाठी नाही तर...
१५ ते ४० वयोगटातील स्त्रियांनी पाळणा लांबवण्याचा प...
कोणी जख्मी झाले किंवा अचानक अजारी पडले, अशा संकटक...